भारतात रंगणार ६४ घरांचे ऑलम्पियाड

       

       रशिया आणि युक्रेन या मधील युद्धाचे परिणाम आता जाणवायला सुरवात झाली आहे आक्रमक असणाऱ्या रशियाला अद्दल घडण्यासाठी रशियावर विविध आर्थिक बंधने तर लादली जात आहेत .  याच बंधनाच्या मालिकेत  विविध खेळाच्या संघटना देखील रशियाला आपल्या खेळाच्या संघटनेतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवत आहे . . खेळाच्या संघटनेतून बाहेर पडत असल्याने आगामी काळात रशियात होणाऱ्या खेळांचे आयोजन कुठे करायचे ? या बाबत  विविध पर्याय सध्या खेळाच्या संघटनांकडून  अजमावून बघितले जात आहेत .या स्पर्धा आयोजनाच्या चक्रात बुद्धिबळ ऑलम्पियाड देखील सापडले होते . मात्र या चक्रातून बुद्धिबळाची सहीसलामत सुटका झाली आहे . ४४ वे बुद्धिबळ ऑलम्पियाड आपल्या भारतात महाबलीपूरम येथे होणार आहे याच्या तारखा हा मजकूर लिहण्यापर्यंत जाहीर झालेल्या नाहीत तुम्ही हा मजकूर वाचेपर्यंत कदाचित त्या जाहीर झालेल्या असतील मात्र बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अर्थत फिडेच्या संकेतस्थळावर दिलेल्या बातमीनुसार त्या या वर्षीच्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडा या दरम्यान बुद्धिबळाचे ऑलम्पियाड होईल जे मुळातील २२ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीच्या जवळच आहे सन २०१३मध्ये चेन्नईत  बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा झाली होती त्यांनतर आतापर्यन्त सुमारे ९ वर्षे भारतात एकाही  जागतिक  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते ९ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या जागतिक  स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेमुळे समस्त भारतीय बुद्धिबळ विश्व आनंदून गेले आहे 
           १९२४ साली झालेल्या पॅरिस ऑलम्पियाडच्याशेवटच्या दिवशी अर्थात  रविवार २० जुलै १९२४ रोजी बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाल्यावर या संघटनेकडून अर्थात फिडे कडून सन १९२७ साली जगातील पहिले अधिकृत बुद्धिबळ ऑलम्पियाड भरवण्यात आले त्यानंतर कधी दोन वर्ष कधी एका वर्षाच्या अवधीने फिडेकडून बुद्धिबळ ऑलम्पियाड भरवण्यास सुरवात करण्यात आली मात्र सन १९५० च्या नवव्या
बुद्धिबळ ऑलम्पियाडनंतर दर दोन वर्षांनी नियमितपणे बुद्धिबळचे ओलम्पियाडचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे कडून करण्यात येत आहे या स्पर्धेत विविध अश्या सुमारे १९०  देशाचे संघ सहभागी होतात .त्यातील बुद्धिबळपटू आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर मात करत देशासाठी गुणांची कमाई करतात स्पर्धेच्या शेवटी सर्वात जास्त गुण असलेल्या देशाला सुवर्ण त्या खालोखाल गुण असणाऱ्या देशाला रौप्य तर तिसऱ्या स्थानावरील देशाला कास्य पदकाने गौरवण्यात येते 
            बुद्धिबळ  ऑलम्पियाडच्या पदक तालिकेवर नजर टाकल्यास त्यास २३ देशांच्या प्रामुख्याने सहभाग दिसून येतो भारत १ सुवर्ण आणि २ कास्य पदकासह या पदक पालिकेत ११ व्या स्थानी आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी अभिनंदनास्पद बाब म्हणजे बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या भारताच्या संघाच्या कप्तानाची जवाबदारी नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी करत आहेत .एक नाशिकर आपल्या भारताचे नेर्तृत्व करत आहे ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिनंदनाची गोष्ट नाही का ?  
ऑल इंडिया चेस फेडरेशन ( AICF या नावाने प्रसिद्ध ) चे सचिव भरत सिंह चौहान, जे फिडे टेक्निकल कमिशन (TEC) चे अध्यक्ष देखील आहेत, यांनी या बाबत बोलताना अलिकडच्या वर्षांत त्यांनी वैयक्तिकरित्या आणि त्यांच्या टीमने आधीच मिळवलेल्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले. "दिल्ली बुद्धिबळ ओपन या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचा अनुभव खूप मदत करेल, कारण आम्ही आधीच या स्पर्धेतील अनुभवांच्या ऑलम्पियाडच्या आयोजनात फायदाच होईल पण ऑलिम्पियाड हा एक मोठा खेळ आहे. मला खात्री आहे की आम्ही ते सर्वोत्तम बनवू, "ते म्हणाले
भारतात मोठ्या जागतिक स्तरावरील खेळांचे आयोजन अत्यंत कमी होते परिणामी खेळप्रेमी जागतिक स्तरावरील खेळाडूंच्या खेळ बघू शकत नाहीत हादुष्काळ या बुद्धिबळ ऑलम्पियाडमुळे संपण्यास हातभार लागेलच ज्याचा फायदा मुळातील भारतीय असणाऱ्या या खेळाच्या भारताचं अधिक प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल हे नक्की

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?