नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची गगन भरारी ऑनलाईन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

       


     खेळामुळे मन ताजेतवाने होते , मनावरचा ताण सहजतेने निघून जातो. मेंदू नवनवीन आव्हाने स्विकारण्यास नव्याने तयार होतो. कोव्हीड १९ मुळे आपल्या सर्वांवर प्रचंड  प्रमाणात अतिरिक्त ताण आलेला आहे . ज्यामुळे आपण सर्वांनी खेळणे अत्यावश्यक आहे सध्याचा कोव्हिडचा पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष समोरासमोर खेळाची स्पर्धा घेणे अवघड आहे. मात्र बुद्धीबळ, सुडोकू, सारख्या बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेण्यास काहीच अडचण नाही. तसेच नुकतेच केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक  ग्रँडमास्टरला अभिजीत कुंटे यांना मेजर ध्यानचंद  पुरस्कार जाहिर झाला आहेजी समस्त बुद्धीबळ प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे. गेल्या ७५ वर्षात कोणत्याही बुद्धिबळपटुला केंद्र सरकारकडून हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता. हा आनंद साजरा करण्यासाठी आणि खेळाचे सध्याचा काळातील महत्व लक्षात घेवून नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून  आँनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

         ही  स्पर्धा २९ आणि ३० जानेवारी रोजी या टोरलोनो संकेतस्थळाचे तांत्रिक साह्य घेऊन  पार पडल्या   भारतातूनच नव्हे तर नेपाळ ऑस्टेलिया , चीन थायलंड फिलिपाइन्स दुबई , इंग्लड जर्मनी सिंगापूर न्यूझीलंड कुवेत अश्या जगभरातुन ४०० हुन अधिक खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला . भारताचा विचार करता अन्य खेळाच्या स्पर्धांमध्ये अत्यंत तुरळक सहभाग नोंदवणाऱ्या अंदमान निकोबार बेटे जम्मू  काशीर या केंद्रशासीत प्रदेशांबरोबर आसाम मेघालय आदी राज्यातून  देखील वुद्धीबळपटूंनी आपला सहभाग नोंदवला या खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर , इंटरनॅशनल मास्टर, फिडे मास्टर . आणि एका कॅन्डीडेट मास्टरसह जगभरातील ४०० खेळाडू सहभागी झाले होते आयोजकांनी स्पर्धा घेण्याचे जवळपास वेळेवर जाहीर करून सुद्धा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला यावरून इतर वेळी फारशी इच्छुकता नसलेल्या कंटाळवाणा खेळ असा शिक्का बसलेल्या  बुद्धिबळ या खेळासाठी  भारतासह जगभरातील बुद्धिबळ प्रेमींची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज येतो 

          ही स्पर्धा खुला गट गट , १५ वर्षाखालील आणि  १० वर्षाखालील या गटात पार पडली प्रत्येक गटातून प्रत्येकी १५ अशी एकूण ४५ रोख बक्षिसे या स्पर्धेत देण्यात  आली  ज्यांचे एकत्रित मूल्य ५७ हजार ५०० भारतीय रुपये इतके


होते . या स्पर्धेत तिन्ही गटात प्रत्येकी सामने खेळवण्यात आले ज्यामधून खुल्या गटात गन मिळवत आराध्य गर्ग यांनी पहिले तर अनुक्रमे गुण मिळवत  आयम नूबेरशहा शेख आणि आनाडक कर्तव्य यांनी  दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले १५ वर्षाखालील गटात मानस गायकवाड यांनी पहिले स्थान मिळवले त्यांनी डावात साडेआठ गुणांची कामगिरी केली अमोक लाड गुणसह दुसरे आले तर अनुभव सिंगल या बुद्धिबळपटूने साडेसात गुणांसह तिसरा येण्याचा मान मिळवला १० वर्षाखालील स्पर्धेचा विचार करता साडेआठ गुणांसह माहीर तनेजा  हे प्रथम आले तर अन्ज नेरुळकर हे आठ गुणांसह दुसरे तर माधेशकुमार एस हे साडेसात गूण मिळवून तिसरे आले

     स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष  सिद्धार्थ मयूर, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा . सहसचिव विनायक वडिलें विक्रम माळवंकर भूषण पवार, गौरव देशपांडे  भूषण ठाकूर यांनी परीक्षम घेतले स्पर्धेत पंच म्हणून विवेक सोहनी ,आनंद बाबू आणि त्यांच्या सहकाऱयांनी काम बघितले स्पर्धेचे प्रायोजिकत्व चांदवडच्या ग्लोबल रिसर्च एज्युकेशन फाउंडेशनच्या भूषण कासलीवाल यांनी केले

     या सारख्या स्पर्धांचे सातत्याने आयोजन करून बुद्धिबळ हा खेळ जनसामन्यापर्यंत अधिकधिक पोहचवून देशाची मन उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले या सारख्या स्पर्धांमुळे भारतात  वैयक्तिक खेळाचा विचार करता कुस्ती भालाफेक , गोळा फेक सारख्या खेळाचा विचार करता काहीसा मागे पडलेल्या बुद्धिबळाचा झपाट्याने विकास होईल अशा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?