पुन्हा पुणे अहमदनगर

   

   १ जून १९४८ ही निव्वळ एक तारीख नाहीये . स्वतंत्र भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बस 
वाहतूक सूर झाल्याची ती तारीख आहे या वर्षी या घटनेला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ वे वर्ष सुरु होईल आपल्या स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बस वाहतूक सूर करण्याचा मान  त्यावेळच्या बॉम्बे स्टेट सरकारला जातो आज आपण बॉम्बे स्टेट सरकारला महाराष्ट्र सरकार म्हणून ओळखतो आणि त्यावेळी बॉम्बे स्टेटने सुरु केलेल्या  उपक्रमाला आपण आज महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्ट कॉरर्पोरेशन अर्थात महाराष्ट्राची एसटी म्हणून ओळखतो त्या वेळेस भारतातील सार्वजनिक उपक्रमांची पहिली  बस  पुणे ते अहमदनगर या दोन शहरादरम्यान धावली होती 
           आपली एसटी स्थापन झाल्यावर पुढे ८ वर्षांनी केंद्र सरकारकडून सार्वजनिक वाहतूक कायदा स्थापन करण्यात आला .या कायद्यानुसार पुढे विविध राज्यात त्या त्या राज्याच्या एसटी स्थापन झाल्या . आपल्या एसटीकडून देशासाठी  अनेक मापदंड निश्चित करण्यात आले .१९६२ साली चीनविरुद्धच्या युद्धात आणि १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या  युद्धात आपल्या लष्कराला तातडीची गरज असताना बस बांधून दिली ती आपल्या महाराष्ट्राच्या एसटीने १९८३ साली देशात आशियाई खेळाचे सामने आयोजित करण्यात आले असता परदेशी खेळाडूंना आरामदायी बस सेवा पुरवली ती आपल्या महाराष्ट्राच्या एसटीने .या बसेसला आपण एशियाड किँवा हिरकणी या नावाने ओळखतो या बसेस त्यावेळी देशात अत्यंत कौतुकाच्या बसेस झाल्या होत्या . आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या बसेस लोकप्रिय
करण्यासाठी आपल्या एशियाड बसेसच्या रन्ग संगतीत त्यांच्या बसेस रंगवल्या या उचलेगिरीवरून आपणास या एशियाडच्या लोकप्रियतेच्या अंदाज येतो या उचलेगिरीविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात आपण दावा ठोकला जो आपण जिंकला मधल्या काळात आपल्या एसटीपुढे अनेक आव्हाने आली . सध्या देखील आहेत या आव्हानातच आपली एसटी स्वतःच्या अमृत महोत्वावाच्या वर्षात पदार्पण करताना काळाची पाऊले ओळखून इलेट्रीक बस सुरु करत आहे शिवाई या ब्रँडनेम अंतर्गत आपली एसटी हि बससेवा सुरु  करत आहे . ७४ वर्षांपूर्वी  पुणे अहमदनगर यामार्गावर पहिली बस धावली होती .आपली शिवाई ही बस देखील याच मार्गावर सुरु करण्यात येणार आहे एका अर्थाने एक इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार आहे 
        आम्ही  इलेक्ट्रानिक बसेस चालवणार आहोत अशी घोषणा देशात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राच्या एसटीने सुमारे  दोन वर्षांपूर्वी केली मात्र घोषणा केल्यानंतर ही सेवा सुरु करण्यासाठी करावयाच्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करण्यात आपण कमी पडलो दरम्यानच्या काळात गोव्याच्या कदंब ट्रासनपोर्टने (गोव्याचा एसटीला कदंब ट्रान्सपोर्ट म्हणतात ) बाजी मारली आणि राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर विविध मार्गावर इलेट्रीक बस सुरु केली आजमितीस १५० इलेट्रीक बसेस कदंब ट्रान्सपोर्टतर्फे चालवल्या जात आहेत आणि सुमारे ७५० इलेट्रीक बसेस आणण्याची प्रक्रिया विविध टप्यावर सुरु आहे गुजरात राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरत ते अहमदाबाद या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सध्या इलेट्रीक बसेस चालवण्यात येत आहेत.  या गोष्टीचा विचार करता देशात सर्वप्रथम नसले तरी इलेट्रीक बस सुरु करणाऱ्या सुरवातीच्या पहिल्या काही एसटीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या एसटीचा समावेश होत आहे हि आपल्या साठी अत्यंत अभिमानाची गोष्टच म्हणावी लागेल या वेळेस आपला पहिला क्रमांक हुकला असला तरी शेर कुछ भी हो जाये शेर ही रहाता है या म्हणीनुसार आपण देशात सुरु केलेल्या अनेक उपक्रमांचे महत्व तसेच आहे जे आपल्यासाठी गौरवास्पदच आहे आणि हा गौरवास्पद इतिहास ७४ वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे त्या निमित्याने सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?