लंकेचे पुन्हा दहन

   

   रामायणात भगवान हनुमानाने लंका जाळल्याचा उल्लेख आहे. श्रीलंकेला भेट देणारे पर्यटक या जळलेल्या श्रीलंकेचे अवशेष देखील बघतात. श्रीलंकेस भेट देणाऱ्या पर्यटकांना अशोकवाटीकेचे अवशेष देखील दाखवतात.रावणाची ही लंका जाळण्यात आली,त्रेतायुगात .सध्या कलीयुग सुरु आहे. मात्र आज  2022 मध्ये सुद्धा श्रीलंका जळत आहे.दुसऱ्यांंदा श्रीलंका जाळण्यासाठी बाहेरुन कोणी आलेले नाही. श्रीलंकेचे स्वतःचे लोक श्रीलंका जाळत आहे. श्रीलंकन सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे आलेल्या आर्थिक विपन्नतेच्या त्रागातून श्रीलंकेतील नागरीक स्वतः च्याच देश जाळत आहे.  रम्य ही स्वर्गाहुन लंका असे एकेकाळी म्हटले जाणारी श्रीलंका आज खरोखरीच लंकेची पार्वती झाली आहे. जे तेथून येणाऱ्या बातमीतून दिसत आहे.
 श्रीलंकेची राजधानी कोलोंबोत सरकारविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलकांनी हिंसक स्वरूप घेतले आहे. 31मार्चला कोलोंबोतील नागरीकांनी राष्ट्राध्यक्षांचा खासगी घरात घुसण्याचा प्रयत्न केला .ज्यामुळे सुरक्षा रक्षक आणि नागरीकांमध्ये दंगा झाला,ज्यात 2 जण गंभीर झखमी झाले.संतप्त नागरीकांनी सुरक्षा रक्षकांंचा दोन बसेस, एक अँटोरीक्षा आणि एक दुचाकी पेटवून दिली. या जमावाने राष्ट्राध्यक्षांचा खासगी घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न
केला राष्ट्राध्यक्षांची भावजय आणि विद्यमान पंतप्रधानाची पत्नी श्रीलंकेत एका चित्राच्या प्रदर्शाचे उद्घाटन करायला गेली असता, संतप्त नागरीकांमुळे तीला तेथून प्रदर्शनाचे उद्घाटन न करताच परतावे लागले.देशातील गंभीर परीस्थिती बघता राष्ट्राध्यक्षांनी तिथे आणीबाणी जाहिर केली आहे.याआधीच तिथे रात्रीची संचारबंदी आहे. तिथे औषधांचा तूटवडा झाला आहे. अनेक शासकीय रुग्णालयात रुग्ण विज आणि औषधांचा तूटवड्यामुळे उपचार आँपरेशन पासून वंचित आहेत. 
    सप्टेंबर 1948साली ब्रिटीशांपासून वसाहती अंतर्गत (सध्या ज्याप्रमाणे आँस्टेलिया, कँनडा, न्युझीलंड हे देश युकेपासून स्वतंत्र आहेत तसे) आणि 1971साली पुर्ण  स्वातंत्र्य(आपल्या सारखे स्वातंत्र्य) मिळाल्यापासूनची सर्वात वाइट आर्थिक  अवस्था सध्या श्रीलंकेची आहे. तेथील सरकारचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ऐवजी भारत,चीन आदी देशांकडून मदत घेण्याचे प्रयत्न पुर्णतः फसले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी त्यांचे बोलणे सुरु आहे. मात्र देशातील स्थिती भयानक आहे. खाद्य पदार्थांची महागाई 25% ने तर.सर्वसाधारण महागाई 17.5%टक्याने वाढली आहे. सर्वसाधारण अर्थशास्त्रीय संकेतानुसार साडे दहा टक्यांचा बाहेरची महागाई सर्व साधरण लोकांसाठी धोकादायक असते.जो निर्देशांक श्रीलंकेने कधीच ओलांडला आहे. अमेरीकी डाँलरचा विचार करता खाद्य पदार्थाचे भाव फारसे वाढलेले नाही. मात्र स्थानिक चलनाचे प्रचंड अवमुल्यन झाल्याने स्थानिक चलनात वस्तूंचे भाव गगनापार गेले आहेत. .उदाहरणार्थ पुर्वी एक डाँलरला मिळणारी वस्तू आता एक डाँलर 5सेंटला मिळते. मात्र एका डाँलरसाठी पुर्वी 90 श्रीलंकन रुपये खर्च करावे लागत असतील.तर आता 450 ते 500श्रीलंकन रुपये खर्च करावे लागत आहे. परीणामी श्रीलंकेत मोठे खाद्य संकट उभे 
ठाकले आहे.ज्यामुळे श्रीलंकेतील जनता रस्त्यावर आली आहे. श्रीलंकेला मदत करण्यासाठी चीनने हात वरती केले आहेत. त्यामुळे श्रीलंकन सरकार प्रचंड अडचणीत आले आहे. त्यातच देशांतर्गत असंतोष यामुळे देश पुर्णतः अडचणीत आला आहे. तेथील सरकारने शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला दहशतव्यांनी हिंसक रुप दिल्याचा आरोप केला आहे
श्रीलंकेच्या भुराजनैतिक स्थान आणि भारतासी असणारे सांस्कृतिक सबंध लक्षात घेता, श्रीलंकेत पुन्हा सोन्याचा वीटा असणेच भारताला आवश्यक आहे. श्रीलंका लंकेची पार्वती होणे भारताला कदापि परवडणारे नाही. त्यामुळे भारतीयांनी रावणाच्या लंकेसाठी प्रार्थना करण्यातच त्यांचे हित आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?