नाशिकमध्ये रंगणार राज्य बुद्धिबळ स्पर्धेचा थरार

 

   नाशिकला क्रीडापटूंची मोठी परंपरा आहे नाशिकने ग्रँडमास्टर विदित गुजराथी, आशियाई शालेय बुद्धिबळ विजेती प्रचिती चंदात्रे सावरपाडा एक्सप्रेस  कविता राऊत, दत्तू भोकनळ यांच्यासह अनेक नामवंत कुस्तीपटू आणि  क्रिकेटवीर दिले आहेत मात्र स्पर्धा आयोजनात नाशिक काहीसे मागे पडले आहे गेल्या कित्येक वर्षात कोणत्याही खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये रंगलेली नाही मात्र हा कलंक आता पुसला जाणार आहे कारण    येत्या शनिवारी रविवार अर्थात १९ आणि २० फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना महाराष्ट्राचा  राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठीचा संघ निवडण्यासाठी स्पर्धा घेणार आहेत ज्या ठिकाणी  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्न अश्या ३२ जिल्हा बुद्धिबळ संघटनांकडून निवडण्यात आलेले ४ पुरुष आणि ४ महिला खेळाडू आपले बौद्धिक चातुर्य दाखवत महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी एकमेकांशी बुद्धिबळाचा पटावर झुंज देतील 
         नाशिकमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथी, आशियाई शालेय बुद्धिबळ विजेती प्रचिती चंदात्रे  यांसारखे अनेक नामवंत बुद्धिबळ खेळाडू आहेत नाशिकमध्ये बुद्धिबळ खेळ शिकवण्यासाठी बोटवानीक चेस स्कुल , भूषण चेस ऍकेडमी, फिशर चेस स्कूल  या सारख्या अनेक बुद्धिबळ प्रक्षिक्षण संस्था आहेत  नाशिकमध्ये फिडे गुणांकन  प्राप्त अनेक खेळाडू आहेत मात्र त्या असे असून देखील नाशिकमध्ये बुद्धिबळ विषयक मोठी स्पर्धा होत नव्हती मात्र नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची कमान व्यवसायाने सनदी लेखापाल असणाऱ्या विनय बेळे यांच्या हाती आल्यावर चित्रात खूपच बदल होत आहे नाशिक जिल्ह्याचे बुद्धिबळ विश्व मोठ्या प्रमाणात समृद्ध होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यतच्या इतिहासातील पहिल्यादाच राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वव करणारा संघ निवडण्यासाठी होणारी स्पर्धा नाशिकमध्ये होत आहे जी गोष्ट नाशिकमधील बुद्धिबळ क्षेत्राला नवसांजवीनी देऊन जाईल हे नक्की 
          या स्पर्धा पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातील दादा जेठानंद यांच्या आश्रमाच्या सभागृहात होणार आहे  नाशिकबाहेरील खेळाडूंची सोय आयोजनकडून करण्यात आली आहे ज्यामध्ये दोन्ही दिवशी सकाळचा नाश्ता तीन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे यासाठी प्रत्येक खेळाडूंकडून ८०० रुपये घेण्यात येणार असून ते खेळाडूंनी प्रत्यक्ष न भरता ते ज्या जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रतिनिधित्व करतात त्या संघटनांनी भरायचे आहेत खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र मात्र सोबत आणावे लागणार आहे ज्यांची निवड जिल्हा बुद्धिबळ संघानेकडून करण्यात आलेली नाही मात्र ज्यांना या स्पर्धेत खेळायचे आहे अश्या व्यक्ती रुपये १५०० जमा करून खाजगी प्रवेश करू शकतात . मात्र त्यांना ते ज्या जिल्ह्यत राहतात त्या जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून सहभागविषयीचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणपत्राशिवाय त्यांना खेळात येणार नाही तसेच स्पर्धेत खाजगी प्रवेश घेणाऱ्या खेळाडूंना आपल्या राहण्याची आणि भोजनाची सोया स्वतःलाच करावी लागणार आहे 
आयोजनकांकडून या बाबत शक्य तेव्हढी मदत करण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल खाजगी प्रवेश घेणाऱ्या खेळाडूंना देखीलअधिवास  प्रमाणपत्र सासदार करणे आवश्यक आहे  या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या खेळवण्यात येणार आहेत प्रत्येक फेरी १५ मिनिटे अधिक १० सेकंड जास्तीची वेळ या स्वरूपात खेवण्यात येणार आहे 
       या स्पर्धा MAT या संस्थेच्या युट्युब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर बघू शकतो या दोन्हीठिकाणी त्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे  MAT या संस्था हि नाशिमधील मधील अप्रकाशित हिऱ्यांना ज्यांनी अतुलनीय कार्य केले आहे मात्र ज्यांचे कार्य समाजापासून अलिप्त आहे अश्या लोकांना प्रकशित आणण्याचे कार्य करते  बुद्धिबळ हा खेळ वाटतो तितकासा निरास नाही सध्या अनेकजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीसाठी बुद्धिबळाचा खूप फायदा होतो अनेक बुद्धिबळपटूंना सनदी लेखापाल शासकीय अधिकारी या क्षेत्रात यश मिळाले आहे त्यांनी त्यांच्या यशामागे बुद्धिबळाचा हात असल्याचे सांगितले आहे तर मग बघणार ना  या स्पर्धा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?