कधी येणार आपल्या अजेंड्यावर हवामान बदल?

         


   सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर रशिया युक्रेन युद्धाबाबतचे अत्यंत हास्यास्पद वाटाव्या अश्या बातम्या किंवा विविध  राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप  आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या बाबत असणाऱ्या बातम्यांचा महापूर आपल्याकडे आणत असताना आपल्या महाराष्ट्रातील एक खूप मोठा भूभाग बेमोसमी पावसामुळे त्रस्त झालेला आहे  आणि हा भूभाग या २०२२ या वर्षीच बेमोसमी पावसाने त्रासलेला आहे असे नाही गेल्या काही वर्षाच्या इतिहास बघितला तर आपणास महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे .नारद भगवान विष्णूंना विचारताय .भगवान हे काय ? त्यावेसेस नारद मार्च एंडिंग आहे हिशोब पूर्ण करायला लागणारच ना ?असे उत्तर भगवान  विष्णू नारदांना देत आहेत  किंवा स्वेटर घालू कि रेनकोट?  असा प्रश्न मला पडलाय हिवाळा अधिक पावसाळा बरोबर हिवासाळा हा ऋतू असे अनेक व्यगंचित्र कोट्या आपण समाज  माध्यमांमध्ये अनेक वर्षांपासून करत आलेलो आहोत . मात्र तरीही समाजाच्या अजेंडयावर हवामान बदल हा विषय दिसत नाहीये . नाही म्हणायला काही प्रमाणात सरकारी पातळीवर , काही गैर सरकारी सामाजिक संस्था हवामान बदल या बाबत काही कार्य करत आहेत हवामान बदलाविषयी आपली पाटी एकदम कोरी आहे असे नाही . मात्र हे प्रयत्न समस्येच्या तुलनेत खूपच कमी आहेत सध्या होत आहेत त्यापेक्षा खूपच जास्त प्रयत्न होणे आवश्यक आहे 

           बेमोसमी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन संबंधितांना नुकसान भरपाई देणे ही तात्पुरती मलमपट्टी झाली ती आवश्यक आहेच मात्र अशी  तात्पुरती मलमपट्टी किती दिवस करणार?  यालाही मर्यादा आहेत गरज आहे या बदलत्या हवामानाला सक्षमपणे तोंड देऊ शकतील अशी पीक पद्धती शेतकऱयांच्या बांधावर नेण्याची . कृषी विद्यापीठात बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकेल  अशी पिके विकसित केली जात असली तरी त्याचा शेताच्या बांधावर किती प्रत्यक्ष उपयोग होतो ? याचा अभ्यास केल्यास समोर येणारे चित्र फारसेदिलासादायक नाही असे खेदाने म्हणावे लागते . या बदलत्या हवामानाला तोंड देणारा शेतकरी तयार करण्याचे आवाहन आपल्यापुढे आहे मात्र याविषयी फारच कमी बोलले जाते .शेतकऱ्यांच्या  आत्महत्या , त्यांची कर्जमाफी याबाबतच बोलले जाते मात्र या बदलत्या हवामानाला  तोंड देणारा शेतकरी उभा करणे हे सुद्धा आपले आव्हान आहे सरकारला त्याबाबत भाग पाडले पाहिजे याबाबत विरोधी पक्ष सरकारवर काहीच दबाव टाकताना दिसत नाहीये . 

जर्मनी फ्रांस अमेरिका  या देशातील निवडणुकामध्ये खूप वर्षांपासून बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी काय तरतुदी आहेत यावर मतदान होते तेथील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात बदलते हवामान हा मुद्दा असतो . आपल्याकडे या बाबतचे चित्र काय असते हे आपणास माहिती आहेच जर बदलत्या हवामानामुळे त्रास होणाऱ्या लोकांचा संख्येचा विचार केला असता त्यांच्या देशातील एकूण लोकसंख्येच्या कितीतरी जास्त लोक आपल्याकडे एका हवामान बदलाच्या एका घटनेमुळे भरडले जातात . आणि एका वर्षात अश्या आपाल्याकडे किमान तीन ते चार घटना घडतातच मात्र आपल्याकडे या बाबत काय होते ? हे आपणास माहिती आहेच मागच्या वर्षी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या जागतिक हवामान बदलाच्या वार्षिक परिषेदेच्यावेळी येत्या काळात जागतिक हवामान बदलामुळे

जगात सर्वाधिक लोक भारतात विस्थापित होणार आहेत असा अहवाल प्रसिद्ध झाला होता मात्र यावेळीच जी २० या संस्थेचे सुद्धा वार्षिक अधिवेशन होते त्या अधिवेशनात पंतप्रधान मोदी काही राष्ट्र प्रमुखांना भेटणार होते त्या विषयी बातम्या देताना हा महत्वाचा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण उत्तम झाले आणि अशा काही अहवाल होता याचेच बहुसंख्याना विस्मरण झाले त्यामुले त्यातील धोक्याबाबत चर्चा होणे तर दूरच 

आपल्याकडील हवामान बदलाच्या घटनांमुळे आणि त्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनामुळे कधी येणार खऱ्या अर्थाने  आपल्या अजेंड्यावर हवामान बदल? हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे तो लवकरात लवकर येण्यातच आपले हिट आहे , हे नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?