पाकिस्तान अस्थिरतेच्या चक्रव्युहात !

     


    आपल्या भारताच्या शेजारील पाकिस्तान हा देश अस्थिरतेच्या  चक्रव्युहात पूर्णपणे अडकल्याचे,  तेथील बातम्यांनुसार दिसत आहे. येत्या २७ मार्चला होणाऱ्या इम्रान खान  यांच्या अविश्वास ठरावात इम्रान खान यांची सत्ता जाण्याची शक्यता ७५ % आहे अशा अंदाज  या बाबतच्या  आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येणाऱ्या  बातम्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे . इम्रान खान यांनी  निवडणुकीसाठी उमेदवार देताना,  त्यांच्या पाकिस्तान  तेहरीके के इन्साफ या पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी,  अन्य पक्षातून येणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी दिली . अन्य पक्षातील व्यक्ती पाकिस्तान तेहरीके इन्साफ हा पक्ष जिंकू शकेल ज्यामुळे आपणास नॅशनल असेम्ब्लीमध्ये ( आपल्या लोकसभा समकक्ष सभागृहाला पाकिस्तानमध्ये नॅशनल असेम्ब्ली म्हणतात ) जात येईल असा विचार करून इम्रान खान यांच्या पक्षात येत होत्या . इम्रान खान यांचे जहाज बुडू शकते असे समजल्यावर या लोकांनी त्यांच्या पक्षातून बाहेर पडत विरोधकांशी हातमिळवणी सुरु केली आहे . ज्यामुळे कागदावर जरी इम्रान  खान यांचे संख्याबळ दिसत असले तरी वास्तवात इम्रान खान हे अविश्वास ठरावामुळे सत्ता सोडणारे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित झाल्याचे मत आंतराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त होत आहे 

सिंध प्रांतात सत्ता असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी तर्फ पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद  येथील सिंध हाऊस  मध्ये लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार केल्याचे उघड झाल्यावर पाकिस्तानमधील राजकारणात उलथा पालथं होणार हे जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त एक्सप्रेस ट्रीब्युन या दैनिकाने दिले आहे . पाकिस्तानी राजकारणात मौलाना डिझेल या नावाने प्रसिद्ध असलेल्या फाझम रेहमान या मौलाना यांची भूमिका या सत्ततरणाच्या नाटयत महत्वाची ठरणार आहे . मौलाना फाझल रेहमान उर्फ मौलाना डिझेल हे त्यांच्या राजकारणातील भुमीका सातत्याने बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत . मागील सत्ताधीशांच्या काळात त्यांना डिझेल विषयी मोठे कंत्राट मिळाल्याने मौलाना फाझल रेहहमान हे मौलाना डिझेल या नावाने प्रसिद्ध आहेत . तसे बघता मौलाना ही धार्मिक पदवी मात्र आजमितीस पाकिस्तानात अनेक मौलाना राजकारणात आहेत त्यातीलच एक प्रसिद्ध मौलाना म्हणजे मौलाना डिझेल होय . 

पाकिस्तानात सत्तांतरण झाल्यास त्याचे भारतावर प्रचंड मोठे परिणाम होणार , हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे . वासरात लंगडी गाय  शहाणी या न्यायाने पाकिस्तानमधील इतर राजकारण्यांपेक्षा इम्रान खान हे चांगले आहेत . मौलाना डिझेल हे कट्टर आहेत तहरिके लब्बेक पाकिस्तान या कट्टर संघटनेवर सध्या पाकिस्तानत कागदोपत्री बंदी आहे त्यावरची बंदी  इम्रान खान यांचे सरकार गेल्यास हटू शकते जर असे झाल्यास कट्टरतेला  पाकिस्तानात स्वर्ग दोन बोटेच शिल्लक राहील ज्याचा फायदा पाकिस्तानमधील शिया आणि अहमेदयीया या मुस्लिम बांधवांतील अल्पसंख्यकांबरोबर हिंदू शीख खिश्चन याना बसू शकतो आपण पाकिस्तान इस्लाम हा प्रमुख देश मानतो तरी पाकिस्तानचे अधिकृत नाव सुन्नी इस्लमिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असे आहे या नावातील सुन्नी इस्लामिक हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे सुन्नी सोडून इस्लाममधील अन्य पंथ पाकिस्तानात सध्या अत्यंत त्रास भोगत आहे काही दिवसांपूर्वीच तेथील शिया बांधवांच्या मशिदीमध्ये शुक्रवारच्या पवित्र नमाजदरम्यान बॉम्ब स्फोट झाला होता हे आपण लक्षात घेयला हवे . पाकिस्तानने अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या कासमोर मधील गिलगीत  बाल्टिस्तान या भागात शिया मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे  ते कमी करण्यासाठी सुन्नी मुसलमीम बांधवांची संख्या पाकिस्तान सरकार कृत्रिमपणे ती वाढवत आहे ज्यामुळे येथे अनेकदा दंगे होतात हेही आपण लक्षात घेयला यावे .  पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरता वाढेल असे आपण म्हणतो तेव्हा ती सुन्नी कट्टरता असे समजण्याची गरज आहे या सुन्नी कट्टरतेची झाला न्या पंथीय मुस्लिम व्यक्तींना देखील बसेल हे नक्की 

भारताचा विचार करता भारताची पश्चिम सीमा अस्थिर झाल्याने त्याचा काहीसा परिणाम काश्मीरमधील दहशतवादी करावया वाढण्यात होऊ शकतो जे भारतासाठी काहीसे अशांतेचे ठरू शकते तसेही पाकिस्तानला राजकीय अशांतेची मोठी परंपरा असल्याने पाकिस्तानी जनतेला काहीही फरक पडणार नाहीत्यांचे दुःख आहे तिथेच राहिला हे नक्की  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?