आगीतून फुफाट्यात श्रीलंका

         


  जेव्हा एखाद्यवर एकामागून एक  अशी अनेक संकटे येण्यास सुरवात होते तेव्हा त्याची अवस्था  आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी झाली आहे असे आपण म्हणतो .सध्या श्रीलंकेची अवस्था देखील काहीशी अशीच झाली आहे श्रीलंकेचे आर्थिक संकट दिवसोंदिवस अधिकच गंभीर होत असल्याने  श्रीलंका सध्या  आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव घेत आहे मार्चच्या सुरवातीपासून  श्रीलंकन सरकारने संपूर्ण देशात साडेसात तास हो साडेसात तासाचे लोडशेडिंग सुरु केले आहे सध्या श्रीलंकेत प्रचंड उन्हाळा असल्याने जलविद्युत बंद आहे . नैसर्गिक इंधने खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने नैसर्गिक इंधनाचे कंटनेर श्रीलंकन बंदरात उभे आहेत मात्र पैसे न दिल्याने कंटनेरमधील नैसर्गिक इंधने श्रीलंकेला वापरता येत नाहीये . परिणामी गेल्या २६ वर्षात झाले नाही असे ऊर्जा संकट श्रीलंकेत निर्माण झाले आहे तेथील नागरिक पेट्रोल पंपावर आता तरी पेट्रोल डिझेल मिळेल या आशेवर तासनतास आपली वाहने उभी करून बसले आहेत . तेथील मासेमारी नौकांना डिझेल मिळत नसल्याने श्रीलंकेतील मच्छव्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे जो देश सुद्धा आर्थिक संकटात आहे अश्या पाकिस्तानकडून मदत मागण्याची वेळ श्रीलंकेवर आली आहे . आम्ही जगाकडे दोन भाकऱ्यांची मागणी करतो दीड   भाकरी आम्ही खातो अर्धी  भाकरी तुम्ही खा  या पद्धतीने पाकिस्तान श्रीलंकेला मदत करत आहे  

 देशाची आर्थिक स्थिती फारशी उत्तम नसली तरी तेथील सरकारने परिस्थिपुढे हात टेकलेले नाहीत श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेच्या  (आपल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या समकक्ष ) गव्हनरने आम्ही लवकरच या आर्थिक संकटातून बाहेर पडू मात्र त्यासाठी कारवायांच्या उपाययोजननमुळे लोकांना कडू औषधाचा डॉस घ्यावा लागेल असे सांगून आगामी काळात श्रीलंका सरकार मोठी पाऊले उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे सरकार आयएमएफची मदत न घेण्यावर ठाम असल्याने, त्यांनी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पर्यायी मार्गांबाबत श्रीलंका सरकार विविध पर्याय अजमावून बघत आहे . श्रीलंकेच्या सरकार त्याचे अनेक करांचे दर कमी करणे , काही कर रद्द करणे आदी लोकांना आवडणारे निर्यय  आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या सांगण्यावरून रद्द करण्यास तयार नाही त्यामुळे श्रीलंका सरकार आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाण्यास तयार नाही  देशाची आर्थिक स्थिती गेली चुलीत स्वःताची सत्ता टिकायला पाहिजे असेच काहीसे श्रीलंकन सरकारचे वागणे आहे . 

.     संकटाची तीव्रता लक्षात घेता, बाह्य वित्तपुरवठा अंतर भरून काढण्यासाठी आयात मर्यादित करणे पुरेसे नव्हते. हिंदी महासागरातील बेटाच्या स्वरूपात असणाऱ्या  श्रीलंकेला  परकीय चलनाचा ओघ वाढवण्याचे नेहमीच्या तुलनेत अन्य  मार्ग शोधण्याची गरज होती. .या पार्श्‍वभूमीवर, श्रीलंकन  सरकारने भारत आणि चीन या दोन 

जागतिक स्पर्धकांकडून पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली. श्रीलंकेचे या दोन्ही देशांशी अनेक दशकांपासून मजबूत आर्थिक संबंध आहेत; विशेषत: चीनसोबतचे आर्थिक संबंध गेल्या 20 वर्षांमध्ये अधिक घट्ट झाले आहेत, चीन श्रीलंकेला सर्वात मोठा द्विपक्षीय कर्ज देणारा आणि FDI प्रदाता म्हणून उदयास आला आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि देशातील इतर अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चीन आणि भारत या दोन्ही देशांकडून आर्थिक मदतीची विनंती केली.भारताने या आवाहनाला सकारत्मक प्रतिसाद देत स्वतः श्रीलंकेच्या दळणवळणं क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली तसेच अन्य समविचारी देशांना देखील श्रीलंकेत परदेशी गुंतवणूक करण्यास सांगितले चीन तर श्रीलंकन सरकारला पैशाच्या राशी घेऊन उभाच  आहे. हा लेख लिहण्यापर्यंत श्रीलंकेला चीनने काही आर्थिक मदत केल्याचे वृत्त नाही 

    श्रीलंकेची अर्थव्यवस्था देशातील श्रुष्टि सौदर्य बघायला आलेल्या परदेशी नागरिकांवर आणि चहाच्या निर्यातीवर अवलुबुन आहे . दोन्ही गोष्टीत  श्रीलंकेचा सर्वात मोठे  साथीदार हे  रशिया आणि युक्रेन आहे  श्रीलंकेला भेट देणाऱ्या पहिल्या दोन परदेशी नागरिकांमध्ये याच दोन देशांचे नागरिक असतात . तसेच श्रीलंकेची सर्वात जास्त चहाची निर्यात  याच दोन देशांना होते .  सध्या कोव्हीड १९ मुळे थांबलेले पर्यटन पुन्हा सुरु होत असले तरी श्रीलंकेचे दोन मोठे साथीदार श्रीलंकेला मदत करण्याचा मनस्थितीत नाहीत त्यामुळे परंदेशी नागरिकांच्या  ओघ पूर्वीसारखा येण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना श्रीलंकेला आकृष्ट करावे लागेल तीच गोष्ट चहाबाबत आहे 

WION NEWS या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीबाबत तेथील सरकाने अमलात आणलेल्या निणर्याबाबत तेथील मोजकेच का होईना लोक निषेधाचे पोस्टर हातात घेऊन विरोध करत आहे आजमितीस या लोकांचे प्रमाण अत्यंत तुरळक असले तरी या लोकांमध्ये कधीही मोठी भर पडू शकते श्रीलंकेतील राजकीय संकट आपल्या भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते श्रीलंकेत अनेक भारतीय वंशाचे लोक

राहतात . तामिळनाडू येथील राजकारणात श्रीलंकेतील तामिळी लोक हा मोठा संवदेनशील विषय असतो सबब भारतासाठी सुद्धा हा विषय महत्वाचं ठरतो त्यामुळे तेथील या बदलांकडे दुर्लक्षून चालणार नाही आपण आपला एक उमदा पंतप्रधान यामुळे गमावला आहे त्यामुळे तेथील आर्थिक संकटामुळे तिथे काही राजकीय संकट निर्माण न होवो यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हवी त्यातच भारताचे हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?