कथा न झालेल्या तिसऱ्या महायुद्धाची

   


         सध्या भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन  यांच्यातील युद्धाचे वर्णन तिसरे महायुद्ध म्हणून करत असले तरी,  याच्यापेक्षा गंभीर परीस्थिती एकदा उदभवली होती .ज्यावेळी खरोखरीच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते .  ज्याला जगाच्या इतिहासात क्युबन  क्रायसिस म्हणून ओळखले जाते . या क्युबन    क्रायसिस मध्ये सहभागी असणाऱ्या तीन पैकी दोन देशांकडे घातक अण्वस्त्र होती . फक्त एका कळ  दाबायचा अवकाश,  एकमेकांवर अण्वस्त्रे गेलीच म्हणून समजा,  अशी त्यावेळी स्थिती होती मात्र त्यावेळी जगाच्या महासत्तेच्या प्रमुखांनी ही स्थिती शांततापूर्वक हाताळली, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून दूर गेले . सध्याचे रशिया युक्रेन युद्ध त्यावेळच्या  क्युबन  क्रायसिसच्या तुलनेत काहीच नाही.  सध्याच्या रशिया युक्रेन युद्धात एकाच गट लष्करीदृष्ट्या प्रबळ आहे , ,तर दुसरा गट अन्य देशांच्या मदतीने दुसऱ्या गटाशी लढायचा प्रयत्न करत आहे . त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता या वेळी खूपच कमी प्रमाणात आहे मात्र तशी स्थिती त्यावेळी नव्हती . 

      तर मित्रानो मी ज्या क्युबन क्रयसिसची गोष्ट करत आहे तो घडला १६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर १९६२ (

याच काळात चीनने आपल्या भारतावर आक्रमण केले होते ) या १२ / १३ दिवसात . या काळात अमेरिकेच्या अगदी जवळ त्यावेळच्या युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाची  आण्विक क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली होती . तसेच आणखी तैनात होण्याचा धोका निर्माण झाला होता अमेरिकेच्या दक्षिणेकडे अत्यंत जवळ ही क्षेपणास्त्र तैनात केली गेली असल्याने अमेरिकेने देखील आपल्या बचावासाठी या क्षेपणास्त्राणावर हल्ला करण्याची योजना आखली होती  मात्र आपल्या सर्व जगाच्या सुदैवाने अमेरिकेला आपली योजना पूर्ण करावी लागेल अशी वेळच आली नाही .जर तशी वेळ आली असती तर मात्र जगाचा बारातच मोठा भूभाग बेचिराख झाला असता हे नक्की . हे सगळे नाट्य घडले अमेरिकेच्या फ्लोरिडा या राज्याच्या किनाऱ्यापासून फक्त १५० किलोमीटरवर असणाऱ्या क्युबा या देशाच्या समुद्री हद्दीत .

  मूळ नाट्य जरी १२ ते १३ दिवसात पूर्ण झालेले असले तरी या सुरवात सन १९५१ सालीच झाली. होती . १८९८ साली स्पेनकडून अमेरिकेला हस्तांतरण झालेल्या क्युबाला १९०२ मध्ये पूर्ण स्वतंत्र मिळाले त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करत १९५१ पर्यंत तेथील सरकारने कारभार केला . १९५१ मध्ये तिथे साम्यवादी क्रांतीची सुरवात झाली ज्याची सांगता १९५८ साली तेथील  भांडवलशाली विचारसरणीचा पराभव होऊन साम्यवादी विचारसरणीची शासनव्यवस्था आली .भांडवलशाही विचारसरणीचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या अमेरिकेपासून  जेमतेम हाताच्या अंतरावरील या देशात आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध विचारसरणीचे सरकार येणे अमेरिकेला रुचणारे नव्हतेच (आताही आपल्या प्रभाव क्षेत्रातील युक्रेनमध्ये अमेरिका हस्तक्षेप करत असल्याने रशिया चवताळला आहे )  त्यामुळे छुप्या पद्धतीने अमेरिकेने क्युबातील भांडवलशाहीला मदत करत क्युबा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला क्युबातील भांडवलशाली पूरक गट लढत आहेत असे दाखवून प्रत्यक्षात अमेरिकाच क्युबातील साम्यवादी सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहिली जे १९६२ पर्यंत खूपच व्यापक झाले आणि यात युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाला उडी  घ्यावी लागली  युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया का साम्यवादाचा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि त्यावेळी क्युबा (आणि आता सुद्धा ) साम्यवादी विचारसरणीचे राष्ट्र होता त्यामुळे

क्युबा आपला भाऊ आहे असे समजून  युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने आम्ही या नव्या देशाला अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची मदत करत आहोत असे भासवत क्युबामध्ये आपली क्षेपणास्त्र  देण्यास  सुरवात केली जहाजात धान्याच्या पोत्यांखाली हि शस्त्रात्रे लपवली असत . असे काहीतरी होत आहे याची अमेरिकेला कुणकुण लागताच अमेरिकेच्या सिक्रेट इंटेलिजियन्स एजन्सी ( सी आय ए नावाने प्रसिद्ध ) ने केलेल्या गुप्त कारवाईत ही गोष्ट अमेरिकेला समजली तसेच आणखी क्षेपणास्त्र येत असल्याचे समजल्यावर या नाट्याचा अखेरचा प्रवेश सुरु झाला जो  घडला १६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर १९६२ या काळात 

या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते जॉन एफ केनडी .त्यांच्या समोर या समस्येचा निपटारा करण्यासाठी तीन उपाय होते पहिला जो पर्यंत समोरून काही कृती करणे पर्यंत शांत राहणे  ज्यामध्ये आक्रमण झाल्यावर त्यांच्यावर प्रचंड टीका होणार होण्याचा धोका होता  दुसरा होता  क्युबावर सरळ आक्रमण करणे  मात्र यामध्ये अमेरिकेला युद्धखोर जाहीर केले जाण्याचा धोका होता . तिसरा त्यांची रसद तोडणे आणि त्यांच्याशी या बाबत चर्चा करणे अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ केनडी यांनी तिसरा मार्ग स्वीकारला त्यानुसार त्यांनी अमेरिकेनं नौदल फ्लोरिडा आणि क्युबन समुद्रात तैनात केले ज्यामुळे युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियास राग आला या नाट्याची सुरवात जरी १६ ऑक्टोबर १९६२ ला  झाली तरी २२ ऑक्टोबर नंतर या नाट्यात अनेक घडामोडी घडल्या ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघात या बाबत व्यापक चर्चा युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाबरोबर , क्युबा या देशावर हल्ला ना करणे या बाबतचा करार आदी घडामोंडीचा समावेश होतो 

       अमेरिकेच्या विरोधाला त्यावेळच्या युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी काही अनुचित प्रतिसाद दिला असता तर दोन्ही देशाकडून क्षेपणास्त्र परस्परांवर डागून  जग १००% तिसऱ्या महायुद्धात लोटले गेले असते युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने क्युबाला मदत करण्यामागे अमेरिकेने इटली आणि तुर्कीये ( पूर्वीचे नाव तुर्की ) या देशात क्षेपणास्त्र तैनात करण्याचा राग देखील होता . सध्याच्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध याच क्युबन क्रायसिसचाच भाग दुसरा असे म्हणायला हरकत नाही मात्र हा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा खूपच शांत आहे आपल्या भारतातील काही लोक शिकायला या देशात आहे म्हणून भारतीय वृत्तवाहिन्या याला इतके महत्व देत आहेत अन्यथा टॉप १०० मध्ये एका मिनिटाचे कव्हरेज याला मिळाले असते असो हे युद्ध लवकरात लवकर संपुष्ट येवो हि ईश्वरचरणी प्रार्थना .  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?