जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर

           


     जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाहीना असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या रशिया आणि युक्रेनबाबत घडत आहेत सध्याचा रशिया आणि भूतपूर्व युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणाऱ्या मात्र १९९१ पासून स्वतंत्र देश असलेल्या युक्रेन यांच्या सीमेवर रशियाने मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे युक्रेनला कोणत्याही स्थितीत अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन चा सदस्य होऊ देणार नाही प्रसंगी वेळ पडल्यास युक्रेनवर आक्रमण देखील करू अशी रशियाची भूमिका आहे नाटो या संक्षिप्त नावाने परिचित असणारी  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी हितसंबंध जपणारी संघटना शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या पुढाकाराने  युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाची लष्करी सहयोग संघटना सीटोचा प्रभाव कमी करण्यासाठी झाली होती 

काही दिवसापूर्वीच रशियाचे काहीसे  हुकूमशहा पद्धतीचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी  युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विसर्जन होऊन ३० वर्षे झाली म्हणून आयोजित कार्यक्रमात युएसएसरचे विसर्जन ही २० व्या शतकातील सर्वात मोठी घोडचूक असल्याचे आणि आपला प्रयत्न हे युनियन पुन्हा उभे राहण्यासाठी असायला हवा

असे विधान केले होते . ब्लादीमीर पुतीन कोणत्या स्थितीत रशियाचे अध्यक्ष झाले त्यांच्या स्वभाव कसा आहे यावर ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी एक उत्तम पुस्तक लिहले आहे गिरीश कुबेर यांची आपल्या देशांर्गत राजकाराबाबतची मते कितीही न पटणारी असो ती बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायला हवे यात या सर्व घडामोडींच्या खूप खोलवर अभ्यास केला आहे रशियाची अनेक वर्षापसूनची कृती  युएसएसरची पुनर्स्थापना करण्यास साह्य ठरेल अशीच राहिली आहे त्याच मालिकेत काही वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनमधील रशिया समर्थक लोकांची वस्ती असलेला आणि युक्रेनच्या मुख्य भूमीपासून काहीसा वेगळा असणाऱ्या क्रमिया हा भूभाग रशियात समाविष्ट केला होता त्याचे जागतिक स्तरावर मोठे प्रतिसाद उमटले होते अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या जी ८ या जगातील सर्वात मोठ्या ८  अर्थव्यवस्था अस्नणाऱ्या समूहातून  रशियाची हकालपट्टी करण्यात आली रशियावर प्रचंड प्रमाणात आर्थिक बंधने लादण्यात आली ज्याचा प्रचंड परिणाम रशियावर झाला  जो आजदेखील चालू आहे तरी रशियाने आक्रमक राष्टवादी भूमिका घेणे सुरूच ठेवले आहे 

अमेरीकेसह त्यांची तळी उचलणाऱ्या पश्चिम युरोप या भागातील  देशांच्या मते रशियाने त्यांचे विस्तारवादाचे धोरण तात्काळ थांबवले पाहिजे प्रत्येक देशाला स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे रशियाच्या अश्या कृतीमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण होत आहे अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी  जागतिक शांततेचे कारण देत इराक अफगाणिस्तान सीरिया आदी अनेक देशांची राखरांगोळी केली त्यावेळीस काही झाले नाही आता मात्र रशियाने कोणतेही छुपे कारण न  देता केलेल्या  कृतीमुळे जागतिक शांतता भंग होत आहे अशी अमेरिकेची भूमिका आहे अमेरिकेसह नाटो देशांच्या फौजा युक्रेनच्या  मदतीला धावून येतील असे उघड उघड वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष
जॉन बायदान आणि पश्चिम युरोपातही देशांचे राष्ट्रप्रमुख करत आहेत  जॉन बायदान यांनी तर रशियाच्या या कृतीमुळे तिसरं महायुद्ध सुरु होऊ शकते असे सांगितले आहे 
सध्या युक्रेन आपले सैन्याचे सबलीकरण करण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे त्यासाठी अन्य देशांच्या रशिया युक्रेनबरोबर असणाऱ्या आपल्या सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्करी जमवाजमव करत आहे ज्यासाठी भारत इंडोनेशिया बांगलादेश  आदी अन्य देशातील नागरिकांची आपल्या सैन्यात भरती करत आपली सैन्य ताकद वाढवण्याचा  तसेच राजधानीतील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी मोठे बँकर बांधून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या सज्जतेचाकृतीचा समावेश करावाच लागेल      रशियाचा विचार करता आपला मित्र आणि आपल्या आणि युक्रेनबरोबर सीमा शेअर करणाऱ्या बेलारूस बरोबर मोठ्या प्रमाणात युद्धसराव करत आहे रशियाचा युक्रेन बेलारूस सीमेवर देखील सैन्य तैनातीचं विचार असल्याचे वृत्त भारतीय मालकीच्या मात्र जागतिक घडमोडणीची सहजसोप्या इंग्रजी भाषेत माहिती देणाऱ्या wion news ने दिले आहे 
             भारताचा विचार करता भारतासाठी हे दुहेरी संकट आहे भारतने याबाबत आपली अधिकृत भूमिका हा लेख लिहण्यापर्यंत जाहीर केलेली नाही आजदेखील भारताच्या संरक्षण सामग्रीत रशियन उपकरणाच्या मोठा वाटा आहे भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवरील चीन आणि पाकिस्तनाचा धोका बघता भारताला सरंक्षण सज्जता आवश्यक आहे तसेच वैद्यकीय शिक्षण कमी खर्चिक असल्याने अनेक भारतीय वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये जातात  भारतीय मालकीच्या मात्र जागतिक घडमोडणीची सहजसोप्याइंग्रजी भाषेत माहिती देणाऱ्या wion news ने दिलेल्या बातमीनुसार जेमतेम डिड पावणेदोन कोटी लोकसंख्या असलेल्या युक्रेनमध्ये आजमितीस
२० ते २५ हजार भारतीय वैद्यकीय शिक्षण घेत आहे अमेरिकेबरोंबर आपले मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध आहेत कोण्या एकाची बाजी घेतल्यासदुसऱ्याकडून मिळणाऱ्या फायद्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो 
रशिया आणि युक्रेन युद्ध झाल्यास हे दोन्ही देश ओपेकचे सदस्य नसले तरी जगातील पेट्रोलियम उप्तादनचे मोठ्या प्रमाणात उत्पादक असल्याने नैसर्गिक इंधनाचे दर प्रचंड वाढू शकतात जेकोव्हीड १९ च्या संकटातून उभे राहणाऱ्या जगातील कोणालाही परवडणारे नाही तरी दव करो आणि हे युद्धाचे ढग विरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?