.हॅप्पी बर्थडे अहमदनगर

 

  आज 28 मे 2022 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 533 वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 533 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन . 
            अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी निवडणुकीत वचन द्यावे असे शहर . आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरा दरम्यान धावली . त्यापैकी एक शहर जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांना बाजारपेठेत येण्यासाठी , ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर .  आपल्या भारतातील महत्तवाची वाहन कंपनी असणाऱ्या कायनेटिक कंपनीचे मुख्यालय असणारे अहमदनगर . लष्कराच्या रणगाड्याचे एक प्रमुख केंद्र म्हणजे अहमदनगर इस्लामी राजवटीच्या काळात ज्या मोजक्या महिला राज्यकर्त्या झाल्या त्यापैकी एक किंबहुना नर्मदेच्या दक्षिणेकडील एकमेव अश्या राणी चांदबिबीचे शहर म्हणजे अहमदनगर 
 अनेक ऐताहासीक वास्तूने भरलेले शहर म्हणजे अहमदनगर .ज्या गावाच्या नावात एकही काना मात्रा वेलांटी  उकार नाही तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब असणारे जिल्ह्याचे ठिकाण (7अक्षरे ) या शहराचे  नाव इतके लांब आहे की , सर्वसामान्य जनता त्याचे अ.  नगर असे संक्षिप्त रूपांतर शहर करते असे  शहर . अहमदनगर . सीना नदीच्या काठावर वसलेले,  बहामनी सत्तेचे पाच तुकडे झाल्यावर त्यातील निजामशाही या भागाचे मुख्यालय

असणारे शहर म्हणजे म्हणजे अहमदनगर. . भारतातील  मध्ययुगातील मोजक्या महिला  राज्यकर्त्यांपैकी एका असणाऱ्या चांदबिबीचे शहर म्हणजे अहमदनगर.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्तावाचे योगदान असलेले, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ज्या बंदिवासात डिस्कव्हरी आँफ इंडीया हा ग्रंथ लिहला त्या बंदिवासाचे ठिकाण म्हणजे अहमदनगर . महात्मा गांधी यांच्या खुनाच्या कटाची आखणी ज्या शहरात झाली, ते शहर म्हणजे अहमदनगर.
        या शहरात  सध्या पाणी ,रस्ते, ,मनपाचे थकलेले कर उत्पन्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था  आदी प्रश्न आहेत .राणी चांदबीबी जरी या २०२२ वर्षी फिरायला आली तरी आरामात न चुकता घोड्यावरून आणि फक्त घोड्यवरुनच फिरू शकेल अशे शहर म्हणजे अहमदनगर असे  कुत्सितपणे अहमदनगरविषयी  बोलले जाते त्याविषयी नंतर बोलल,. सध्या पुरते  इतकेच.  पुन्हा एकदा अहमगनगरच्या रहिवाश्याना अहमदनगरच्या वाढदिवश्याच्या मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?