बुद्धीच्या खेळात महाराष्ट्राची दैदिप्तमान कामगिरी

     
पहिल्या क्रमांकावरील दिव्या देशमुख 

सध्या मराठीतील विविध वृत्तवाहिन्यामध्ये रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाच्या बातम्या किंवा राजकीय क्षेत्रातील बातम्या देत असताना,  बुद्धीच्या खेळात अर्थात बुद्धिबळात महाराष्ट्रीयन बुद्धिबपटूंनी अत्यंत दैदिप्तमान कामगिरी केली आहे नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या,  ५८ व्या  राष्ट्रीय खुल्या  वरिष्ठ महिला बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दोन  क्रमांकावर महाराष्ट्राच्या बुद्धिबळतारका आहेत नागपूरच्या दिव्या देशमुख यांनी ९ फेऱ्यांममध्ये ७ विजय आणि २ डावात बरोबरी यांच्यासह एकूण ८ गुण मिळवत राष्ट्रीय महिला  वरिष्ठ गटात विजेतेपदाचा मान मिळवला . त्या या स्पर्धेत अपराजित राहिल्या हे विशेष.  या विजेतेपदामुळे १७ वर्षीय वूमेन ग्रँडमास्टर असलेल्या   दिव्या देशमुख यांनी गेल्या वीस वर्षातील सर्वात तरुण राष्ट्रीय महिला विजेती होण्याची कामगिरी केली आहे यावेळी त्यांनी आपल्या फिडे गुणांकन २५ ने वाढवले सुद्धा . तसेच आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमेचे रोख बक्षीस देखील मिळवले . त्यांना साडेपाच लाख रुपये बक्षीस रूपाने मिळाले . त्यांनी पहिल्या फेरीत मध्यप्रदेशकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्षिता जैन आणि अखेरच्या ९ व्य फेरीत पी.  एस.  पी.  बी.  कडून प्रतिनिधित्व करणाऱ्या  तसेच  ज्युनियर गटात माजी विश्वविजेत्या असणाऱ्या सोमया स्वामिनाथन यांच्या अपवाद वगळता अन्य सर्वांना
दुसऱ्या क्रमांकावरील साक्षि चित्तांगे
पराभवाची चव चाखायला लावली या दोन्हींविरुद्धच्या मात्र त्यांना बरोबरी मान्य करायला लागली  दिव्या देशमुख यांनी हरवलेल्या बुद्धिबळ खेळाडूंमध्ये एअर इंडियाचे  प्रतिनिधित्व करणाऱ्या   आणि माजी राष्ट्रीय बुद्धिबळ महिला विजेती असणाऱ्या भक्ती कुलकर्णी यांच्या देखील समावेश आहे त्यांनी आपल्या  नजीकच्या  प्रतिस्पर्धी महाराष्ट्राच्याच साक्षी चित्तांगे याच्यापेक्षा एक गुण जास्तीचा मिळवत हे विज्जेतेपद मिळवले या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साक्षि चित्तांगे या ७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या . 
      आपल्या भारताच्या विचार करता दक्षिणेकडील राज्याचा बुद्धिबळात वरचष्मा दिसून येतो तामिळनाडू , कर्नाटक तेलंगणा आणि आंध्रप्रदेश केरळ या पाच राज्यात भारताच्या एकूण ग्रँडमास्टरांपैकी  मोजक्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच  ग्रँडमास्टरांचा अपवाद करून बाकीचे सर्व ग्रँडमास्टर राहतात या पाच राज्यापैकी तामिळनाडू राज्यात सर्वाधिक ग्रँडमास्टर राहतात तामिळनाडूचे नामकरण तामिळनाडू ऐवजी  ग्रँडमास्टरनाडू केले तरी चालू शकेल (तामिळनाडू या नावातील नाडू या तामिळ शब्दाचा अर्थ राष्ट्र असा होतो तामिळ लोंकाचे राष्ट्र ते तामिळनाडू अशा अर्थ आहे  ) अशी तेथील बुद्धिबळाची स्थिती आहे तिथे बुद्धिबळपटूंना
पहिल्या क्रमांकावरील दिव्या देशमुख 
अनेक उत्तम  दर्जाच्या सुविधा मिळतात या उलट स्थिती महाराष्ट्राची आहे   सध्या महाराष्ट्रातील अनेक बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत ते त्यांच्या वैयक्तिक साधनसामुग्रीवर . जर त्यांना दक्षिणी  राज्यात शासनाकडून मिळते तशी मदत मिळाली तर महाराष्ट्रातील बुद्धिबळपटू याहून चमकदार कामगिरी करतील हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?