इम्रान खान यांना तर हटवले पुढे काय ?

             

  पाकिस्तानात गेल्या काही महिन्यापासून सुरु असणारा सत्ता संघर्ष १० एप्रिलला काही प्रमाणत संपला . गेल्या काही म्हन्यांपासून सरकाविरोधी पक्ष एकत्र येऊन सातत्याने सरकार पाडण्याचे प्रयत्न करत होते .एकमेकांच्या पूर्णतः  विरोधात राजकीय विचारधारा असलेले पक्ष इम्रान खान हटवा या एकाच ध्येयाखाली एकत्र आले  होते त्यासाठी त्यांनी पाकिस्तान डेमोक्रेक्तिक अलायन्स स्थापन केली होती ज्याच्या मार्फत देशभरात आंदोलने करून इम्रान खान यांच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला . ज्याला या अखेर यश आले.,  आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पदच्युत झाले . या नवनियुक्त पक्षाच्या ठोस असा कार्यक्रम देशाला पुढे नेण्याचा कोणताही एक कार्यक्रम नाही पुढे कशी वाटचाल करायची याबाबत ठाम भूमिका नाही आपल्या भारतात आणीबाणी उठल्यानंतर डावे समाजवादी पक्ष आणि जनसंघ  पक्ष्यासारखे अति उजवे पक्ष एकत्र आले होते तसेच काहीसे चित्र सध्या पाकिस्तानात तयार झाले आहे जनता पक्षात जसा अंतर्विरोध ठासून भरला होता तास तो विद्यमान शरीफ यांच्या सरकारमध्ये सुद्धा आहे . पाकिस्तानातील पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला जेमतेम दीड वर्षाच्या कालावधी उरला आहे त्यामुळे जर पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायन्सला जर काही करायचे असल्यास आताच करणे अ आवश्यक आहे पाकिस्तना तेहरीके इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाकडून निवडणुकीची तयारी म्हणून विद्यमान सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीकेची झोड उठणार हे १०० % नक्की त्यावर मत करत पाकिस्तानच्या नवनियुक्त सरकारला काम करावे लागेल 
        सध्या पाकिस्तानात सर्वत्र मोठ्या प्रमाणात इम्रान खान यांच्या  समंथनार्थ लोक रस्त्यावर उतरून देशप्रेमाच्या घोषणा देत आहे कारची मुलतान इस्लामाबाद गुजरानवाला पेशावर देशाच्या कोणताही कोपरा या रॅलीने सोडलेला नाही एका एका रॅलीत हजरो लोक सहभागी होत आहेत त्यांवर आवश्यक ती कार्यवाही त्यांना करावी लागेल .गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पाश्चिमात्य देशांबरोबरचे संबंध प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत चीनबरोबर सुरु असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर च्या अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकासकांच्या प्रगतीवरून त्या विकास कामाच्या ठिकाणी असणाऱ्या चीनची नागरिकांना सुरक्षा देण्यावरून , त्या विकास कामांसाठी चीनला देवयाच्या रक्कमेवरुन चीन या पाकिस्तनच्या ऑल वेदर फ्रेंडशी संबंध प्रचंड ताणलेले आहेत या आंतरराष्ट्रीय संकटाबरोबर देशांतर्गत वाढलेल्या हिंसक  कारवाया प्रचंड प्रमाणत वाढलेली महागाई यासंकटाला देखील विद्यमान सरकारला सामोरे जावे लागणार आहे ते देखील वर्षा दीड वर्षाच्या तुटपुंज्या कालावधीत . तोही परस्पर विरोधी राजकीय विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांची मोट सांभाळत वाढत्या हिंसक कारवाईत नुकतेच सत्तेतून पायउतार झालेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या आंदोलनाची भर पडली आहे हे आपण लक्षात घेयला हवे या आंदोलनाला मिळणार पाठिंबा बघता विद्यमान शरीफ सरकारला किती काटेरी वाटेवरून मार्गक्रमण करायचे आहे यांचा अंदाज येतो आजमितीस बलुचिस्तान या प्रातांतील स्वातंत्र्याच्या आंदोलनाने प्रचंड जोर पकडला आहे बलुचिस्तानच्या स्वतंत्र्यासाठी लढणाऱ्या विविध संघटना त्यांच्यातली मतभेद विसरून एका झेंड्याखाली येत आहे पाकिस्तानच्या ऊर्जा साठ्याच्या विचार करता बलुचिस्तान पाकिस्तानची जवळपास सर्वच १०० % गरज
बलुचिस्तान पूर्ण करतो . त्या प्रांतातील वाढती अस्थिरता पाकिस्तानसाठी डोकेदुखी आहेच या खेरीज सुन्नीत्तेर इस्लामच्या पंथांचे अनुयायी आणि इतर अल्पसंख्याक यांच्यातील दंगे यांच्या देखील विचार पाकिस्तानच्या विद्यमान शरीफ सरकारला करावा लागेल काही दिवसापूर्वी धार्मिक भावना दुखावल्या या  . समजातून एका श्रीलंकन नागरिकांची हत्या पाकिस्तानी कामगारांनी केल्याची घटना एका कारखान्यात घडली होती विद्यमान सरकारला यावर देखील काम करावे लागेल 
एकंदरीत इम्रान खान यांच्या विरोधकांना सत्ता जरी मिळाली असली तरी त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगर देखील मोठा आहे यावर ते कशी मार्ग काढतात यावरच त्यांची पुढील वाटचाल अवलूंबून आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?