खगोलशास्त्राची संशोधनाची दिशा बदलणारा शोध

         

  १२ मे २०२२ हा दिवस खगोल शास्त्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनीं लिहला जाईल गेल्या कित्येक  वर्षांपासून खगोल शास्त्रज्ञांना खुणावत असणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवराच्या फोटो शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचे यावेळी जगभरात विविध पत्रकार परिषदेमार्फत एकाचवेळी जाहीर करण्यात आले आणि समस्त खगोलप्रेमींमध्ये एक नवचैत्यन संचारले .आतापर्यंतच्या विज्ञानाचा इतिहासात कृष्ण विवराच्या फोटो घेण्याची ही दुसरीच वेळ होती या आधी एम ८७ या दीर्घिकेत असणाऱ्या कृष्णविवराचे छायाचित्र टिपण्यात मानवाला यश मिळाले होते . १८ व्या शतकात धूमकेतू शोधण्याची जगभरात मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु होती . अनेक  खगोलप्रेमी या काळात  आपापली दुर्बीण घेऊन आकाशाचा वेध घेत होती . त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे चार्ल्स मेसिंजर होय त्यांनी आणि त्यांच्या शिष्याने मिळून आकाश्यात एकूण ११० खगोलीय घटक शोधले ज्यात अनेक तारकासमूह , उपग्रह , आणि अन्य खगोलीय वस्तूंचा समावेश होतो चार्ल्स  मेसिंजर  यांच्या समांमनार्थ या खगोलीय घटकांना एम १ . एम २५ , एम ४९ अशी नावे दिली आहेत त्यातीलच एक म्हणजे एम ८७ होय . एम ८७ हि कन्या राशीत दिसणारी एका अंडाकृती दीर्घिका आहे 
      गुरुवारी  जाहीर करण्यात आलेल्या कृष्णविवराच्या फोटो घेण्यासाठी  इव्हेंट होरायझन टेलिस्कोपमार्फत ३०० खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते.  इव्हेंट होरायझन टेलिस्कोप  हा जगभरात विविध ठिकणी विखरून असलेल्या रेडिओ  टेलिस्कोपचा समूह आहे . जगभरात विखरून ठेवल्यामुळे पृथ्वीएव्हढी रेडिओ दुर्बीण उभारून होणाऱ्या निरीक्षणाएव्हढा परिणाम साधला जातो .  या आधी सन २०१९ मध्ये शास्त्रज्ञांना कृष्णविवराच्या फोटो मिळाला होता जो कन्या राशी समूहातील एम ८७ या दीर्घिकेचा  होता . 
१२ मे रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या पहिल्या दृष्टीक्षेपात, प्रतिमा फारशी दिसत नाही, एका पिवळ्या रंगाच्या आतमध्ये एका लांबट आकाराचा काळा ठिपका दिसतो मात्र  याच्या ज्या अनेक प्रतिमा शास्त्रज्ञांनी प्रसारित केल्या आहेत त्यातील शेवटच्या छायाचित्रात  कृष्णविवराचे दृश्य पुरावे मिळतात , जे सूर्यापेक्षा चार दशलक्ष पट मोठे आहे. प्रतिमेमध्ये, काळ्या-काळ्या रंगामुळे, आपण मोठ्या  वस्तू पाहू शकत नाही. तथापि,
आपण त्याच्या सभोवताली चमकणारा वायू पाहू शकतो, ; एक गडद मध्यवर्ती प्रदेश ज्याला सावली म्हणून ओळखले जाते, त्याच्याभोवती चमकदार रिंग सारखी रचना आहे.यापूर्वी, शास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या मध्यभागी अदृश्य आणि मोठ्या गोष्टीभोवती तारे फिरताना पाहिले होते परंतु त्यांना मिळालेला हा पहिला पुरावा आहे. ही वस्तू आपल्या पृथ्वीपासून सुमारे 27,000 प्रकाशवर्षे दूर आहे. सेकंदाला ३ लाख किलोमीटर या वेगाने प्रकाश एका वर्षात जितका प्रवास करतो त्या किलोमीटरला  एक प्रकाशवर्ष म्हणतात . असे २७ हजार वर्षे ही वस्तू आहे जी धनु राशीत आहे 
या कृष्णविवराची प्रतिमा इव्हेंट होरायझन टेलिस्कोप किंवा EHT, सहयोगाने, रेडिओ दुर्बिणीच्या जागतिक नेटवर्कवरून निरीक्षणे वापरून तयार केली होती. आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताच्या अंदाजांशी अंगठीचा आकार किती योग्य आहे हे पाहून आम्ही थक्क झालो,"असे मत यात सहभागी असणाऱ्या  जेफ्री बोवर यांनी व्यक्त केले आहे जगभरातील अनेक केंद्रांवर एकाच वेळी आयोजित पत्रकार परिषदेत, संशोधकांनी सांगितले की धनु राशीत असणाऱ्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्ण विवराची प्रतिमा घेणे  M87 दीर्घिकेच्या कृष्णविवराचा प्रतिमा घेण्यापेक्षा   अधिक कठीण होते  कारण  धनु राशीत दिसणारे कृष्णविवर  हे  M87*मधील कृष्णविवराच्या फक्त एक हजारव्या आकाराचे  आहे; दुसरे म्हणजे,पृथ्वीवरून दृष्टीची रेषेचा विचार करता या दोन्हीमध्ये अनेक घटक आहेत ज्यामुळे बऱ्याच  पदार्थांमुळे दृश्यमानता अस्पष्ट आहे; आणि आपल्या दीर्घिकेतील कृष्णविवर एम ८७ मधील दीर्घिकांमधील कृष्णविवरापेक्षा  पेक्षा खूपच लहान असल्यामुळे, त्याच्याभोवती फिरत असलेल्या वायूला  ती परिभ्रमण पूर्ण 
करण्यासाठी काही मिनिटे लागतात, उलट M87 मधील कृष्णविवराच्या भोवती फिरण्यासाठी आठवडे लागतात. ज्यामुळे प्रतिमा तयार करणे कठीण होते. स्पष्ट इमेजिंगसाठी सुमारे 8-10 तासांच्या दीर्घ प्रदर्शनाची आवश्यकता असते, त्यामुळे हा शोध विशेष महत्त्वाच्या आहे . 
हा शोध  खगोल शास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कदाचित २०२२चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देखील या शोधाला मिळू शकतो नोबेल पुरस्कार याचे जगात अन्यन साधारण महत्व आहे जगात जवळपास सर्वच शास्त्रज्ञांचे आपणस एखादा नोबेल पुरस्कार मिळवा असे स्वप्न असते त्या पार्श्वभूमीवर या शोधाचे महत्व लक्षात येते याचे भौतिक शास्त्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत ते  नक्की काय होतात ? या शोधामुळे खगोलशास्त्र  बघणे मोठ्या उत्सुकतेचे असेल घे मात्र नक्की 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?