भारतीय रेल्वेची गरुडझेप

 


             शुक्रवारी भारतीय रेल्वेने एक फार  मोठी गरुडझेप गाठली .  विस्ताराबाबत जगातील चौथ्या क्रमांकाची  आणि कर्मचाऱ्यांबाबत जगातील पहिल्या क्रमांकाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या,  आपल्या भारतीय रेल्वचा  कलंक असलेल्या, अपघाताला सोडचिठ्ठी  देण्याचा,  प्रयत्न गेल्या काही  वर्षांपासून केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत एकाच रेल्वेरुळावर समोरासमोर येणाऱ्या, रेल्वे इंजिनाची टक्कर होवून अपघात होवू नये, यासाठी कवच या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या, रेल्वे प्रणालीची शुक्रवारी  यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता रेल्वेच्या   रेल्वेमार्गावर ही प्रणाली बसवण्यात येईल. अनेक देशांंमध्ये या सारखी प्रणाली या आधीच कार्यान्वित असली तरी, त्यासाठी प्रतीकिमी 2कोटी रुपये खर्च होतो.तर भारतीय रेल्वेत आगामी काळात वापरली जाणाऱ्या कवच या प्रणालीस या खर्च्याचा 25% म्हणजेच फक्त 50लाख रुपये खर्च होणार आहे. म्हणजेच पाश्चात्य देशात एक किमीसाठी लागणाऱ्या खर्चात भारतात चार किमीसाठी ही सुरक्षा प्रणाली वापरली जावू शकते. चालू आर्थिक वर्षात 2000किमी रेल्वेमार्गावर ही प्रणाली बसवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. या 2000किमी मध्ये  नवी दिल्ली ते हावडा आणि नवी दिल्ली ते मुंबई या मार्गावर ही प्रणाली पहिल्यांदा अमंलात येइल. मुंबईहुन नवी दिल्ली जाण्यासाठी सुरत, रतलाम मार्गे पश्चिम रेल्वेचा तर भुसावळ इटारसी मार्गे मध्य रेल्वेचा मार्ग आहे. त्यातील कोणत्या मुंबई नवी दिल्ली मार्गावर ही यंत्रणा सर्वप्रथम बसवण्यात येईल, याबाबत केंद्र सरकारने हा लेख लिहीत असताना माहिती दिली नव्हती.

 सध्याचे सरकार आत्मनिर्भर योजनेतंर्गत विविध प्रकारच्या उपकणांची निर्मिती भारतीय संसाधनातून करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांचा पाठीसी खंबीरपणे उभे राहण्याचा, सध्याचा केंद्र सरकारचा प्रघात याही चाचणीचा वेळी दिसून आला.याच्या आधी रेल्वे चाचणीच्या वेळी रेल्वेमंत्र्यांनी त्यांचा कक्षात बसून चाचणीचा कामाचा आढावा घेत,मात्र यावेळी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव   यांनी प्रत्यक्ष रेल्वे इंजिनात बसून याची चाचणी घेतली.प्रत्यक्ष रेल्वेमंत्री या चाचणीत सहभागी होत असल्याने याचे महत्व खुप मोठे आहे. दक्षीण मध्य रेल्वे या विभागात येणाऱ्या सिकंदराबाद ते चितगीगड्डा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान ही चाचणी यशस्वी ठरली. दक्षीण मध्य रेल्वे यासाठी विशेष प्रयत्नील.होती तीला यश मिळाल्याचे या यशस्वी चाचणीतून स्पष्ट झाले आहे.रेल्वेची एक उपकंपनी असलेल्या रिसर्च अँड स्टँटेस्टिक डेव्हलपमेंट आँरगनायझेशन या उपकंपनीचे या कामात मोठे साह्य झाले आहे.

यासाठी रेल्वे इंजीनावर जिपिसी यंत्रणा, आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकर लावण्यात येईल .ज्यामुळे  प्रत्येक वेळी दोनदा तपासून रेल्वे इंजिनाचे स्थान कळत राहिल.जी माहिती रेल्वे इंजिनाच्या जवळच्या सिग्नल प्रणालीस कळवण्यात येईल. जेव्हा एकाच ट्रकवर दोन रेल्वे इंजिने येतील तेव्हा त्याच्यातील सिग्नल लाल होवून कवच प्रणाली सक्रीय होवून रेल्वेला ब्रेक लावण्याचे कार्य सुरु होईल, ज्यामुळे दोन रेल्वेच्या इंजिनाची टक्कर होणे टळले जाईल.

भारतीय रेल्वे हे तंत्रज्ञान अन्य देशाच्या  तूलनेत स्वस्तात उपलब्ध असल्याने अन्य देशांना विकू देखील शकते.ज्यामुळे भारताला परकीय चलन देखील मिळू शकते.म्हणजेच रेल्वे सुरक्षीत होण्याबरोबर परकीय

चलन.देखील यामुळे उपलब्ध होवू शकते.भारताला हा दुहेरी फायदा आहे.

कोणत्याही देशाच्या प्रगतीत त्या देशातील रेल्वेचे मोठे योगदान असते.भारतीय रेल्वेत.होणाऱ्या या बदलामुळे भारताची प्रगतीची एक्सप्रेस देखील सुसाट वेगाने धावायला लागेल, हेच यातून सिद्ध होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?