ज्वालामुखीच्या तोंडावर पाकिस्तान

   


    सध्या पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांतून दिसून येत आहे आंतराष्ट्रीय नाणेनिधीने इंधनावर देण्यात येणारी सबसिडी कमी करायला सांगितले आहे असे कारण देत पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारने पहिल्यांदा ३० पाकिस्तानी रुपये आणि त्यानंतर आठ दिवसात पुन्हा ३० पाकिस्तानी रुपये असे एकूण ६० पाकिस्तानी रुपयाने पेट्रोलची दरवाढ एका आठवड्यात केली . विद्यमान सरकारच्या गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत विजेचे दर २४ रुपये प्रति युनिट असे वाढवले आहे गव्हाचा तयार पिठाच्या दरात २४० पाकिस्तानी रुपये प्रति गोणी इतकी वाढ केली आहे पाकिस्तानच्या सरकारने अधिकृतरीत्या प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या दोन महिन्यात महागाई निर्देशांकात २ टक्यांची वाढ झाली आहे सरकारच्या अधिकृत अहवालात दोन % वाढ सांगण्यात आली आहे म्हणजे पाकिस्तानात महागाई किती वाढली असेल याचा अंदाज येतो आजमितीस पाकिस्तानमधील महागाई निर्देशांक २० पूर्णांक ८ शतांश  आहे .

            पाकिस्तानच्या सरकारने देशाच्या गंभीर आर्थिक स्थितीवर विरोधकांनी राजकारण न करता सरकारचे हात बळकट करण्याचे आवाहन केले आहे आजमितीस पाकिस्तानमध्ये एकच प्रबळ विरोधी पक्ष आहे तो म्हणजे माजी क्रिकेटर इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीके इन्साफ हा होय . याच पाकिस्तान तेहरीके इन्साफ  पक्षाचे पंतप्रधान इम्रान खान देशाची आर्थिक घडी नीट लावत नाही असा आरोप करत त्यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणत सध्याचे सरकार सत्तारूढ झाले आहे इम्रान खान यांच्या कार्यकाळात विरोधी असणारे सर्व प्रमुख विरोधक पाकिस्तान डेमोक्रेक्तिक अलायन्स या नावाने आघाडी करत सध्या सरकारमध्ये सहभागी आहेत आणि तेच आता इम्रान खान याना सहकार्य करावे असे सांगत आहेत 

      सध्या विरोधी पक्षात असणाऱ्या इम्रान खान यांच्या मते त्यांच्यावर देखील आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या इंधनाचे दर वाढवण्याविषयी दबाव होता मात्र त्यास ते बळी पडले नाहीत तर रशिया सारख्या देशांकडून कमी दराने इंधन खरेदी करून देशातील नागरिकांना देण्यात येणारी सबसिडीच कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांच्या मते त्यांनी  रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदी करण्यासाठी करावयाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली होती जर हि

प्रक्रिया यशस्वी झाली असती तर देशातील इंधनाचे दार सुद्धा कमी झाले असते ज्यामुळे महागाई कमी होण्यास हातभार लागला असताहि प्रक्रिया होण्यासाठी त्यांनी रशियाला एक पात्र देखील दिले होते मात्र अमेरिकेचे बाहुले असलेल्या विद्यमान सरकारने त्याबाबत काहीही इच्छुकाता दाखवली नाही तर विद्यमान सरकारच्या मते इम्रान खान यांच्या पत्राबाबत रशियाने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही 

  इधनाचे दर वाढल्यामुळे आधीच प्रचंड वाढलेली महागाई अजून वाढेल हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे सध्या पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साथ अत्यंत मर्यादित आहे पाकिस्तानचे जवळचे मित्र समजल्या जाणाऱ्या युनिटेड अरब अमिरात आणि सौदी अरेबिया या देशांनी पाकिस्तानला प्रथम आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाण्यास सांगितले आहे त्यांच्याकडून प्रस्ताव तयार झाल्यावर मग आम्ही मदत करू असे सांगितले आहे त्यामुळे श्रीलंकेसारखी स्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाणे क्रमप्राप्त आहे आंतरराष्टीय नाणेनिधीने पाकिस्तानी सरकारला इंधनावरील सबसिडी कमी करण्याचे आदेश दिले आहेत परिणामी पाकिस्तानी सरकारला इंधनाचे दर वाढवणे क्रमप्राप्त आहे मात्र या सर्वांमध्ये पाकिस्तानी जनता मात्र होरपळून निघत आहे या असंतोषाला खात पाणी घालण्यासाठी विरोधी पक्ष तयारच आहे ज्यामुळे पाकिस्तानात गृहयुद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो जे भारताला पाकिस्तान शत्रू राष्ट्र असला तरी परवडणारे नाही भारतासाठी शांत पाकिस्तानच आवश्यक आहे टायचे पडलेले विविध तुकडे रोगापेक्षा उपचार भयंकर असे ठरण्याचा धोका आहे तरी पाकिस्तान लवकरत लवकर या त्रासातून बाहेर पाडण्यातच भारताचे हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?