भारत जपान मैत्रीचा नवा सेतू

         


    जपान , उगवत्या सूर्याचा देश , जगात सर्वाधिक भूकंप होणारा देश , भारताच्या चीनविरोधी आघाडीतील महत्त्वाचा देश , जुन्या हिंदी चित्रपटातील    सिने दिगर्शक ज्या देशाच्या अल्पावधीत झालेल्या प्रगतीमुळे  भारावून गेले तो देश म्हणजे जपान , आत्ताआत्ता पर्यंत भारतातील बाळ गोपाळांच्या करमणुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या डोरेमॉन , सिंच्यान निज्जा हतोरी आदी अनेक कार्टून चा निर्माता असणारा देश म्हणजे जपान , स्वामी विवेकानंद यांनी ज्या२ देशाचा उल्लेख सध्या ते  निद्रिस्त  ड्रॅगन  आहेत जे उठल्यावर   जगाची झोप उडवतील अशा उल्लेख केला होता त्यातील एक देश म्हणजे जपान . ज्या देशाबरोबर आपल्या भारताच्या नियमित बैठका होतात अश्या जगातील मोजक्या देशांपैकी एक म्हणजे जपान ज्या देशाच्या तांत्रिक साह्यावर आपल्याकडे अनेक सोईसुविधा उभारण्याचे कार्य सुरु आहे तो देश म्हणजे जपान .तर अश्या जपानचे पंतप्रधान  फुमिओ किंशिंदा   हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून १९ आणि २०मार्चला  ला, भारतात आले होते  सन २०१४ पासून नियमितपणे भारत जपान यांच्यात वार्षिक बैठका होतात   त्याच्या १४ व्य अधिवेशनासाठी ते आले होते  मार्च २०२२ साली झालेली बैठक ही १४ वि होती . नवी दिल्ली येथील हैद्राबाद हाऊस येथे या बैठका पार पडल्या 

. सन २०१८ नंतर कोव्हीड १९ आणि अन्य काही बाबीमुळे या दोन नेत्याची समोरासमोर भेट या परिषदेदरम्यान होत नव्हती .दोन्ही देशाच्या पंतप्रधानची हि या परिषदेसाठी पहिलीच भेट होती , या आधी ग्लासको येथे मागील  २०२१ साली झालेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये हे नेते भेटले होते ,यात्रा ती हवामन बदलाविषयीची जागतिक   स्तरावरील परिषद होति तिथे जगभरातुन विविध देशांचे नेते उपस्थित होते त्यातील दोन जण म्हणजे एकले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा   होते हे आपण लक्षात घेतील हवे या आधी नरेंद्र मोदी२०१८ साली त्यावेळच्या जपानी पंतप्रधानाच्या आमंत्रणावरून जपानला गेले होते तेव्हा सध्याचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा   परराष्ट्र मंत्री होते .ऑक्टोबर २०२१ मध्ये  देशाचे पंतप्रधान झाल्यावर फुमिओ किंशिंदा   यांची ही पहिलीच भेट आहे याआधी त्यांनी परराष्ट्र मंत्री या नात्याने भारताला भेट दिली आहे 

      भारत रशियाची सरकारी शस्त्रास्त्रे निर्मिती कंपनी Rosoboronexport  चा K-203 Kalashnikov projec हा प्रोजेक्ट अमेठी येथे उभारत आहे तसेच भारताचे रशियाबरोबर अनेक सरंक्षण करार आहेत . रशिया युक्रेन युद्धामुळे जपानने Rosoboronexport या रशियन कंपनीसह रशियावर अनेक बंधने लादली आहेत रशियाकडून भारत जागतिक विरोध झुगारून नैसर्गिक इंधने घेण्याचा विचार करत आहे जपानने त्यांच्या रशियाबरोबर असणाऱ्या सीमावादात रशिया युक्रेन युद्धानंतर आक्रमक भूमिका घेतली आहेत दोन्ही देशांचा चीन शत्रू आहे . भारताला जपानच्या सेवा क्षेत्रात स्व विकासाच्या संधी दिसत आहेत जपानचे अनेक विकास प्रकल्प भारतात सुरु आहे या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे 

या परिषदेत  ,चीन , रशिया युक्रेन युद्ध  इंडो पॅसिफिक परिसरातील देशांचे परस्पर सहकार्य , परिसरात शांत टिकवणे याबाबत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली या परिषदेत जपान येत्या पाच वर्षात भारतांमध्ये ३ लाख २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली अमेरिकी चालनामध्ये याचे मूल्य ४ अब्ज २० कोटी डॉलर होते तर जपानच्या चलनात ५ ट्रीलीयन येन इतके होते याच्या आधी सन २०१४ मध्य जपानचे तत्कलीन पंतप्रधान योसिका मोरी यांनी जपान येत्या ५ वर्षात भरता ३. ५ ट्रीलीयन येन गुंतवूणक करणार असल्याची घोषणा केली होती विविध ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या माध्यमातून आपण ती अनुभवत सुद्धा आहोत 

भारत जपान संबंध हे नजीकच्या काळात अधिक उत्तम होतील हेच यातून दिसत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?