महिला बुद्धिबळपटूची गरुडझेप

       

  सध्या सर्व भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक भारतात सुरक्षितपणे कशे परत येतील याच्या चिंतेत असताना  मन प्रसन्न करणारी बातमी भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रातून येत आहे नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या ४७ व्या  राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय प्रियंका नुटक्की या आंध्र प्रदेशातील बुद्धिबळपटूने महिला ग्रँडमास्टर हा 'किताब मिळवला, हीच ती आनंदाची बातमी प्रियंका नुटक्की भारताच्या २३ व्य महिला ग्रँडमास्टर आहेत याचा काही महिने आधीच नागपूरच्या दिव्या देशमुख या भारताच्या २२  व्या महिला ग्रँडमास्टर झाल्या होत्या (  भुवनेश्वर येथे झालेल्या  राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद त्यांनीच मिळवले आहे ) काही महिन्याच्या अंतराने भारताला दोन महिला ग्रँडमास्टर मिळाल्याने भारताच्या  बुद्धिबळ क्षेत्रात महिला देखील आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वच क्षेत्रात अधिक समस्येला तोंड द्यावे लागते त्यापासून बुद्धिबळ क्षेत्र देखील सुटलेले नाही त्याच पार्श्वभूमीवर हे यश जोखायला हवे 
        त्यांनी त्यांचा पहिला ग्रँडमास्टर नॉब जानेवारी २०१९ मध्ये मिळवला त्यांनतर पुढील दोन महिन्यांतच त्यांनी ग्रँडमास्टर पदासाठी आवश्यक असणाऱ्या 2300 फिडे रेटिंगचा निकष पूर्ण केला मात्र इतर बर्‍याच खेळाडूंप्रमाणे, कोविड -19 साथीच्या रोगाने त्यांना पुढील निकष पूर्ण करण्यास उशीर केला जानेवारी २०१९ मध्ये सुरवातीचे दोन डाव गमावून सुद्धा त्यांनी  Rilton Cup मध्ये पुढील फेऱ्यात पुनरागमन करत विविध देशातील ग्रँडमास्टर आणि इंटरनॅथनल मास्टरला धूळ चारत स्पर्धेच्या अखेरीस ९ फेऱ्यांमध्ये साडेपाच गुण मिळवत त्यांनी महिला ग्रँडमास्टर पदाचा पहिला निकष पूर्ण केला 
सन २०२० मध्ये राष्ट्रीय संघ स्पर्धेत मध्ये AAI साठी दुसरे स्थान पूर्ण केल्यानंतर, त्या प्रत्यक्ष पटावर खेळू शकल्या नाहीत कारण बहुतेक कार्यक्रम एकतर रद्द झाले किंवा नियोजित वेळापत्रकाच्या ऐवजी खूप दिवसानी सुरु झाले आणि प्रवासावर निर्बंध आले. ऑक्‍टोबर 2021 मध्ये चेसमूड ओपनमध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाटावर
खेळण्यास सुरवात केली.
२०२१ वर्षातील तिसर्‍या ओव्हर-द-बोर्ड टूर्नामेंटमध्ये, त्यांनी 7व्या सनवे सिटजेस ओपन 2021 मध्ये त्यांचा महिला ग्रँडमास्तरपदासाठीचा दुसरा तर पहिला IM-नॉर्म मिळवला.
त्यावेळी त्यांनी अनेक दिग्गज बुद्धीपटूंना नमवले
प्रियांका  नुटक्की यांनी तिसरा निकष ४७ व्या राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ९ डावात ७ गुण मिळवत प्राप्त केला त्या या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या . या स्पर्धेअखेर त्यांचे फिडे गुणकन सुद्धा वाढून २३४८ झाले आहे 
भारतीय महिला क्रिकेट संघ एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असताना  महिला बुद्धिबळपटूंनी देखील चमकदार कामगिरी करत सी फॉर क्रिकेट बरोबर सी फॉर चेस हे सुद्धा दाखवून दिले आहे हेच यटाऊन सिद्ध होत आहे हि विजयी पताका अशीच दौलत राहो हि ईश्वरचरणी प्रार्थना 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?