दुराग्रह नको.... आग्रह ठीक....!

           

                   जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना एका मराठी अभिनेत्रीने काहीसी अयोग्य वाटावी, असी भाषा वापरली,आणि एका नव्या वादाला तोंड फुटले.ष च्या ऐवजी श वापरणारे किंवा उलटेही वापरणारे तसेच ण आणि न यात गल्लत करणाऱ्यांसह सर्वांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असी काहीसा दिनाच्या औचित्याला साजेशी नसणारी टिपण्णी त्या अभिनेत्रीने केली.
                  बोलीभाषेत त्या त्या प्रदेशातील जीवनाचे प्रतिनिधित्व दिसत असते.प्रदेशनिहाय परीस्थिती बदलत असल्याने, बोलीभाषा देखील बदलते, अस्या वेळी सर्व प्रदेश्यातील लोकांना समजेल असी भाषा निर्माण करण्यास कोणाचीही हरकत नसावी. मात्र या प्रमाण भाषेचा दुराग्रह करत, बोली भाषांना कचऱ्याची कुंडी दाखवली जाते, तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो, जो त्या अभिनेत्रीच्या टिपण्णीमुळे निर्माण झाला आहे. 
              व्यक्ती आपण त्याचा मातृभाषेत  सहजतेने व्यक्त होतो असे म्हणतो, तेव्हा खरेतर तो त्याचा बोलीभाषेत व्यक्त होत असतो. हे व्यक्त होणे लेखी आणि मौखिक असे दोन्ही असते. मराठीतील अनेक बोलीभाषेत ष चा श किंवा याचा उलटे होणे, तसेच ण चा न किंवा या उलट होणे, यात काहीही वावगे नाही.सबब त्याला अन्य काही पट्ट्या
लावून मोजणे योग्य अयोग्य ठरवणे मुळातच गैर आहे. ज्याप्रमाणे बिर्याणी आणि पुलाव हे भाताचेच प्रकार असले तरी , त्यासाठीचे मसाले वेगवेगळे आहेत.त्यामुळे त्याचा स्वादिष्टचा संकल्पना वेगवेगळ्या आहेत, एकाची स्वादिष्टची संकल्पना घेवून दुसऱ्याचे मुल्यमापन करणे गैर आहे. तोच न्याय मला प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांना लावायला हवा असे वाटते.
                 त्या अभिनेत्रीने ज्याप्रकारे हा प्रश्न सभ्य असभ्यतेचा केला ते निंंदणीयच आहे. मला चहा आवडतो म्हणजे सर्वांनाच चहा आवडेल असे मानून कसे चालेल?काहींना काँफी आवडेल, काहींना हळद टाकलेले दूध आवडेल अस्यावेळी मला चहा आवडतो म्हणून सर्वांना चहाच पिण्यास भाग पाडणे कितपत योग्य ठरेल?चहाचे देखील अनेक प्रकार आहेत, लेमन टि, ब्लँक टि ,बासुंदी चहा ,ग्रीन टि. जसी खाण्या पिण्यात ही विविधता आहे, तसी भाषेत पण असणारच ना?अस्या वेळी एखादी भाषा योग्य आणि दुसरी अयोग्य ठरवणे गैरच नाही का?
                    इंग्रजीतही अमेरीकन इंग्रजी, ब्रिटिश इंग्रजी असे पोटभेद आहेच ना कलर्स सारख्या काही शद्बांचे स्पेलिंग दोन्ही भाषेत वेगवेगळे आहेत, तो फरक आपण स्विकारतोच ना? तोच न्याय आपण "ष/ श ,ण/न" ला लावायला हवा असे मला आवर्जून वाटते.माझ्या मते इंग्रजी असे बदल स्विकारत असल्यानेच, जगभर विस्तारु शकली.मात्र मराठी असे प्रादेशिक बदल न स्विकारु शकल्यामुळे, इंग्रजीचा तूलनेत बरीच मागे आहे. मी पुण्यात असताना मला अनेकजण वेलांटीच महत्व सांगताना नेहमीच "दिन" आणि "दीन " या शद्बांचे उदाहरण देत एका वेलांटीमुळे अर्थाचे किती अनर्थ होतात ,हे सांगायचे.त्यांना मी तेव्हाही सांगत असे.आताही अस्या व्यक्ती भेटल्यातर.मी आवर्जून सांगतो हिंदीत "कल" ही वेळ सांगणाऱ्या संज्ञेची काल आणि उद्या असे दोन परस्परविरोधी अर्थ होतात.मात्र काळामुळे अर्थ समजतो हिंदी भाषिकांचा गोंधळ उडत नाही, तसा दिन चा दीन झाला तरी काही
फरक पडत नाही. मात्र विनाकारण हा शुद्धलेखनाचा घाट घातल्यास नुकसान मात्र नक्की होते.माझ्या मतानुसार त्या अभिनेत्रीने दिलेल्या शुभेच्छांमध्ये हाच शुद्धलेखनाचा घाट घातला होता.सबब मला वैयक्तिकरीत्या तीचा शुभेच्छा आवडल्या नाहीत. असो प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे.काहीजणांना तीचा शुद्धलेखनाचा घाट आवडला असू शकतो. भगवान शंभो त्यांना योग्य ती समजण्याची समज देवो ही महादेव चरणी प्रार्थना !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?