करावे तसे भरावे

         

 आपण शेजाऱ्याला त्रास  देण्यासाठी घरात साप पाळले तर वेळ मिळाल्यास ते शेजारच्या घराबरोबर आपल्या स्वतःच्या घरात देखील धुमाकूळ घालू शकतात .तेव्हा साप पाळणाऱ्या व्यक्तीने त्याची सुद्धा तयारी करावी  असे विधान अमेरिकेच्या  माजी  सेक्रेटरी ऑफ स्टेट( परराष्ट्र मंत्री समकक्ष ) हिलरी क्लिंटन यांनी भारत पाकिस्तान विषयी बोलताना एकदा केले या विधानाचा अनुभव साध्य पाकिस्तान घेत आहे फरक इतकाच की पाकिस्तान भारताच्या संदर्भात नाही तर अफगाणिस्तान विषयी हा अनुभव घेत आहे 
         अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त सरकार उलथवून टाकून अफगाणिस्तानात तालिबानचा उदय होण्यासाठी पाकिस्तानाने सर्वोत्तपरी प्रयत्न केले अफगाणिस्तानमध्ये तालिबान चा उदय झाल्यास तेथील सरकार आपले कळसूत्री बाहुले असेल ज्यामुळे आपणस जगात आपली प्रतिमा उजळण्यास मदत होण्याबरोबरच  कशिमरविषयी आपला रंग आळवण्यास मदत मिळेल अश्या भ्रमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यास मदतच केली मात्र जसे नव्याचे नऊ दिवस असतात त्या प्रमाणे काही दिवस सरल्यावर अफगाणिस्तानमधील तालिबाबानी  पाकिस्तानची नवी डोकेदुखी ठरू शकतात असे भविष्यसूचक वक्तव्य तालीबाबांचा उदय झाल्यावर अनेक जाणकारणांनी केले होतेज्याचा अनुभव पाकिस्तान घेत असल्याचे  गेल्या काही दिवसातील अफगाणिस्तान पाकिस्तान  सीमेवरील काही घडामोडी बघता स्पस्ट होत आहे 
             पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानची सीमा डुरंन्ड लाईन म्हणून ओळखली जाते जिची निर्मिती भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना १८९३ साली ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानची सीमा म्हणून झाली जिची वैधता पुढील १०० वर्ष होती भारताची फाळणी झाल्यावर ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा म्हणून ओळखली जाऊ लागली .अफगाणिस्तानने या सीमेला कधीच मान्यता दिली नाही त्यांच्यामते ती ब्रिटिशांनी त्यांच्यावर बळाचा वापर करत लादली . ब्रिटिशांनी लादलेल्या या
सीमेमुळे पठाणी समाज विनाकारण दोन देशात विभागाला गेला आहे . तो एकत्र असणे त्या समाज घटकाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे परिणामी त्या समाज घटकांचे स्वतंत्र राष्ट्र असले पाहिजे किंवा तो भाग संपूर्णपणे अफगाणिस्तानमध्ये समाविष्ट केला पाहिजे . अशी अफगाणिस्तानची भूमिका आहे पाकिस्तानबरोबर होणाऱ्या चर्चेदरम्यान अफगाणिस्तान नेहमी हा मुदा मांडत असतो 
      पाकिस्तानने स्वतःच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानची निर्मिती केल्यावर त्यात्तीलच एक गट पाकिस्तान तालिबान या मुद्यांबाबत आक्रमक भूमिका घेतो त्यांच्या मते या सीमेरेषेची वैधता मुदत संपल्याने याची पुनर्रचना होणे आवश्यक आहे . आपल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी हा गट हिंसक कारवाया देखील करतो पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर उभारलेले तारेचेकुंपण देखील त्यांनी उखडून टाकण्याचा प्रयत्न केला होताहा गट अवैध मार्गाने सीमा ओलांडून पाकिस्तानी लष्करावर देखील हल्ला करत आहे गेल्या सहा महिन्यात या हल्ल्यामुळे सुमारे १५० पाकिस्तानी सैनिक मृत्यमुखी पडले आहेत त्यामुळे आवश्यक ती कार्यवाही करायची म्हणून गेल्या आठवड्यात पाकिस्तानी हवाई दलाकडून  अफगाणिस्तानमधील [पाकिस्तान तालिबानच्या दहशतवादी संघटनेच्या तलवार एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करण्यात आला . ज्याचे ठिकाण चुकल्यामुळे दहशतवादांच्या तळ्यांऐवजी नागरी वस्तीवर पाकिस्तानी हवाई दलाने हल्ला केला ज्यामध्ये किमान ३१ निष्पाप अफगाणी नागरिक ठार झाल्याचा दावा अफगाणी सरकारने केला आहे ज्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील  संबंध ताणले गेले आहेत 
भारताचा विचार करता भारताला या बाबत अत्यंत सावध भूमिका घेणे आवश्यक आहे पाकिस्तानचा  या वादात  मध्यभागी असणाऱ्या खैबर ए पख्तुनवा (पूर्वीचा वायव्य सरहद प्रांत ) या प्रांताला लागून भारताच्या जम्मू आणि काश्मीर या प्रांतातील जम्मू भाग तसेच पाकिस्तानने अनधिकृतपणे आपल्या ताब्यात ठेवलेल्या पाकव्याप काश्मीर बरोबर सीमा शेअर करतो या भागात अशांतता निर्माण झाल्यास अफगाणिस्तानमधून या मार्गे भारतात आणि तेथून सर्व भारतात अमली पदार्थाचा पुरवठा होऊ शकतो  ताईच काही प्रमाणात दहशवादी देखील या भागातून भारतात येऊ शकतात त्यामुळे किमान या भागातील गस्त भारताला वाढवावी लागेल भौगोलिक रचनेचा विचार
करता भारताच्या अन्य कोणत्याही भागातून काश्मीर मध्ये पोहोचण्यापेक्षा या भागातून काश्मीरमध्ये पोहोचणे तुलनेने सोपे आहे १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केल्यावर आपण जम्मू आणि काश्मीर खोरे एकमेकांना जोडले त्याआधी  काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी खैबर ए  पख्तुनवा (पूर्वीचा वायव्य सरहद प्रांत ) येथूनच रस्ता होता त्यामुळे भारताला या घडामोडींविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे 
       भारताच्या फाळणीच्या वेळी या भागाला भारतात येण्याची इच्छा होती मात्र भौगोलीक सल्लागनतेमुळे हा प्रदेश पाकिस्तानात गेला त्यावेळी थेतील महत्त्वाचे नेते सरहद्द गांधी यांनी काँग्रेसने आम्हाला लांडग्याच्या हवाली केले आहे असे सांगत आपला संताप व्यक्त केला होता पाकिस्तानमधील कोणत्ययी घटनेचा आपल्यावर परिणाम होतोच तास याही घटनेचा होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे गरज आहे तो कमीत कमी कशा होईल हे बघण्याची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?