तूच आहे तूझा मारेकरी

       

      नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगात ज्यात भारत देखील आला, त्यात खुनापेक्षा जास्त लोकांचे मृत्यू हे आत्महत्येमुळे होत आहे. जगात मेलेल्या व्यक्तींच्या कारणांची क्रमवारी बघीतल्यास त्यास आत्महत्याचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतासह जगभरातील स्थिती किती धोकादायक आहे? याची ही लिटमस्ट टेस्टच म्हणायला हवी, खुन हा दुसऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.मात्र आत्महत्या हा स्वतः चाच हाताने स्वतःचा केलेला विनाश असतो.त्याची संख्या जास्त दिसून येणे समाजाच्या अनारोग्याचेच स्पष्ट लक्षण आहे.
             माणसे विविध कारणांनी आत्महत्या करतात,ज्यामध्ये  एखादा असाध्य विकार, कौंटुबिक ताणतणाव, व्यसनाधिनता, आर्थिक परीस्थिती खालवणे,जवळच्या व्यक्तींकडून होणारी भावनिक फसवणूक आदि कारणांचा समावेश करावाच लागेल.कारण काहीही असले तरी , त्यांची संख्या चिंताजनक आहे, याबाबत कोणालाही संशय नसावा
           वाढती गळेकापू स्पर्धा,व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक करत त्याचे स्वैराचारात झालेले रुपांतर, कौटुंबिक पातळीवर संवाद नसणे, मानसोपचार तज्ज्ञांची फी परवडणारी नसणे, यामुळे व्यक्तींना हा टोकाचा मार्ग अनुसरावा लागतो . अकबर आणि बिरबलाच्या कथेतील माकडिणीची गोष्ट आपण सर्वांना माहिती आहेच त्या कथेतील माकडिणीला जी गोष्ट लागू होते तीच गोष्ट सर्व मन्युष्यप्राण्यानां देखील लागू होते . कोणताही मन्युष्य सहजसहजी स्वतःचे  आयुष्य संपवायला तयार होत नाही स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी प्रसांगी दुसऱ्याचे जीव घेण्यास देखील मानव पुढे मागे पुढे पहात नाही असे असताना आत्महत्येची आकडेवारी खुन्याच्या संख्येपेक्षा जास्त असणे खरोखरीच चिंता वाढवणारे आहे 
          आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती जगातील संकटाला घाबरून आत्महत्या करतात जीवनातील कठीण स्थितीला तोंड देण्याची त्यांच्यात ताकद नसते म्हणून ते हा मार्ग निवडतात असे सर्वसाधारणपणे त्यांच्याबाबत बोलले जाते जे मला पूर्णतः अमान्य आहे .माझ्यामते लोक आत्महत्या करतात ते त्यांच्या समस्येला ऊत्तर नाही आणि या समस्येला बरोबर घेऊन जगण्याबाबत   प्रचंड त्यांच्यावर तणाव आल्याने ,आयुष्यातील अडीअडचणींना सामोरे जात कसे यशस्वी बनता येते याबाबत जाब वी मेट या हिंदी चित्रपटात खूपच उत्तम प्रकारे भाष्य केले आहे . चित्रपटाचा नायक आदित्य कश्यप ,काही कौटूंबिक आणि व्यापारी कारणास्तव चित्रपटाच्या सुरवातीच्या अर्ध्या भागात आत्महत्येचा
अयशस्वी प्रयत्न करतो त्याला यातून काढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नायिकेला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला देतो अखेर नायिकेने दिलेल्या सल्ल्याचा वापर करत एक प्रचंड यशस्वी उद्योगपती होतो . मात्र चित्रपटाच्या आधीच्या भागात  नायकाला मनाची उभारी देणारी नायिका चित्रपटाच्या नंतरच्या अर्ध्या भागात काहीश्या वाईट अनुभवामुळे निराश होते अखेर नायक तिला निराशाजनक स्थितीतून बाहेर काढतो आणि चित्रपट संपतो निराशाजनक अवस्थेतूम बाहेर पाडण्यासाठी काय करावे ? काय करू नये याचा धडाच हा चितपट उत्तम पद्धतीने देतो या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आपण जर छंदाला वेळ दिला काहीशे बालिश वाटणारे उपाययोजना करून त्रासदायक व्यक्ती प्रसांग विसरल्यास प्रत्येक अडचणींना शांतपणे विचार करत उपाययोजन केल्यास आत्महत्येची वेळच येणार नाही हे नक्की जाब वि मेट सारखे अनेक चित्रपट आपल्याकडे आहेत मी जाब वि मेट या माझ्या आवडत्या चित्रपटाचे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात घेतले आहे 
संकटे येतात आणि जातात मात्र एकदा जीव गेला कि तो पुन्हा मूळ स्वरूपात येणे निव्वळ अशक्यच  तेव्हा मित्रानो आयुष्यात काहीही करा मात्र आत्महत्या करू नका 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?