पाकिस्तानातील लोकशाही


          ९  एप्रिलच्या रात्री आणि १० एप्रिल च्या पहाटे आपल्या लोकसभा सदृश्य पाकिस्तानच्या सभागृहात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या ज्याची अंतिम परिणीती पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांची गच्छन्ति होण्यात झाली . ज्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळ पूर्ण न करण्याची परंपरा अबाधित राहिली . मुळात आमरण खान यांचीपदावरून गच्छन्ति होणार हे या आधीच स्पष्ट झाले होते मात्र बुडणाऱ्या जहाजाचा कप्तान जसे शेवटपर्यंत आपली जागा सोडत नाही बुडणारे जहाज वाचवण्याचा निकराने प्रयत्न करतो त्या प्रमाणे विविध व्यक्तींकडून इम्रान खान यांना पदाचा राजीनामा देत सम्मानाने पायउतार होण्याचा सल्ला मिळत असताना देखील इम्रान खान यांनी अखेरपर्यंत सत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला इम्रान खान यांच्या या प्रयत्नांमागे पाकिस्तानच्या मागच्या पंतप्रधानाची पायउतार  गच्छन्ति झाल्यावर होणाऱ्या  परिस्थितीची देखील पार्श्वभूमी होती हे नाकारून चालणार नाही त्या पंतप्रधानाची झाली तशी दुर्दशा आपली होऊ नये यासाठी त्यांनी निकराने प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत असे वाटत होते किंबहुना ज्या विधिमंडळाने त्यांच्यावर अविश्वाचा प्रस्ताव आणला ते विधिमंडळच बरखास्त करत त्यांनी यशस्वी वाटेल अशी खेळी केली मात्र त्यांच्या या
खेळीवर पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील पाच जणांचा खंडपीठाने इम्रान खान यांची कृती असंवैधानिक ठरवली ज्यामुळे विरोधकांना इम्रान खान यांच्या विरोधात अविस्वास प्रस्ताव अने सोईचे गेले ज्यामुळे इम्रान खान यांना सत्ता सोडावी लागली त्यांच्या विरोधात बहुमतासाठी १७२ मतांची गरज असताना १७४ मते पडलीइम्रान खान यांच्यावेळी असणाऱ्या सभागृहाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षांनी नियुक्त केलेल्या सभापती आणि उपसभापती यांनी मतदान करणे टाळले सत्तारूढ पाकिस्तान तारहरीके इन्साफ पार्टीच्या बंडखोरांनी मतदान करणे टाळले मात्र इम्रान खान यांची सत्ता गेली ती गेलीच 
 पाकिस्तानात स्वातंत्र्यपासून लोकशाहीचा खेळखंडोबा झाला . आपली आणि त्यांची एकत्रित संविधान सभा डिसेंबर १९४६ साली सुरु झाली स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशाच्या संविधान सभेने स्वतंत्र काम सुरु केले आपण आपली संविधान निर्मितीची प्रक्रिया नोव्हेंबर १९४९ ला पूर्ण केली मात्र त्यांची संविधान निर्मितीची प्रक्रिया पुढे ७ वर्षे चालली सन १९५६ साली त्यांची संविधान निर्मितीची  प्रक्रिया पूर्ण झाली जे संविधान त्यांनी पुढे फक्त १९७१ पर्यंतच वापरले १९७१ साली बांगलादेशच्या निर्मितीनंतर पुन्हा त्यांनी संविधान टायर केले आज पाकिस्तानात ते संविधान सुरु आहे सन १९४७ ते सन १९५७ पर्यंत पाकिस्तानचे अनेक पंतप्रधान झाले मी जेव्हढ्या लवकर कुर्ता बदलत नाही तेव्हड्या लवकर पाकिस्तानमध्ये पंतप्रधान बदलला जातो असे विधान पंडित नेहरू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या बाबतीत केले होते पंडित नेहरूंच्या या विधानामुळे पाकिस्तानची लोकशाही कशी सुरु झाली  हे कळते पुढे १९५७ साली पाकिस्तानात पहिल्यांदा लष्करी उठाव झाला ज्यामुळे पाकिस्तानची संसदीय लोकशाही संपली आणि हुकूमशाही राजयवंत सुरु झाली जी १९७१ साली संपली तेव्हा पाकिस्तानात पहिल्यांदा निवडणुका होऊन लोकनियुक्त सरकार आले मात्र जेमतेमी ७ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये दुसऱ्यांदा लष्करी उठाव झाला आणि
दुसऱ्यांदा ११ वर्षासाठी लष्करी सत्ता आली ११ ऑगस्ट १९८८ च्या एका रहस्यमय विमान अपघातात निधन झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये लोकशाहीची स्थापना झाली त्यानंतर वर्ष सव्वा वर्ष ते दोन वर्षासाठी पाकिस्तानात अनेक पंतप्रधान झाले जे १९९९साली तिसऱ्यांदा लष्करी उठाव होण्यापर्यंत सुरु होते १९९९ ते २००४ पर्यंत देशात हुकूमशाही होती २००४ ला पाकिस्तानमध्ये लोकशाहीची स्थापना झाल्यावर पुन्हा पंतप्रधानपदाची धावा पळा ची शर्यत सुरु झाली ज्याचा शेवट इम्रान खान यांची सत्ता जाण्यात झाला आहे 
भारताच्या शेजारील देशांमधील नेपाळची संविधान निर्मितीची प्रक्रिया , बांगलादेश पाकिस्तान आणि म्यानमार मधील लोकशाहीची अवस्था बघता आपणास भले कितीही धोरणे पटो अथवा ना पटोकाँग्रेसचे महत्व मान्य करावेच लागते त्यांच्यामुळेच देशात आज खऱ्या अर्थाने लोकशाही आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?