एकाचवेळी दोन वेगवेगळ्या टोकांवर असणारा प्रदेश मराठवाडा

       

     गेल्या महिनाभरात दोनदा नाशिकहून मराठवाड्यात फिरण्याचा योग आला.पहिल्यांदा पर्यटनाच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात फिरलो .त्यानंतर पंधरा दिवसांनी पर्यटनाच्या उद्देशाने बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली. या दोन्ही भेटी दरम्यान मला आढळलेली एक महत्तवाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील रस्त्यांची अतिशय चांगली अवस्था तसेच या उलट एखाद्या वस्तू संग्रालयात शोभावी असी ब्रिटीशकालीन रेल्वे व्यवस्था .एकाचवेळी दोन भिन्न टोकाच्या विरोधाभास असणाऱ्या वाहतूक व्यवस्था या एकाच प्रदेश्यात सुखानैव नांदत असल्याचे चित्र आपणास मराठवाडा प्रदेशात सर्व ठिकाणी सहजतेने दिसते.
         बीड आणि जालना जिल्ह्याचा विचार करता अगदी खेड्याचा दारापर्यंत उत्तम, रस्त्यावर खड्डा दाखवा दहा हजार रुपये मिळवा असी योजना सुरु करावी अस्या पद्धतीचे रस्ते आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना ,तसेच यांना जोडणाऱ्या अनेक उपरस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून त्यांचे क्राँकिटीकरण तसेच रुंदीकरण केल्याचे या जिल्ह्यात फिरताना सहज दिसून येते.या नव्याने बांधलेल्या रस्त्यावर औषधाला देखील शोधून  खड्डा  सापडत नाही   या उलट स्थिती रेल्वेबाबत आहे मराठवाड्यात असणाऱ्या रेल्वेमार्गापैकी काही मोजके रेल्वेमार्ग सोडता सर्वत्र डिझेलवर चालणारे एकेरी मार्गच आहेत या एकेरी मार्गावरूनच दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या धावतात एकच मार्ग असल्याने अनेकदा दुसऱ्या गाडीला मार्ग देण्यासाठी रेल्वे अनेकदा बाजूला स्लयडींगला थांबतात . एखादी रेल्वे कितीवेळा आणि किती काळासाठी  स्लायडींगला थांबेल याचे ऊत्तर भारतीय रेल्वेचं जाणे याला भरीस भर म्हणून संपूर्ण मराठवड्यात अजूनही डिझेल इंजिनेच वापरली जातात मात्र मराठवाड्यात ब्रॉडगेजचीच रेल्वे वापरली जाते मीटर गेज किंवा नॅरो गेजची रेल्वे मराठवाड्यात वापरली जात नाही
हेच ते काय  मराठवाड्यचे नशीब एकीकडे आपण मुबई अहमदाबाद या मार्गावर अत्याधुनिक बुलेट ट्रेनसाठी मार्गिका उभारत असताना ब्रिटिशकालीन रेल्वेतून प्रवास करण्याची अनुभूती  मराठवाड्यातून  रेल्वे प्रवास करताना येते 
           मी दोन्ही वेळेस औरंगाबाद शहरातून या जिल्ह्यात प्रवेश केला रस्तेमार्गाने प्रवास करताना मला कुठेही एमआयडिसी ची पाटी दिसली नाही दिसली ती नांगरून पुढच्या पेरणीसाठी सज्ज होणारी शेते मला संपूर्ण प्रवाश्यात बीड जिल्ह्यात अंबेजोगाई या गावातून  केज नाणेतुरे मार्गे बीडमध्ये येताना एकाच ठिकाणी बीड शहराजवळ मोठ्या प्रमाणात जलसाठा दिसला त्या एकमेव जलसाठ्याचा अपवाद वगळता काही अत्यंत कोरडे कालवे दिसले एकंदरीत तहानलेल्या प्रगतीसाठी आसुसलेल्या  मराठवाड्याचे दर्शन मला या दोन्ही वेळेस दिसले . मी फिरण्याच्या उद्देश्याने माहिती घेण्यासाठी जेव्हा दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट बघितल्या .त्यावेळीस या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबाबत मोजकी माहिती त्या ठिकाणी देण्यात आल्याचे मला दिसले जिल्हाधिकारी कार्यालयातही माहिती ही अधिकृत समजली जाते त्यामुळे यात सुधारणा व्हावी असे मला वाटते . मी पुण्यात असताना फिरण्याच्या दृष्टीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईट बघितल्या होत्या दोन्हीमध्ये पर्यटनाला विशेष महत्व दिले असल्याचे मला दिसले असो तसेच जालना आणि बीड या जिल्ह्यातील अत्यंत मोजक्या पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर आहे या पर्यटनस्थानमध्ये देखील धार्मिक स्थळांचीच माहिती त्या ठिकाणी आहेत यात सुधारणा झाल्यास मी,मराठवाड्यतील पर्यटन सुधारेल यात शंका नाही 
         मी बीड जिल्ह्याच्या पर्यटनात बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला शहेनशाल्वाली दर्गा , परळी येथील ज्योतींलिंग , आणि अंबेजोगाई येथील देवी मंदिर या बीड जिल्ह्याच्या वेबसाईटवर माहिती असलेल्या सर्वांच्या सर्व पर्यटनस्थळाना भेटी दिल्या . बीड शहराजवळ असेलेला दर्गा बस स्टॅन्डपासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर दूर आहे रिक्षाने गेल्यास जाण्यास आणि येण्यास प्रत्येकी ६० रुपये लागतात दर्ग्याच्या परिसर  शांत आणि रमणीय असून सुमारे वीस ते २५ मिनिटात संपूर्ण दर्गा शांततेत बघून होतो बीड शहरात एका चौकात  पुणे , धुळे , आणि सोलापूर येथून येणारे रस्ते एकत्र येतात त्या चौकातील चवथा रस्ता दर्ग्याकडे जातो दर्गा एका छोट्याशा टेकडीवर उभारला असून पायथ्यापासून दर्ग्यात जाण्यासाठी सुमारे १५ ते २० पायऱ्या चढाव्या लागतात दर्गा बीड जिल्ह्यतील महत्त्वाचे पपर्यंटन स्थळ असून देखील गाईड किंवा खाण्यापिण्याच्या सोइ तिथे फारश्या नाहीत मी रविवारी जेव्हा दर्ग्याला भेट दिली त्यावेळीस गर्दी नसल्याने नसेल कदाचित दर्ग्याच्या उस्तवाच्या वेळी असेल कदाचित मात्र अन्य वेळी थोडीतरी सुविधा असायला हवी असे मला वाटते . बाकी बीड शहर जालना शहरांपेक्षा जास्त स्वच्छ , आणि जास्त मोठे रस्ते असणारे आहे मला जालना शहरापेक्षा अधिक चांगल्या खाण्यापिण्याच्या सोइ बीड शहारत आढळल्या .दर्ग्याच्या भेटीनंतर मी  परळी येथील ज्यातेर्लिंग आणि अंबेजोगाई या देवस्थांकडे माझा मोर्चा वळवला आणि तेथून नाशिकची प्रस्थान केले बीड शहरातून
परळीसाठी मोठ्या प्रमाणात बस सेवा उपलब्ध आहेत परळीहून अंबेजोगाईसाठी दर पाच ते दहा मिनिटांनी गाड्या आहेत परळी बस स्थानकातून मंदिरात जाण्यासाठी रिक्षा वापरल्यास रिक्षावाला ४० रुपये घेतो तर अंबेजोगाईत बस स्थानकातून मंदिरात जाण्यासाठी ३० रुपये रिक्षेसाठी मोजावे लागतात  
बीडहून परळी ९० किमी तर परळीहून अंबेजोगाई २५ किमी दूर आहे रस्ता चांगला असल्याने बीडहून परळीला सुमारे पवणेदोन  तासात तर परळीहून अंबेजोगाईस पाउण तासात एसटीच्या सध्या गाड्यातून सहजतेने पोहोचू शकतो बीडहून अंबेजोगाईला दोन मार्गाने पोहोचता येत एक मार्ग म्हणजे तेलगाव परळी मार्गे तर दुसरा मार्ग मह म्हणजे केज नावेतुरे मार्ग होय केजमार्गे आल्यास थोडे लांब पडते मात्र नांदेडहून  बीडला येणाऱ्या आणि   जणाऱ्या बसेस प्रामुख्याने केजचा मार्ग वापरत्तात दोन्ही रस्ते सारखेरच उत्तम आहेत मात्र केज मार्गवर खाण्याच्या सोइ कमी प्रमाणत असल्याचे मला दिसले असो  नाशिकहून जायचे असल्यास बीड औरंगाबादहून १२० किमी तर अहंगनगरहून १४५ किमी दूर आहे एसटी बसचा विचार करता अहमदनगरपेक्षा औरंगाबादहून बससेवा अधिक उत्तम आहे औरंगाबादच्या सिडको बस स्टँडहून पंढरपूर , कलबुर्गी , उस्मानाबाद आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेसमधून आपण सहजतेने बीडला पोहोचू शकतो 
मराठवाड्यत बघण्यासारखी अनेक स्थळे आहेत मात्र त्या ठिकाणी खूप कमी लोक जातात कमी लोक जात असल्याने हि स्थळे सहजतेनं बघता येतात . मग बघणार ना ही पर्यटन स्थळे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?