यांच्या अनुभवातून आपण शहाणे होणार का ?

     

     सध्या आपल्याकडे विविध राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु असताना जगभरातील अनेक देश एका वेगळ्याच संकटाला तोंड देत आहेत ते संकट म्हणजे प्रचंड  अश्या पावसाचे.  १३ एप्रिल पर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार त्यांच्या आधी  तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे १३ एप्रिल पर्यंत दक्षिण आफ्रिकेत ६० लोक तर फिलिपाइन्स या देशात ४५ लोक मृत्युमुखी पडले आहेत . फिलिपाइन्स मध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक म्हणजे २५ लोक पावसामुळे दरड कोसळून प्राणास मुकले आहेत . दक्षिण आफ्रिका हा देश भारताच्या तुलनेत विकसित समजला जातो मात्र त्या ठिकाणी देखील कोसळलेल्या पावसामुळे डर्बन या शहराच्या उत्तरेकडच्या भागात मोठं मोठे चिखलाचे पूर येऊन प्रचंड  प्रमाणात वितहानी झालीआहे . दक्षिण आफ्रिका आणि फिलिपाइन्स या देशात अनेक महामार्ग पावसामुळे वापरण्याजोगे राहिलेले नाही तेथिल लोक मूलभूत जीवनावश्यक गोष्टींपासून देखील दूर आहेत दक्षिण आफ्रिकेत या पावसामुळे ६० लोक जीवास मुकले आहेत फिलिपाइन्स देशाच्या हवामान खात्यावर या काळात देशात पाऊस पडणे यात फारसे वावगे नसले तरी तो ज्या प्रमाणत कोसळतो आहे ते खरोखरीच चिंतांजनक आहे गेल्या काही महिन्याच्या जगभरातील पावसाच्या घटना बघितल्यास पावसाचे प्रमाण चिंताजनक स्वरूपात वाढलेले दिसत आहे ऑस्ट्रेलिया , चीन पश्चिम युरोप ,          अमेरिकेच्या पूर्व किनारा जगातील कोणताच भाग या पावसाच्या प्रकोपातून सुटलेला दिसत नाही 
            जगात कुठे जास्त पाऊस पडला,  तर याची चर्चा महाराष्ट्रात करण्याची गरज काय ? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल,  तर तुम्ही चुकत आहात असेच म्हणावे लागेल . पावसाच्या संकटाच्या विचार करता मी वर सांगितलेले देश जात्यात भरडले जात आहेत आपण मात्र अजून सुपात आहोत मात्र आपली सुद्धा जात्यात भरडण्याची वेळ येणार आहे . जगातील कोणत्याच प्रदेशाची यातून सुटका नाहीये .आपण सुद्धा जगाचाच भाग आहोत त्यामुळे आपणास देखील ही निसर्गाची शिक्षा भोगायलाच लागणार आहे मात्र ही शिक्षा भोगताना आपले कमीत कमी नुकसान कसे  होईल ? याची तजवीज करणेच आपल्या हाती आहे .  आपल्याकडे चिपळूण सारखी पूर्वी निसर्गाच्या प्रकोपाबाबत फारशी चर्चित नसणारी शहरे देखील गेल्या काही वर्षात निसर्गाच्या प्रकोपामुळे चर्चेत आली आहे . काही वर्षांपूर्वी राजस्थानातील वाळूच्या प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात देखील मोठा पूर
येऊन गेल्याचे आपणास आठवत असेलच . दरवषी अनेक नवीन गवे शहरे यात समाविष्ट होत आहेत जे धोक्याचे लक्षणच मानायला हवे मुबई असो किंवा कोकणातील इतर शहरे हि गेल्या काही वर्षांपासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाची  शिकार  होत असल्याचे आपणस दिसून येईल मुसळधार पाऊस पडल्यावर पूर्वी इतका पाऊस या प्रदेशात कधीच पडला नाही किंवा नालेसफाई पुरेश्या प्रमाणत झालेली नसल्याने पाणी तुंबले . अनधिकृतबांधकामामुळे पाणी जाऊ शकले नाही असे स्पष्टीकरण आणि आरोपाचे चे राजकारण बदलत्या हवामानाचा पॅटर्न बघता उपयोगाचे नाही जगभरातील पाऊसाचे वाढते प्रमाण बघता पूर्वी झाला नाही इतका पाऊस पडून पावसाचे चिंताजनक रेकॉर्ड या वर्षी होणार आहे असे समजूनच आपणास नियोजन करावे लागणार आहे 
           आपल्या मराठीत एक म्हण आहे पुढच्यास ठेच मागचा शहाणा . आपल्या भारताच्या सुदैवाने फिलिपाइन्स दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया या देशांना मोठ्या पावसाने ठेच दिली आहे गरज आहे ती ठेच आपल्याला न लागता आपण या देशांच्या अनुभवातून शहाणे होत योग्य ती पाऊले उचलण्याची अन्यथा माहिती असून देखील योग्य ती पाऊले न उचलल्यामुळे होणाऱ्या नुकसानीस आपणच जवाबदार असू दुसरे कोणी नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?