खगोलशास्त्रारातील हे रंजक शोध आपणास माहिती आहे ना ?

       

  आपल्या सभोवताली पसरलेल्या अथांग पसरलेल्या अवकाशाविषयी आपल्यापैकी अनेकांना कुतुहूल असते . रात्री गावाबाहेर असताना ठळकपणे  दिसणाऱ्या  तारकासमूह मी तारे , ग्रह , उपग्रह , धूमकेतू , उल्का यांचे निरीक्षण करायला आपल्यापैकी अनेकांना आवडत सुद्धा असेल या सर्व गोष्टींच्या शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास खगोलशास्त्र म्हणतात हेही आपणस माहिती असेल तर .सध्याच्या महाराष्ट्रातील  राजकीय बातम्यांच्या गदारोळात या खगोलशात्रातील दोन महत्त्वाच्या ठरू शकतील अश्या दोन गोष्टींच्या शोधाच्या बातम्या काहिस्या हरवल्या माझे आजचे लेखन त्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी . 
         तर मित्रानो , विश्वाचा विस्तार होत आहे, हे ज्ञात सत्य आहे. बिग बँग थिअरी  नुसार, विश्वाची उत्पत्ती एका अकल्पनीय मोठ्या महास्फोटात झाली आणि  स्फोटाच्यावेळी बिंदुवत असणारे वस्तुमान एका बिंदूपासून बाहेर फेकले गेले या फेकले गेल्यामुळे  विश्वाचा विस्तार होत आहे . मागील 13.8 अब्जावर्षापासून हा विस्तार होतच आहे त्यातही गंमत अशी कि या विस्ताराची गट कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे आतापर्यंतचे निरीक्षण होते  याचे  शास्त्रज्ञांच्या मते कारण म्हणजे डार्क एनर्जी. . जी दिसतं नाही मात्र घडणाऱ्या घटना बघता तिचे अस्तिव मान्यच करावे लागते असह्या ऊर्जेचे स्वरूप म्हणजे डार्क एनर्जी . या डार्क एनर्जी  या स्वरूपातीळ ऊर्जेचा  रिप्लासिव्ह ताकद  गुरुत्वाकर्षण ताकदीपेक्षा जास्त असते  आणि त्यामुळे संपूर्ण विश्वाचा विस्तार होतो.असे शास्त्रज्ञाचे आतापर्यंतचे निरीक्षण होते . 
       परंतु शास्त्रज्ञांना आता वाटते की विश्व लवकरच विलक्षण आकुंचन सुरू करेल. त्यांनी त्यांचे संशोधन जर्नल सायंटिफिक प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये मांडले आहे. या अभ्यासामागील शास्त्रज्ञांच्या चमूने विश्वाचे एक मॉडेल तयार केले आहे ज्यामध्ये डार्क एनर्जी ही निसर्गाची स्थिर शक्ती नसून तिचे  क्विंटेसन्स प्रकारात  एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व कालांतराने क्षय होऊ शकते.
त्यामुळे पुढील ६५ दशलक्ष वर्षांत विश्वाचा वेग थांबेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पुढील 100 अब्ज वर्षांमध्ये  विश्वाचे  विस्तारणे थांबेल  आणि ते आकुंचन  पावण्यास सुरवात होईल  आणि त्यानंतर अब्जावधी वर्षांनी, विश्वाचा मृत्यू पूर्ण होऊ शकतो 
    या शिवाय अजून एक आशचर्यकारक शोध खगोलशास्स्त्रज्ञांना लागलेला आहे .  शास्त्रज्ञांना 'ब्लॅक विडो' पल्सर प्रकारचा तारा सापडला आहे जो त्याच्या सोबत करणाऱ्या ताऱ्यांचे वस्तुमान कमी करत आहे . ताऱ्यांच्या मृत्यूचे
अनेक प्रकार शास्त्रज्ञांनी शोधले आहेत जसे  ब्लॅकहोल , रेड जायंट स्टार  व्हाईट ड्रफ स्टार , वगैरे यातील एका एका प्रकार म्हणजे पल्सर स्टार या प्रकाराची ताऱ्यांचे वस्तुमान अत्यंत कमी जागेत एकटवलेले असते परिणामी त्यांचे गुरुत्वाकर्षण देखील मोठे असते गुरुत्वाकर्षण आणि आपले वजन यांचा जवळचा संबंध असतो त्यामुळे ज्याचे पृथीवर वजन जेमतेम १०० ग्रॅम आहे त्याचे पल्सर वरील वजन कित्येक टन किलो सहज भरू शकते हा पल्सर प्रकारातील तारा स्वतःभोवती अत्यंत वेगाने फिरतो या फिरण्याच्या दरम्यान ठराविक कालांतराने या ताऱ्यातून वेगाने  अतिनील किरणे बाहेर सोडली जातात . या किरणामुळेच ते शोधता येतात 
     खगोल शास्त्रज्ञांनी या पल्सरचे देखील काही उपप्रकार केले आहेत त्यातीलच एक म्हणजे ब्लॅक विडो' पल्सर हा होय  या प्रकारला हे नाव  विडो स्पायडर्सवरून घेतले गेले आहे. या कोळ्याच्या प्रजातींमध्ये, वीण खेळ बहुतेक वेळा नर कोळीसाठी घातक असतो. मादी कोळी, संभोगानंतर, तिचा नर साथीदार खाते . या प्रकारात देखील  पल्सर तारा त्यांच्या सहकारी असणाऱ्या ताऱ्याचे  वस्तुमान .कमी करतो म्हणून त्याला हे नाव देण्यात आले आहे आकाशात अनेक  जोड तारे अढळतात .जे एकाच गुरुत्वमध्याभोवती फिरतात . आपल्या जवळील मित्र तारा ( Proxima Centaur) किंवा सुप्रसिद्ध सप्तर्षी तारकासमूहातील वशिष्ठ तारा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे  खगोलशास्त्रज्ञांच्या मते विश्वातील बहुसंख्य तारे हे जोड तारे आहेत . या जोड ताऱ्यातील एखादा तारा पल्सर असल्यास हा प्रकार होऊ शकतो . या प्रकारात पल्सर ताऱ्यातून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे सहकारी ताऱ्यांचे वस्तुमान नष्ट होते शास्त्रज्ञांनी यास ब्लॅक विडो' पल्सर हे नाव दिले आहे पल्सर च्या विविध प्रकारातील द अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे आता शोधलेल्या पल्सर आणि त्याच्या सहकाऱ्याच्या जोडीस शास्त्रज्ञांनी 
ZTF J1406+1222 हे नाव दिले आहे या जोडीतील दोन्ही तारे एकमेकांभोवती ६२ मिनिटात फेरी पूर्ण करतात जेव्हा फेरी पूर्ण करताना हे तारे एकमेकांसमोर येतात तेव्हा पल्सार तारा आपल्या सहकार्यी ताऱ्याचे  वस्तुमान कमी करतो 
खगोलशास्त्र  अत्यंत रंजक शास्त्र आहे हेच या दोन शोधामुळे दिसून येत आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?