पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय?

 

     पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील विद्यापीठ परीसरात बलूचीस्तान लिबरेशन आर्मीच्या महिला दहशतवाद्याने नुकताच हल्ला केला.ज्यामध्ये चार चीनी नागरीक ठार झाले. चीनी नागरीकांना लक्ष्य करुन दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण चीनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.त्याच हल्ल्याचा मालिकेतील हा हल्ला होता. या हल्ल्याचा आधी आपण मातृभूमीसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असल्याचा व्हिडीओ सदर महिलाने सोशल मिडीयात पोस्ट केला होता. 
    बलूचीस्तान मधील सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता, चीनी सरकारच्या मदतीने पाकिस्तानी सरकार बलूचीस्तानातील नैसर्गिक इंधनांचे उत्खन करुन पंजाबचा विकास साधला जात आहे ,आणि बलूचीस्तानचे शोषण केले जात आहे,असा आरोप बलूचीस्तानमधील लोकांकडून सातत्याने करण्यात येतो.या शोषणातील चीनचा सहभाग बघून बलूचीस्तानमची राजधानी क्येटा या शहरात पकिस्तानमधील चीन राजदुतावर प्राणघातक हल्ला
झाला होता.काळ आला होता ,पण वेळ आली नसल्याने ते यातून थोडक्यात बचावले होते. एका अंदाजानुसार येत्या आगामी  चार वर्षात 50 लाख चीनी नागरीक पाकिस्तानत येण्याची शक्यता आहे. त्यातच बलूचीस्तानमधील स्वातंत्र्यप्रेमी नागरीकांकडून चीनी नागरीकांवर होणारे हल्ले बघता हा प्रकार पाकिस्तानसाठी मोठी अडचण ठरु शकणार आहे. बलूचीस्तान स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात देखील केला होता.
मोठा   देशाच्या एकूण भूभागाचा  जवळपास    ५० % प्रांत भूभागावर पसरला अफगाणिस्तान आणि इरान  या शेजाऱ्यांशी सीमा शेअर करणारा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध , मात्र देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जेमतेम ५ ते १० टक्के लोकसंख्या राहत असलेला भूभाग म्हणून बलुचिस्तान प्रांत ओळखला जातो  बलुचिस्तानमध्ये प्रामुख्याने आढळणारे बलुची लोक शेजारील अफगाणिस्तान आणि इराण या देशात देखील अढळतात .किंबहुना शेजारील इराणमधील देखील आकाराने सर्वात मोठा तर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांकावर असलेला प्रांत म्हणजे साल्टीस्थान  आणि बलुचिस्तान . सध्या   सालिस्तान आणि बलुचिस्तान या नावाने ओळखला जाणारा प्रांत १९९५ पर्यंत फक्त बलुचिस्थान या नावाने ओळखला जात असे . १९९५मध्ये या प्रांताच्या नावात  साल्टीस्थान  हा शब्दसमाविष्ट करण्यात येऊन प्रांताचे नाव  साल्टीस्थान  आणि बलुचिस्तान असे झाले यावरून बलुचिस्थानच्या एकूण लोकजीवनाचा अवकाश लक्षात येतो १९४७ 
     पाकिस्तान आपला शत्रू असला तरी तो शांत राहणेच भारतासाठी हितकारक आहे. तो अशांत झाल्यास रोगपेक्षा उपचार भयंकर असी स्थिती निर्माण होईल.त्यामुळे बलुचीस्तान मुद्द्याचे शांतपणे निराकरण यातच भारताचे हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?