मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

         

         आपण रस्त्यावरून जाताना एक पाटी अनेकदा बघतो , मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक . खूपच अर्थपूर्ण वाक्य आहे हे ! रस्त्यावरून जाताना मनाला यावर घातला की त्यामुळे आपसूकच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाते परिणामी वाहन अनियंत्रित होत नाही जर दुर्दवाने  काही कारणाने वाहन अनियंत्रित झालेच  तर वाहन लगेचच नियंत्रणात येते त्यामुळे मोठा अपघात  टाळून त्यांमुळे येणारे शारीरिक अपंगत्व किंवा काही प्रसंगी येणार मृत्यूही टाळला जातो हे सर्व मोजक्या शब्दात सांगण्यासाठी हि वाक्यरचना वापरली जाते . माझ्यामते फक्त रस्त्यावर नाही तर रोजच्या आयुष्यात देखील उपयोगी पडणारी ही वाक्यरचना आहे आपण नुकताच नाशिक जिल्ह्यतील - देवळा तालुक्यात घडलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या कुटुंबियांकडून सामूहिकरीत्या घडलेला खून हे हेच सुचवत आहे . लग्नाला मोडता घालत असेल तर पोलिसी कारवाई करता आली असती मात्र रागाच्या भरात प्रियकरला पेटवून त्या कुटूंबियाला काय मिळाले ? आता ते बराच काळ तुरुंगात राहतील त्या अर्थी ते कुटूंबीय संपलेच आणि ज्या प्रियकराच्या खून करण्यात आला  ते घर देखील संपले ना ? प्रेयसीच्या घरातील व्यक्तींनी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या तत्वाचा वापर न केल्यामुळे हे हत्याकांड घडले ज्यात दोन घरे संपली  
        जेव्हा त्या घराला प्रियकराविषयी राग अनावर झाला त्यावेळी  त्य्या विशिष्ठ क्षणी त्यांनी क्षणभराची विश्रांती घेतली असती तर त्यांच्या हातून हे हत्याकांड घडलेच नसते ज्यामुळे अबोल्यानें का होईना दोन घरे वाचली असती . अर्थात हे जर तरचे बोलणे झाले ज्याला तसा  काहीच अर्थ नसतो . त्यामुळे अस्तित्वात असलेल्या  परिस्थितीत काहीच बदल घडत नाही  फक्त घडलेल्या घटनेच्या ऐवजी दुसरी कोणती घटना घडली असती?  याची शक्यता सांगण्यात येते मात्र दुसरी घटना घडत नाही कलांचे काटे मागे सरकून हवी असणारी घटना घडत नाही . त्यामुळे मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे 
                  सध्या मात्र अनेक सध्या सध्या घडामोडीत लोक पॅनिक झालेली दिसतात . साधे रस्त्यावर वाहने अडकून ट्रॅफिक जॅम लागला तरी लोक पॅनिक होऊन  हॉर्न वाजवायला लागतात आता हॉर्न वाजवून समोर असणाऱ्या वाहनाला जागा मिळून ते दूर होणार आहे का ? आणि ते दूर झाले नाही तर आपले वाहन कसे जाणार ? याचाही विचार लोक करत नाही 
                           सध्या वर्तमानपत्रे वाचली , टीव्ही बघितला तर अनेक गरज नसणाऱ्या मुद्यांना जीवनवश्यक मुद्याचे स्वरूप दिलेले आढळते ज्यामुळे जे मुळात जीवनवश्यक मुद्दे आहेत  त्याकडे दुर्लक्ष होते माझ्यामते या दुर्लक्ष होणाऱ्या मुद्यांमध्ये लोकांचे मानसिक अनारोग्याच्या देखील समावेश करायला हवा व्यक्तीला स्किझोफेनिया सारखा विकार नसेल तर तर ती व्यक्ती मानसिकदष्ट्या निरोगी समजणे अयोग्य आहे आपण काय कृत्य करत आहोत त्याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात याची  जाणीव नसणे किंवा  यासारख्या बाबी सुद्धा मानसिक अनारोग्यातच मोडायला हव्यात दोन एक वर्षांपूर्वी इंडियन मेडिकल असोशीएशियान ने भारतात जगातील सर्वात जास्त मानसिक रुग्ण होऊ शकतात . भारतातील नैराश्याचा विकाराची संख्या चिंताजनक असल्याचा अहवाल दिला होता . त्या अहवालावर त्यावेळी काही प्रमाणात चर्चा झाली होती मात्र समर्थ रामदास स्वामी यांच्या उपासनेला दृढ चालवावे या वचनानुसार त्यावर पुढील कार्यवाही झालीच नाही आपल्या निवडणुकांमध्ये जाहीर होणाऱ्या पक्षांच्या जाहीरमान्यात
अनेक रोजच्या जगण्याशी फारच कमी संबंध असलेल्या गोष्टींचा समावेश असतो मात्र रोजच्या जगण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मानसिक आरोग्याशी याचा दुरनवाये देखील उल्लेख  नसतो नाही म्हणायला सध्याच्या केंद्र सरकारतर्फे मानसिक आरोग्याबाबत काही उपाययोजना करण्यात येत असली तरी ती अत्यंत तुटपुंजी आहे हे नाकारण्यात काहीही चुकीचे नाही 
जर मानसिक आरोग्याबाबत समाजात जनजागृती झाली तर आणि तरच असे प्रकार भविष्यात घडन्यापासून थांबतील अन्यथा हे प्रकार चालूच राहतील आणि कुटुंब  उद्धवस्त होतच राहतील हे नक्की  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?