अंधरातून अधिक गहिऱ्या अंधराकडे

   

एखाद्याचे दिवस फिरले की, एखादेच संकट येण्याऐवजी, त्यांची मालिकाच सुरु होते. आपल्या भारताच्या दक्षीणेकडील डोळ्यातील अश्रूच्या आकारातील श्रीलंका या देशातील नागरीक सध्या अस्याच घडामोडींचा अनुभव घेत आहेत. आशिया खंडातील पहिले रेडीओ केंद्र ज्या श्रीलंकेत उभारले तो देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसोंदिवस हे संकट अधिकच गंभीर होत चालले आहे.
      बुधवार 23मार्च रोजी श्रीलंकेत पेट्रोल मिळण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या 4 श्रीलंकन व्यक्तींचा उष्माघातामुळे आणि पेट्रोल मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत मृत्यू झाला. या घटनेमुळे तेथील आर्थिक स्थिती किती विदारक आहे? , हे आपण समजू शकतो.उष्माघात कोणत्याही कारणाने होवू शकत असल्याने, एकवेळ उष्माघाताने झालेले मृत्यू क्षम्य करता येईल.मात्र पेट्रोल मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत झालेले मृत्यू अक्षम्यच आहे. नागरीकांना पेट्रोल भरण्यासाठी अडचण येवू नये यासाठी श्रीलंकन सरकारने पेट्रोल पंपावर लष्कर तैनात केले आहे. गेल्या काही दिवसात श्रीलंकेतील पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव 25%वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूकीच्या खर्च्यात वाढ होवून आंतीम परीणाम महागाई वाढण्यात होत आहे. महागाई वाढल्याने बहुसंख्य जनता जीवनाश्यक गोष्टींपासून देखील दूर जात आहे. 
त्यात अजून वाइट म्हणजे तामिळनाडू पोलीसांनी समुद्रातून येणाऱ्या 6 श्रीलंकन नागरीकांना ताब्यात घेतले आहे.श्रीलंकेत रहाणे अशक्यप्राय झाल्याने ते श्रीलंका सोडून भारतात आश्रय घेण्याचा प्रयत्न करत होते, असे वृत्त wion news या वृत्तवाहिनीने दिले आहेत. या लोकांच्या पलयानातून तेथील स्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येत आहे .श्रीलंकेतील शालेय विद्यार्थ्यांचा परीक्षा ,प्रश्नपत्रिका छापण्यासाठी पेपर आणि शाई नसल्याने पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. पेपर आणि शाइसह अनेक गोष्टी श्रीलंकेत आयात केल्या जातात.गोष्टी आयात
करण्यासाठी परकीय चलन लागते, त्याचाच तूटवडा असल्याने श्रीलंकेत पेपर, शाई आदी अनेक गोष्टीची अभुतपुर्व टंचाई निर्माण झाली आहे. ज्याचेच प्रत्यंतर परीक्षा  रद्द करण्यात झाले आहे.
     श्रीलंकन सरकार देशाचे सार्वभौमत्व गहाण पडेल, असे सांगत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जात नव्हती,तर चीन ,भारत आदींकडून मदतीचा हात मागत होती.मात्र देशातील आर्थिक स्थिती बघता त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीबाबत बोलणी सुरु केली आहे. गेल्या 56 वर्षाचा इतिहास बघता श्रीलंका या आधी16 वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीबाबत गेला आहे. आता जर श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेल्यास ती 17वी वेळ असेल.कोणत्याही देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागण्याची ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या आहे. श्रीलंकेपेक्षा जास्त वेळा एकच देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीसाठी गेला आहे, तो म्हणजे पाकिस्तान .पाकिस्तानने आतापर्यंत 22वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना केली आहे.
श्रीलंकेचे भुराजनैतिक स्थान अत्यंत महत्वाचे आहे. जगातील सर्वाधिक व्यापार हिदीं महासागरातून होतो.त्या हिंदी महासागरात अत्यंत मोक्याचा स्थानी श्रीलंका आहे.. तसेच श्रीलंका भारताच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे तो देश जर चीनच्या कर्ज्याचा विळख्यात सापडला तर ते भारताला आर्थिक आणि संरक्षणाचा विचार करता परवडणारे नाही.त्यामुळे श्रीलंकेतील आर्थिक संकट लवकरात लवकर संपून रम्य ही स्वर्गाहून लंका, असी होण्यातच भारताचे हित आहे. सबब लवकरच श्रीलंकेतून सोन्याचा वीटा बाहेर येवो, ही इश्वरचरणी प्रार्थना 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?