वंदन समाजसुधारक स्वातंत्र्यवीरांना

         

      महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 1947नंतरच्या त्यांचा जीवनाविषयी अनेकदा बोलले जाते.मात्र या सर्व प्रकारात त्यांचा एक पैलू दुर्दैवाने अप्रकाशीतच राहतो, तो म्हणजे आपल्या रत्नागिरीच्या मुक्कामात त्यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य. आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे  परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समजणे ब्रिटिशांच्या राजवटीचा फायदा घेत सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय मिळणाऱ्या राजकीय स्वातंत्र्यास काहीही अर्थ नाही मात्र स्वातंत्रवीर सावरकर हे राजकीय स्वातंत्र्याबरोबर

सामाजिक सुधारणांच्या आग्रह धरणारे व्यक्तिमत्व होते आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्यातील नेत्याच्या विचार करता या गोष्टीमुळेच स्वातंत्रवीर सावरकर उजवे ठरतात 
   अंदमानातील सेल्युलर जेलमधून सुटका झाल्यावर पुढची सुमारे १२ ते १३  वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत  अलीपूरच्या तुरुंगात आणि रत्नागिरी येथील घरात  स्थानबद्ध होते.या काळात त्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. या काळात हिंदू धर्मातील अनेक दोषांवर अत्यंत प्रखर शब्दात कोरडे ओढणारे लेखन केलॆ . त्यांचे समाज सुधारणेबाबतचे  लेखन "क्ष किरणे "  या निबंधाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहेत . त्याची काही मते आज २०२२ साली देखील पचवणे अत्यंत कठीण आहे त्यांनी अस्पृश्यता निवारण,  रोटी बंदी  बेटी बंदी , व्यवसायबंदी , शुद्धीबंदी आदी ,समुद्रीबंदी  हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांच्या फोलपणा लोकांच्या लक्षात यावा आणि लोकांनी त्या सोडून दयाव्यात यासाठी प्रयत्नची पराकाष्ठा केली आपले समज सुधारणेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी  जातुच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठां निबंध अशी पुस्तकेही लिहली त्याकाळी हिंदू धर्मियांची सर्व प्रार्थनास्थळे सर्व हिंदूंसाठी उघडी नसत  काही हिंदू समाजबांधव मंदिरात जाऊ शकत नसे त्याच्या विरोध करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीत सर्व लोक जाऊ शकतील असे मंदिर उभारले रत्नागिरीचे सुप्रसिद्ध पतितपावन मंदिर ते हेच   सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले
विज्ञानप्रेम हा सुध्दा त्याचातील मला विशेष भावलेला गुण आहे प्रखर धर्मप्रेमी असूनही धर्मातील अनिष्ट चालीरीतीवर हल्ला चालवणारे समाजाने आता विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सागणारे सावरकर खरोखर महान व्यक्तीमत्व होते गाय उपयुक्त पशू आहे मानवाने तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे किंवा माझा निधनानंतर माझे कोणतेही क्रियाक्रम करू नये असे म्रुत्यूपञात सांगणारे सावरकर मला त्यामुळे अधिकच वंदनीय ठरतात सावरकर म्हणजे हिंदूत्व असा संकुचित अर्थ घेणाऱ्यांनी  सावकरांचा या विचाराचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हिंदुत्तवाची उभारणी केली त्याचा पाया विज्ञान हा होता .हे . भारतीय राज्यघटनेतसुद्धा 51A मध्ये सुद्धा नागरिकांनी आपली विचारसरणी विज्ञानाला पूरक करावी असे सांगितले आहे  मित्रानो विज्ञान या विषयांचे शिक्षण घेणे आणि विज्ञानाला पूरक विचारसरणी करणे या पूर्णतः भिन्न बाबी 
आहेत  . विज्ञानाला पूरक विचारसरणी अंगीकारणे या मध्ये बुद्धीला प्रश्न पडण्याची सवय अंगी लावणे  प्रत्येक गोष्टीवर अंध विश्वास  ठेवता त्याची तर्कसुसंगत पध्द्तीने उभारणी करून बुद्धीला पटले तरच त्यांचा अवलंब करणे , या बाबी अंतर्भूत आहेत . या बाबी जर प्रत्येक भारतीयांनी आत,आत्मसात केल्या तर ती स्वातंत्रवीर सावरकरांना खऱ्या रथाने आदरांजली ठरेल असे मला वाटते .आपल्या
जाताजाता . आजच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीदिनी त्यांना वंदन करून सध्यापुरते थांबतो 
जय स्वातंत्र्यवीर सावरकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?