भारतीय रेल्वेची गगग भरारी

   

भारतातील दुर्गम, अविक प्रदेश रेल्वेच्या नकाश्यावर आणण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.ज्यामध्ये इशान्य भारत आणि जम्मू काश्मीरचा अधिकाधीक भाग रेल्वेने देशातील इतर भागाशी जोडणाऱ्या विकाम कामांचा उल्लेख करावाच लागेल. इशान्य भारतातील राज्यांची किमान राजधानी तरी रेल्वेच्या नकाश्यावर यावी, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये जास्तीत जास्त आतपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत. 
 जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक  या नावाने रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा प्रकल्प सुरु आहे. हा प्रकल्प यु .एस बि. आर.एल. या नावाने प्रसिद्ध आहे.रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प परीचित आहे.हा  रेल्वेप्रकल्प 2003च्या आधीपासूनच सुरु आहे. नुकतीच या रेल्वे मार्गातील मोठा माईल स्टोन गाठण्यात आला. या प्रकल्पातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा तयार करण्यास रेल्वे अभियंत्रांना यश मिळाले. तब्बल 12 हजार 700 मीटर लांबीचा हा बोगदा संबल ते अरीहनचरा या दरम्यान आहे. या बोगद्याची एक बाजू समुद्रसपाटीपासून 1400 मीटरवर आहे. तर दुसरीबाजू 1600 मीटर आहे. हा बोगदा टी 49 या नावाने परीचित आहे. यु .एस बि. आर.एलमधील ज्या मार्गाचे काम अपुर्ण.होते अस्या कटरा ते बनीह्याल या मार्गावर हा बोगदा आहे. या महत्तकांक्षी मार्गावरील ईतर टप्यावर रेल्वे वाहतूक सुरु झालेली आहे. फक्त हाच टप्पा निर्माणाधीन आहे..त्या मार्गावरील हा  माईलस्टोन असल्याने  रेल्वेच्या अभियंत्रांचे कौतूकच करायला हवे.हा बोगदा सध्या कार्यरत असलेल्या पीरपंजाल या रेल्वेबोगद्यापेक्षा सुमारे दिड किलोमीटर रूंद आहे. या मार्गावर बोगदा झाल्याने या मार्गावरील इतर कामांना गती मिळून हा प्रकल्प पुर्ण होण्यास गती मिळू शकते.न्यु आँस्टोलियन टनेलिंग पद्धतीचा वापर करत हा बोगदा तयार करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मानंकाच्या सर्व मापदंडाचे पालन या बोगद्यात करण्यात आले आहे. या बोगद्याचा दोन मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. एक मुख्य मार्गिका असेल तर दुसरी काही समस्या झाल्यास सुरक्षीतपणे बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणारी मार्गिका असेल.मुख्य बोगद्यात दर375 मीटरवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा दिल्या आहेत..या खेरीज पँरीसच्या आयफेल टाँवरच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर बांधण्यात येणाऱ्या अंजीखान पुलाच्चा कामातील मोठा भाग अर्थात या पुलाचा भार घेणाऱ्या खांबाचे काम पुर्ण झाले आहे
ज्यामुळे उर्वरीत पुलाचे काम होण्यास गती मिळेल.तर झेलम नदीवरील सुप्रसिद्ध आर्क पुलाच्या आर्कचे काम पुर्ण झाल्याने तोही लवकरच पुर्ण होईल.
रेल्वे कोणत्याही देशाच्या विकासात मोठे योगदान देते. ज्या  भुभागात हे कामे सुरु आहेत. त्याभागात काहीसी फुटीरतेची भावना आहे. मात्र  रेल्वेच्या नकाश्यावर हा मार्ग आल्याने देशाच्या प्रगतीसह एकात्मतेला मोठा हातभार लागेल, हे नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?