चीनविरोधी आघाडीच्या बैठकीसाठी मोदी जपानला

         

 भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी क्वाड च्या बैठकीसाठी  जपानला जाणार आहेत मंगळवार २४ मे रोजी जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी हि परिषद होणार आहे क्वाड या गटात ऑस्ट्रेलियायचा पुर्नप्रवेश झाल्यावरची ही ऑनलाईन आणो ऑफलाईन दोन्ही पद्धतीचा विचार करता  चौथी  बैठक आहे   याच्या आधी मार्च २०२१ साली झालेली बैठक ऑनलाईन पद्धतीने झाली होती तर त्याच्या आधी २०२० साली झालेली बैठक ऑफलाईन पद्धतीने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया (डी सी ) या शहारत झाली होती ,. अमेरिकेच्या नेतृतवाखालील या  गटात भारत जपान ,ऑस्ट्रेलिया  हे सदस्य देश आहे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराला किनारा असलेल्या देशांच्या प्रदेशात आणणाऱ्या चिनी दादागिरीला आळा घालणे यासाठी हा गट २००७  या वर्षी स्थापन करण्यात आलाहिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराला किनारा असलेल्या देशांच्या प्रदेशातील भारत एक प्रमुख राष्ट्र असल्याने या भागाला जागतिक राजकारणाचा विचार करता इंडो पॅसिफिक भाग म्हणतात हा गट स्थापन करण्यासाठी त्यावेळेचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग ऑसट्रेलियाचे त्यावेळचे पंतप्रधान  जॉन हॉवर्ड तसेच अमेरिके उपाध्यक्ष डिक चेनी.यांनी विशेष परीक्षम घेतले या  गटातून २०१५ साली ऑस्ट्रलिया हा देश काही कारणाने बाहेर पडला.  आणि सन २०२० मध्ये पुन्हा गटात सहभागी झाला Quadrilateral Security Dialogue (QSD), बोलीभाषेत  क्वाड हा गट  हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे जो सदस्य देशांमधील चर्चेद्वारे साधला जातो 
            याविषयी पत्रकार  परिषदेत सांगताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंदम बागची यांनी सांगितले की प्रदेशाच्या विकासाबरोबर सध्या जागतिक राजकारणात चर्चिल्या जणाऱ्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होतील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अन्य देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा देखील करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली  जपानचे पंतप्रधान किंशिंद यांच्याबरोबर मार्च २०२२ रोजी नवी दिल्लीत झालेल्या १४  व्य भारत जपान वार्षिक बैठकीच्यावेळी सुरु असलेला संवाद पुढे नेण्यास हातभार लागेल. अमेरिकेचे अध्यक्षांबरोबर सप्टेंबर २०२१ मध्ये सुरु झालेल्या संवादाला यावेळी पुढे नेण्यात येईल तर ऑस्ट्रेलियायाचे पंतप्रधान यांच्याबरोबर विविध
जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा होईल 
 असे सांगितले या बैठकीच्या दरम्यान २१ मे रोजी ऑस्टेलियायात संसदेच्या निवडणूक होत असल्याने आणि विविध मतदानपूर्व कला चाचणीत ऑस्ट्रलियायाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा पराभव होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यानं कदाचित ऑस्ट्रिय पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची ही अखेरची बैठक ठरू शकते  
         भारत आणि चीन यांच्या सीमा क्षेत्रातील वादग्रस्त भाग असणाऱ्या पूर्व लडाख  परिसरात  असणाऱ्या पँगॉन्ग त्सो  लेक प्रदेशात  चीनने वर्षभरात दुसरा पूल बांधल्याचे उपग्रहावरील छयाचित्रणावरून उघड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच हि बैठक होत असलयाने याला भारताच्या संदर्भात विशेष महत्व आहे  तसेच भारताच्या जागतिक स्तरावर गव्हाची निर्यात थांबवण्याच्या निर्णयाचा जागतिक स्तरावर निषेध व्यक्त केला जात असताना चीनने भारताच्या निर्णयाला दिलेले समर्थन आणि क्वाडच्या ४ सदस्यांपैकी एक असणाऱ्या अमेरिकेने भारताच्या गहू निर्यतबंदी या निर्णयाविरुद्ध केलेली आगापखंड यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे हे  नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?