आवाज आवडे दक्षिण आशियातील लोकांना

     

  काल  भारतातील खासगी मालकीची आंतरराष्ट्रीय बातम्या भारतीय उच्चाराच्या इंग्रजीत देणारी, wion news ही वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक उत्तम इतर वृत्तवाहिन्यावर क्वचितच हातळतील अस्या विषयाचा बातम्या असतात.जसे मानसिक अनारोग्य, हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर होणारा परीणाम , तसेच विविध किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना समोरे  जावे लागणाऱ्या समस्या, बँटरीच्या विल्हेवाट लावणाऱ्या गुजरातच्या किनाऱ्यावरील लोकांची स्थिती, वगैरे. मी टिव्ही बघत असताना  ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती देणारा कार्यक्रम त्यावर लागला होता.
          या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे जगात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण बांगलादेशाची राजधानी ढाका या शहरात होते. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद तर चौथा क्रमांक बांगलादेशातील राजशाही या शहराने पटकावला आहे.ज्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना गोंगाट आवडतो हे सिद्ध होत आहे. 
या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ढाका शहरात अनेक कारणांमुळे ध्वनीप्रदूषण होत असले तरी वाहनांच्या हाँर्नमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे योगदान खुप मोठे आहे. सातत्याने हाँर्न वाजवल्याने ढाका या शहरात सर्वच भागात अगदी हाँस्पिटल , शाळा या ठिकांणासह सर्वत्र मानवास सुसाह्य असणाऱ्या 40 ते50 डेसिबलपेक्षा दुप्पट तिप्पट आवाज  नेहमीच असतो ,असे अनेकदा सरकारी आणि खासगी सर्व्हेक्षणात उघड झाल्याचे या कार्यक्रमात सांगण्यात आले. सरकारने ढाक्यातील काही भागात शांतता क्षेत्रे तयार केली.याठिकाणी विनाकारण हाँर
वाजवल्यास शिक्षेची तरतूद केली.  मात्र चित्र काहीच बदलेले  नाही, असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात काही वाहन चालकाच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या, ज्यातील एक प्रतिक्रीया पादचारी रस्ता ओलांडत असताना, फुट ओव्हर ब्रीजचा वापर करत रस्ता ओलांडण्याऐवजी, रस्त्यावरून चालत रस्ता ओलांडतात. त्यामुळे आम्हाला सातत्याने हाँन वाजवत गाड्या चालवाव्या लागतात, असी होती. ही प्रतिक्रिया बांगलादेशातील लोकांची वर्तणूक स्पष्ट करते. बांगलादेशातील लोक असे वागत असले, तरी  आपण भारतीय कमी अधिक असेच आहोत ना? फक्त तसी नोंद अजून कोणत्याही वृत्तवाहिनीने घेतलेली  आढळली नाहीये इतकेच काय ते समाधान. 
बांगलादेशात 2017साली75 डेसिबलपेक्षा जास्त अधिक आवाज करणाऱ्या परदेशी आणि  हा्यड्रोलिक हाँनवर बंदी घालण्यात आलेली असली तरी ती कागदावरच आहे. बांगलादेशातील 90%वाहनांवर हायड्रोलिक आहे.  असी माहिती याच कार्यक्रमात एका वाहनचालकाकडून देण्यात आली. या कार्यक्रमात  गोंगाटामुळे होणाऱ्या विकारांची संख्या ढाक्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगण्यात आले.बांगलादेशातील ग्रामीण भागातील नागरीक ढाक्यात येत असल्याने, ढाक्यातील वाहनांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे .परीणामी वाहनांच्या हाँनची समस्या वाढणार
असल्याची, शक्यता यात व्यक्त करण्यात आली. हा कार्यक्रम wion newsच्या बांगलादेशातील वार्ताहराने केला असल्याने त्यांनी तेथील शक्यता सांगितली आहे. मात्र भारतातील पुण्यासारखी शहरे याच रांगेत उभी आहेत, हे सुर्यप्रकश्याइतके स्पष्ट आहे.
याच कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ढाक्यात 10 लाख रिक्षावाले आहेत. त्यातील 25% रिक्षावाले ऐकण्याचा विविध समस्येने ग्रस्त आहेत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण बांगलादेशाकडून धडा घेवून उपाययोजना करायला हवी. त्यातच आपले हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?