भारत ऑस्ट्रेलिया सहकार्याचे नवे आश्वासक पर्व

     

    येत्या काळात भारत जागचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे,  याची साक्ष देणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहे.  १९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा यांची दोन दिवशीय भारत भेट होऊन २४ तास होण्याच्या आतच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन  यांच्याबरोबर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पध्द्तीने संवाद साधला जून २०२० मध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांनी ऑनलाईन  संवाद साधल्यावर त्याच प्रकारे संवाद साधण्याची ही दुसरी वेळ होती पहिल्याऑनलाईन  बैठकीच्या वेळी साधलेल्या संवादाचा धागा यावेळी अजून पुढे नेण्यात आला . यावेळी विविध गोष्टींसाठी एकत्रितरित्या १५०० करोड भारतीय इतक्या रक्कमेची गुंतवणूक ऑस्ट्रेलिया करणार असल्याचे  ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन यांनी जाहीर केले . 
     या भारतीय चलनातील १५०० करोडच्या मदतीमध्ये सौर पॅनल,  इलेट्रीक कार , मोबाईल या सारख्या उपकरणाच्या निमिर्तीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या लिथियम सारख्या धातूच्या बाबत भारत सक्षम होण्यासाठी करावयाच्या संशोधनासाठी तसेच प्रदूषणविरहित ऊर्जा निर्मितीसाठी भारताची प्रगती होण्यासाठी १९३ करोड रुपयाची तरतूद केली आहे जगातील एकूंण लिथियमच्या उत्पादनापैकी ५५ % उत्पादन ऑस्ट्रेलिया या देशात होते .याच ऑस्ट्रेलिया या देशाने आपण १९९९ साली अणुबॉम्बची चाचणी केल्यावर आपणास अणुऊर्जेसाठी देखील युरेनियम पुरवायला नकार दिला होता याच ऑस्ट्रेलिया देशाने डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताने एन सी पी टी कराराने सही न केल्याच्या मुद्यावरून आपण अमेरिकेबरोबर करत असलेल्या आण्विक करारात खो घालण्याचा प्रयत्न केला होता . 
       १३६ कोटी रुपये दोन्ही देशांनी एकत्रितरित्या राबवायच्या अवकाश संशोधनासाठी तर १५२ कोटी रुपये भारत ऑस्ट्रेलिया सहकार्य केंद्रासाठी राखीव ठेवण्यात येत आहे या सहकार्य केंद्रामार्फत परस्पर सांस्कृतिक आदानप्रदान , व्यापारी संबंध वाढवणे , तसेच शिष्यवृत्ती देणे ही कार्ये करण्यात येतील ९७ कोटी रुपये व्यापरात सहकार्य कोशल्य विकास आणि संशोधनासाठी राखून ठेवण्यात आले आहे . 
दोन्ही देशातील लोकांना एकमेकांच्या संस्कृतीची माहिती व्हावी तसेच ऑस्ट्रेलियात  मोठया संख्येने राहणाऱ्या भारतीय लोकांचे प्रमाण विचारत घेऊन ऑस्ट्रेलिया  नेटवर्क जाणीव प्रसारभारती यांच्यात मेमरिंदम ऑफ अंडरस्टँडिंग अर्थात एम व यु करण्यात आले आहे ज्यानुसार डीडी नॅशनल आणि डीडी सह्रयाद्री या दोन वाहिन्यांचे कार्यक्रम  ऑस्ट्रेलियात दाखवले

जाणार आहे डीडी सह्याद्री म्हणजे  मुख्यतः मराठी कार्यक्रम हे आपण लक्षात घेयला हवे एक प्रकारे हा आपल्या मराठीचा विजय आहे 
          भारत पुढील वर्षी २०२३ मध्ये  जी २०चे  अध्यक्षपद भूषवत आहे त्याबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मरिशन यांनी भारताचे अभिनंदन केले भारताची युक्रेन रशिया युद्धाबाबतची भूमिका योग्य आहे असे मत ऑस्ट्रेलिया देशाच्या भारतातील ह्या कमिशनरने मंडळाच्या पार्श्वभूमीवर हे परिषद होत आहे दूतावासातील प्रमुख जेव्हा  तो ज्या दुसऱ्या देशात राहतो त्या देशाच्या  परराष्ट्र धोरणाबाबत मत व्यक्त करतो तेव्हा ते त्या व्यक्तीचे खाजगी मत नसते हे आपण लक्षात घेयला हवे 

wion news या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सागरी सुरक्षेवर संबंध, प्रशिक्षण आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत तरुण संरक्षण अधिकारी विनिमय कार्यक्रम देखील जाहीर केला जाईल. दोन्ही देशांदरम्यान गतिशीलता, स्थलांतर यासंबंधीच्या इराद्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली जाईल ज्यामुळे लोकांमध्ये परस्परसंवाद वाढेल. ऑस्ट्रेलियाकडून 29 भारतीय कलाकृती भारताला परत केल्या जातील.तसेच कोव्हीड १९ च्या संसर्गाच्या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या समावेश असणाऱ्या इंडो पॅसिफिक प्रदेशात झालेल्या विविध घडामोडी बघता या पुढील शिखर परिषदेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सर्वोच्च भागीदार असतील  यावर भर दिला जाईल."
भारताच्या चीन विरोधी लढ्यात जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया हे क्याडचे घटक आहेत त्यातील अमेरिका वगळता अन्य दोन्ही दि हसनी चोवीस तासाच्या फरकाने भारताशी विविध माध्यमाद्वारे संपर्क साधला आहे बदलत्या भारताची हि नांदीच म्हणावी लागेल आणि याच गोष्टी सहभागी होण्यासाठी ४ एप्रिलला इसीरिअलचे पंतप्रधान भारतात येणार आहे . पंडित नेहरूंच्या काळात नवस्वातंत्र्य मिळालेल्या देशांचे प्रतिनिधित्व करणारा आपला देश आता पहिल्या जागचे नेतृत्व करायला सुरवात करत आहे हेच यातून दिसत आहे भारत खऱ्या अर्हताःने विश्वगुरू होण्याची हि प्रक्रियाच आहे असेच याबाबत म्हणता येळ  जय हिंद 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?