गोळीबार कधीपर्यत!

 

 मंगळवार 24 मेची अमेरीकन नागरीकांचा दुपारनंतरचा वेळ एका वाईट घटनेमुळे काहीसा काळवंडला.टेक्सास राज्यातील मेस्किको देशाच्या सिमेपासून एक तासाच्या अंतरावरील एका गावात एका 18वर्षीय नवप्रौढाने केलेल्या गोळीबारात 21 जणांना प्राणास मुकावे लागण्याची ती घटना होती. या21 जणांपैकी 19 जण 7 ते10  वयोगटातील बालके होती. तर 2 जण प्रौढ नागरीक होती. 24मे रोजी घडलेली शाळेतील गोळीबारीची ही 288वी घटना होती.2012 पासूनचा शाळेतील गोळीबाराच्या घटनेचा विचार करता ही घटना दुसरी भयानक घटना होती. यानंतर दुखवटा म्हणून अमेरीकेतील सर्व सरकारी कार्यालयातील ध्वज 28 मेपर्यत अर्ध्यावर आणण्याचे आदेश बायडेन प्रशासनाने दिले. त्यानंतर तातडीच्या स्वरुपात राष्ट्राला केलेल्या आपल्या संबोधनात राष्ट्रपती बायडेन यांनी गोळीबाराच्या वाढत्या घटना बघता यावर लगेच विनाविलंब पाउले उचलण्याची गरज बोलून दाखवली.
      तसी या आधी देखील यावर अनेकदा अमेरिकेत विचारमंथन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष शस्त्र वापरण्याचे नियम कडक करण्याबाबत काही कार्यवाही झाली नाही. अमेरीकेतील राजकरणात मोठा वरचष्मा असलेल्या गनलाँबीने ते होवू दिले नाही. त्यामुळे आपणास अमेरीकेत अस्या घटना आपणास वारंवार दिसतात. जगात सगळ्यात जास्त शस्त्रास्त्रे तयार करणारी, आणि ती विकली जावीत यासाठी जगभरातील विविध देशात विनाकारण वितुष्ट आणणारी अमेरीका स्वतःच स्वतः तयार केलेल्या जाळ्यात पुरती अडकलेली आहे. हे या घटनांतून स्पष्ट होत आहे.एका जागतिक अहवालानूसार जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी 4 %लोकसंख्या अमेरीका देशात रहाते. मात्र वैयक्तिक शस्त्रात्राचा विचार केला जगाच्या एकुण वैयक्तिक शस्त्राच्या पैकी 46% शस्त्रास्त्रे अमेरीकन नागरीकांनकडे आहेत.हे प्रमाण लोकसंख्येच्या साडेअकरापट आहेअमेरीकन गृहयुध्दाच्या वेळी अठराव्या शतकात, अमेरीकन केंद्रीय संविधानाच्या दूसऱ्या घटनादुरुस्तीने स्वसंरक्षणार्थ शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मुलभुत अधिकार अमेरीकन नागरीकांना देण्यात आला. ज्यावेळी शस्त्रास्त्रे बाळगणे, हा अमेरीकन नागरीकांचा मुलभुत 
अधिकार म्हणून मान्य करण्यात आला, तेव्हा अमेरीकेत रस्त्यावर दिवसाढवळ्या गुन्हेगार लोकांना लूटत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस बळ कमी पडत होते. देशातील यादवीमुळे देशात प्रचंड अस्थिरता होती.देशाचे विभाजन होते का?असा प्रश्न निर्माण झाला होता.आजमितीस त्यावेळची स्थिती पुर्णतः बदलली आहे. मात्र त्यावेळच्या परीस्थितीमुळे देण्यात येणाऱ्या मुलभुत अधिकराला अजूनही सोडचिठ्ठी देण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत.
वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक, या अतिरेकामुळे येणारे नैराश्य, एकटेपाणाची भावना याचा जोडीला सहजतेने होणारा शस्त्रात्र पुरवठा यामुळे या घटनांमध्ये अमेरीकेत दिवसोंदिवस वाढच होताना दिसत आहे. ज्यामध्ये तेथील समाजमन अक्षरशः ढवळून निघत आहे. याबाबत समाजशास्त्रज्ञ काळजी व्यक्त करत आहेत. त्यांचाकडून सातत्याने गनलाँ बदलण्याची मागणी होत आहे. मात्र परीणाम शुन्य. दरवेळी असी घटना घडल्यावर दोन्ही बाजुंनी यावर चर्चा होते. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची या प्रश्नासारखी सुरवात कोठून करायची यावर मतैक्य होत नाही. एकमत होत नसल्याने प्रश्न सुटत नाही. कालांतराने चर्चा देखील थांबते,पुढची घटना होण्यापर्यत.
24मे च्या घटनेच्या माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार तो मुलगा शाळेत जाण्याआधी आपल्या आजीला संपवू इच्छित होता.त्याचे हे करण्यामागची कारणे अद्याप माहिती झालेली नाहीत.पोलीसांकडून उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मुलगा मृत्युमुखी पडला आहे. सबब त्याची या मागची खरी कारणे कधीच उजेडात येणार नाहीत.
आपल्या भारतातील श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांची राहणी अमेरीकेसारखी आहे. {काही दिवसापुर्वीच आपल्या मुलीचा हत्येचा आरोपाखाली तूरुंगात असलेली इंद्रायणी(शीना बोरा हत्याकांड) याच वर्गाचे प्रतिनिधित्व करते.} त्यामुळे आपल्याकडे अमेरीकेसारखी स्थिती उद्भधणे काहीसे कठीण आहे. मात्र भारतात सध्या अत्यल्प असणाऱ्या या वर्गाचे प्रमाण दिवसोंदिवस वाढत आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण अमेरीकेच्या या घटनांमधून शहाणे होण्यातच आपले हित समावले आहे, हे मात्र नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?