अस्वस्थ अशांत शेजार !

       

  आजमितीस  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या शेजारी अशांतच अशांतता पसरलेली दिसत आहे भारताच्या पश्चिमेकडील पाकिस्तानात असणारी राजकीय अस्थिरता ,दक्षिण पश्चिम दिशेकडील मालदीवमधील विरोधी पक्षाने सुरु असणारे भारतविरोधी आंदोलन त्यास मिळत असणारा पाठिंबा, ,  दक्षिणेकडील श्रीलंकेची आर्थिक विपन्नता , पूर्वेकडील बांगलादेशात होणारे अल्पसंख्याकावरचे हल्ले , दक्षिण पूर्व ठिकाणी असणाऱ्या म्यानमारमध्ये असणाऱ्या लष्करी राजवटीचा चीनकडे असणारा काहीसा कल ,उत्तरेकडील बाजूचा विचार करता नेपाळमधील राजकारणामध्ये काही वेळा उमटणारा भारतविरोधी सूर,  उत्तर पश्चिम दिशेला असणाऱ्या अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट .भारताच्या बरोबर सीमा असणाऱ्या देशांच्या विचार करता भूतानआणि चीन  वगळता अन्य कोणताही देश शांत नाहीये चीन आपला प्रमुख शत्रूं आहे जो विविध प्रकारे आपल्यला त्रास देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, भूतानचा स्वतःचा जीव अत्यंत कमी आहे त्यामुळे भारताला त्याची मदत होण्याची शक्यता कमीच आहे थोडक्यता भारताच्या आसपास अशांतताच मोठ्या प्रमाणत आहे . 
       मालदीवमधील विद्यमान सरकार जरी भारताच्या बाजूने असले तरी मालदीवमधील विरोधी पक्ष भारताच्या विरोधी भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहे , २०१३ ते २०१८ या काळात देशाच्या अध्यक्षस्थानी राहिलेल्या अब्दुला यामिन यांच्या नेतृत्वात भारतविरोधी आंदोलन सुरु आहे त्यांचे समर्थक मालदीवमध्ये  ठिकठिकाणी  घेऊन शर्टावर Get Out India असे लिहून Get Out India असे फलक घेऊन आंदोलन करत आहेत . भारतातातल्या काही इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे . मात्र तो विरोधी पक्ष असल्याने भारताला काहीसा दिलासा आहे . बांगलादेशचा विचार करता भारताला अनुकूल भूमिका घेणाऱ्या बंगलादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांचे आता जिवंत असणारे एकमेक वारसदार शेख हसीना या पंतप्रधानपदी विराजमान आहेत ज्यामुळे भारताला राजकीय लष्करी धोका नसला तरी बांग्लादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले चांगले नाहीत ज्यामुळे ते अल्पसंख्यांक भारतात आश्रयाला येण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे भारतातही राजकारणावर प्रचंड   परिणाम होऊन भारताला नव्या संकटाला सामोरे जाऊ शकते 
श्रीलंकेत त्यांच्या स्वातंत्र्यापासूनचे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे ज्यामुळे तेथून काही श्रीलंकन नागरिक विस्थापित होऊन भारतात शरण घेण्यासाठी तामिळनाडूत येण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर परिणाम होऊन अंतिमतः परिणाम भारतीय राजकारणावर होण्याची दाट शक्यता आहे नेपाळमध्ये सध्या भारताच्या विरोधी शक्ती एकत्र येत आहे ज्यामुळे तिथे अनेकदा भारताशी विवाद उभे केले जात आहेत मग ते सिमविवाद असो किंवा . भारतीयांच्या भावना दुखावतील अशी वक्त्यव्ये जसे योगाचा जन्म भारतात नाही तर नेपाळमध्ये झाला वगैरे म्यानमारच्या विचार करता मागील ऑक्टोबरमध्ये तिथे लष्करी अथवा झाला त्यानंतर तिथे सत्तेत असणाऱ्या लष्कराकडून चीनला मदत होईल अशे कृत्ये केली जात आहेत ज्याचा अप्रत्यक्ष त्रास भारताला होऊ शकतो अफगाणिस्तानमध्ये तालिबानी धार्मिक सत्ता सत्तेत आहे ज्याचा परिणाम काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण होण्यात होऊ शकतो अद्याप भारताने या आघाडीवर नियंत्रण मिळवले असले तरी हा धोका टळलेला नाही पाकिस्तानविषयी काय बोलणार? तेथील राजकीय अस्थिरता लष्कराला साह्य करू शकतेपरिणामी तेथील भारतविरोधी शक्तींना पाठबळ मिळू शकते जे भारताला कदापि परवडणारे नाही 
         एकंदरीत भारतासाठी रात्र वैऱ्याची आहे भारतात पूर्ण बहुमतातील सरकार असल्याने निर्णयप्रक्रियेतील विलंब काही प्रमाणत टाळला जाईल ज्याची सध्या अत्यंत गरजच आहे दिवस नेहमी बदलत असतात हेही त्रासदायक दिवस जाऊन भारताला चांगला शेजार नक्की मिळेल गरज आहे या कठीण दिवसात अधिक प्रबळ रहाण्याची ते झाले की भारताला महासत्ता बंटी[पासून कोणीही रोखू शकणार नाही कोणीही नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?