आपली गोदावरी वाचावा ...

         

    नाशिकचे भूषण असणारी  गोदावरी नदी  वाचवण्याची गरज असल्याचे बुधवार १६ फेब्रुवारी रोजी हरित लवादाने दिलेल्या निकालामुळे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले आपल्या निवाड्यात हरित लवादाने गोदावरीचे पाणी पिण्यास आणि अंघोळ करण्यास लायक नसल्याचे स्पष्ट केले आहे नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पंच्या दर्जा ढासळत असल्याचे निरीक्षण हरित लवादाने आपल्या निकालात  नोंदवले आहे राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने या बाबत भाष्य करताना सांगितले की नाशिक आणि त्रंबकेश्वर या शहरात  दरदिवशी ४५ ते ५० लाख लिटर सांडपाणी तयार होते. मात्र, केवळ १० लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित ३५ ते ४० लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते.जे अत्यंत चिंताजनक  असून या सांडपाण्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यास सोडा अंघोळीस देखील लायक नाही मात्र तरी देखील लोक ते वापरत आहेत जे वाईट आहे या निकालात राष्ट्रीय हरित लवादाने राज्य आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दात नापसंती दर्शवली प्रशासनामार्फत सर्वोच्च न्य्यायालयाकडून वारंवार सांगून देखील यासाठी जवाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तर फक्त कारवाई झाल्याचे दाखवण्यासाठी वरवरची कारवाई होते ज्यामुळे गोदावरीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे . अश्या शब्दात हरित लवादाने आपली ना[नापसंती दर्शवली 
              गोदावरी नदी नाशिकच्या अध्यात्मिक जीवनाचा प्राण आहे नाशिकला होणाऱ्या धार्मिक अनुष्ठानात गोदावरीचे स्थान वगळल्यास हाती शुन्याखेरीज काहीही लागणे निव्वळ अश्यकच .नाशिक शहराबाहेरील गोदावरीचा विचार करता नांदूर मध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्य हे गोदावरीच्या पाण्यामुळेच अस्तित्वात आल्याचे आपणस दिसते जर नाशिक शहरात गोदावरी नदी प्रदूषित झाल्यास त्या पासकही आभारण्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही गोदावरी नदीचे पाणी मराठवाड्यातील बीड उस्मानामाबद आणि लातूर या३ जिल्ह्यांच्या अपवाद वगळता अन्य सर्व मराठवाड्याची तहान भागवते नाशिकमध्ये पाणी प्रदूषित झाल्यास या सर्व घटकांवर परिणाम होणे स्वाभाविकच आहे आंध्र प्रदेशात गोदावरीवर खूप मोठी लोकसंख्या अवलुबुन आहे त्यामुळेच त्यांनी गोववरीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन जिल्ह्यांचे नामकरण गोदावरी नदीच्या नावावर केले आहे शीख धर्मियांच्या पाच प्रमुख तीर्थ स्थानांपैकी एक असणारे नांदेड हे गोदावरीच्याच काठी वसले आहे  प्रदूषित पाणी स्वतःहून स्वच्छ करण्याची निसर्गाची स्वतःची अशी यंत्रणा असली तरी त्यास काही मर्यादा आहेत जर खूपच जास्त पाणी प्रदूषित झाल्यास ती यंत्रणा मोडून पडते आणि प्रदूषित पाणी तसेच पुढे जात राहते हे आपण लक्षात घेयला हवे 
      नाशिकमध्ये पाणी प्रदूषित होण्यामागे सातपूर औदयोगिक वसाहतीचा आतापर्यंत मोठा वाटा होता औदयोगिक वसाहतीत मनपाची सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणा नसल्याने आततापर्यँत कारखान्यताही पाणी पुरेशी प्रक्रिया ना करता गोदावरीत सोडून देण्यात येत होते न्यायालयाने वारंवार फटकारल्यावर आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे लोकांनी नदीत कचरा फेकू नये म्हणून मनपाकडून काही पुलावर जाळ्या देखील लावण्यात आल्या .लोकांना नदी स्वच्छतेचे महत्व समजावे म्हणून ऊत्तर भारतात होणाऱ्या गंगा  आरती सोहळ्यासारखा उपक्रम देखील नव्याने सुरु करण्यात आला  लोकांनी नदीपात्रात कचरा फेकू नये म्हणून स्वच्छता दूत देखील नेमले त्याचा चांगला परिणाम झाला मात्र गोदावरीच्या उपनद्या नसे नंदिनी (नासर्डी )वाघाडी, अहिल्या  आदींबाबत पुरेशी काळजी न घेताल्याने त्यातून नदी
प्रदूषण होतेच राहिले ज्यामुळे गोदावरी प्रदूषणाबाबत रु राष्ट्रीय हरित लवादाने बोल आपणस ऐकावे लागले 
      आज अनेक संस्था गोदावरीच्या उपनद्यांची नियमित स्वच्छता करून गोदावरीत प्रदूषित पाणी जाणारच नाही याची काळजी घेत आहेत मात्र हे प्रयत्न खाजगी स्वरूपातील आहेत त्यांची ताकद आणि शासकीय यंत्रणेची ताकद यांची तुलनाच होऊ शकत नाही शासकीय यंत्रणेची ताकद खाजगी संस्थांपेक्षा कैक पटीने अधिक आहे त्यामुळे गोदावरीच्या  उपनद्यांबाबत शासकीय पातळीवरून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे तर आणि तरच गोदावरी खऱ्या अर्थाने स्वच होईल हे खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?