बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारे विश्वनाथन आनंद

   

  आपल्यला  असणाऱ्या प्रत्येकाच्या नावाला काहीतरी अर्थ असतो .जसे माझ्या अजिंक्य नावाचा अर्थ ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा होतो . आता प्रत्येकजण त्याचे नाव सार्थ करतो का ? हा एका मोठ्या संशोधनाचा विषय ठरेल .असे संशोधन या पूर्वी झाले आहे का ? असल्यास त्याचा निष्कर्ष काय होता ? यापुढे भविष्यात असे कोणते संशोधन होईल का ? याबाबतही मी काही सांगू शकत नाही मात्र मी एक गोष्ट १०० % खात्री घेऊन सांगू शकतो ती म्हणजे आपल्या भारतातील एक व्यक्ती मात्र आपल्या नावाला जागली आहे आपले नाव निवळ एक नाव नसून ते नाव त्यांनी सिद्ध केले आहे त्या व्यक्तीचे नाव आहे विश्वनाथन आनंद 
         भारतातील पहिले ग्रँडमास्टर, तसेच  ५ वेळा विश्वविजेते असणाऱ्या आणि आजमितीस भारतातील सर्वाधिक फिडे गुणांकन असणाऱ्या विश्वनाथन आनंद यांचे सध्या सुरु असलेल्या नॊर्वे येथील बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरी बघता बुद्धिबळप्रेमींना आपल्या खेळाद्वारे आनंद देणारे बुद्धिबळपटू म्हणजे  विश्वनाथन आनंद असेच म्हणावे लागेल ८ जूनपर्यंत झालेल्या ७ डावाचा विचार करता विश्वनाथन आनंद यांचे १३ गुण झाले झाले आहेत.  ते या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांच्या पेक्षा अधिकचा  अर्धा मार्क मिळवत साडे १३ गुणांसह विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन पहिल्या क्रमांकावर आहेत या स्पर्धेत बुद्धिबळाच्या पारंपरिक पद्धतीने (ज्याला बुद्धिबळाच्या भाषेत क्लासिकल म्हणतात ) सामने खेळवण्यात येत आहे ज्यात जिंकल्यास एक गुण देण्यात येतो मात्र सामना बरोबरीत सुटल्यास पपांढरे मोहरे घेऊन खेळणाऱ्या व्यक्तीस  १० मिनिटे तर काळे मोहरे घेऊन
खेळ्णाणाऱ्यास ७ मिनिटे देऊन जलद पद्धतीने सामने खेळवण्यात येतात . यात जो खेळाडू विजयी होतो त्यास दीड गुण देण्यात येतो स्पर्धेचे हे स्वरूप बघता विश्वनाथन आनंद हे मॅग्नस कार्लसन यांना मागे टाकत कधीही पहिल्या क्रमांकावर येऊन स्पर्धेतील विजेतेपद आपल्या खिश्यात घेऊ शकतात हे कोणत्याही बुद्धिबळप्रेमींचा लक्षात येईल 
         विश्वनाथन आंनद यांनी सात फेरीपर्यंत बुद्धिबळपटूंना अत्यंत आनंद देत जलद प्रकाराच्या खेळाद्वारे अनेक मात्तबर खेळाडूंना अस्मान दाखवले आहे ज्यामध्ये विद्यमान विश्वविजेता जो गेल्या ५ वर्षाप[सून विश्वविजेता आहे अस्या मॅग्नस कार्लसनसह नॊर्वचा आघाडीचा बुद्धिबळ खेळाडू अनिश गिरी अश्या खेळाडूंचा समावेश आहे . या स्पर्धेतील विजयामुळे त्यांचे फिडे गुणांकात  सुखावणारी वाढ झाली आहे ज्यामुळे ते जगभरातील सर्वाधिक फिडे गुणांकन असणाऱ्या पहिल्या १० जणांत आले आहेत ८ जूनपर्यंत झालेल्या ७ डावात त्यांनी पहिला डावा बरोबरीत सुटल्यामुळे खेळवण्यात आलेल्या जलद डावाद्वारे ४ विजय मिळवले आहेत या ४ विजयांपॆकी ३ विजय पांढरे मोहरे घेऊन घेऊन त्यांनी मिळवले आहेत 
     स्पर्धेच्या पहिल्या डावात पांढरे मोहरे घेऊन खेळताना विश्वनाथन आनंद यांनी २७५० फिडे गुणांकन असणाऱ्या वाचियर-लाग्रेव्ह,याना पराभवाची चव चाखायला लागली फिडे गुणकांना २७०० पेक्षा जास्त असणारे बुद्धिबळ खेळाडूं खेळात अत्यंत निपुण समजले जातात विशवनाथन आंनद यांनी धूळ चरायला लावणारा खेळाडूंचे गुणकांना या मर्यादांपेक्षा जास्त होते हे आपण लक्षत घेयला हवे डावाची सुरवात आनंद यांनी त्यांची आवडती खेळी असलेल्या राज्यासमोरील प्यादे दोन घरे चालवूंन केली (बुद्धिबळाच्या भाषेत e4 ) त्याला प्रतिस्पर्ध्याने वजिराच्या शेजारील उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून उत्तर दिली (बुद्धिबळाच्या भाषेत c5)दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना आनंद यांनी वेसेलिन टोपालो याना पराभव दाखवला दोन्ही खेळाडूंनी वजिरासामोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली (बुद्धिबळाच्या भाषेत d4 d5)याच डावात विजयश्री मिळाल्याने विश्वनाथन आनंद हे पहिल्या दहा खेळाडूत समाविष्ट झाले तिसऱ्या सामन्यात आनंद याना पहिल्यांदा जलद बुद्धिबळ खेळाद्वारे विजय संपादित करावा लागला हा विजय त्यांनी  Hao Wang यांच्या विरुद्ध मिळवला डावाची सुरवात पहिल्या डावाप्रमाणे राज्यासमोरील प्यादे दोन घरे चालवूंन (बुद्धिबळाच्या भाषेत e4 )  आणि वजिराच्या शेजारील उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून (बुद्धिबळाच्या भाषेत c5) झाली यावेळी आनंद पांढऱ्या मोहरे घेऊन खेळत होते चोथ्या डावात मात्र विश्वनाथन आनंद यांची विजयाच्या मालिकेला विराम लागला मुख्य डाव बरोबरीत सुटल्याने खेळवण्यात आलेल्या जलद बुद्धिबळ डावात Wesley यांनी त्यांना हरवले . पाचव्या डावात पांढरे मोहरे घेऊन  खेळताना विद्यमान विश्वविजेता मॅग्ननस कालार्सन याना हरवले मागच्याच आठवड्यात याच स्पर्धेच्या जलद बुद्धिबळ प्रकारात त्यांनी  मॅग्ननस कालार्सन पराभूत केले होते हे विशेष आपण माजी असलो तरी विश्वविजेते
आहोत याची जाणीवच जणू त्यांनी विद्यमान विश्व्विजेत्याला करून दिली बहुतेक  या डावातील मुख सामना बरोबरीत सुटल्याने याचा विजेता ठरवण्यासाठी याचा जलद बुद्धिबळ प्रकारातील सामना खेळवण्यात आला ज्यात विश्वनाथन आंनद यांनी बाजी मारली या फेरीतील मुख्य सामन्यात दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या राज्यासमोरील प्यादे दोन घरे चालवूंन केली (बुद्धिबळाच्या भाषेत e4 e5 ) मुख्य सामन्यात विश्वनाथन आनंद हे पांढरे मोहरे घेऊन खेळत होते या सामन्याच्या दुसऱ्या खेळात सुद्धा  न्ही खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या राज्यासमोरील प्यादे दोन घरे चालवूंन केली (बुद्धिबळाच्या भाषेत e4 e5 )याही वेळी विश्वनाथन आंनद पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळले . सहाव्या फेरीत मुख्य सामना बरोबरीत सुटल्याने खेळवण्यात आलेल्या जलद डावात चमकदार कामगिरी करत विश्वनाथन आनंद यांनी नॉर्वचा खेळाडूं (भूमिपुत्र स्थानिक खेळाडू )असलेल्या अनिष गिरी याला पराभवाचे तोंड बघायला भाग पडले या डावात मुख्य फेरीत काळ्या मोहरे घेऊन खेळताना विशवनाथन आनंद यांनी अत्यंत प्रभावशाली खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने वाजीइराकडील घोड्याच्या समोरील प्यादे एक घर चालववून डावाची सुरवात केली (बुद्धिबळाच्या भाषेत b3)त्यास आनंद यांनी वजिरसमोरली प्यादे दोन घरे चालवून उत्तर दिले (बुद्धिबळाचा भाषेत d5 ) सहाव्या फेरीअखेर पर्यंत विश्वनाथन आनंद दे साडे अकरा गुण मिळवूंन दुसरे होते तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस याचे साडे बारा गुण झाले होते सातव्या फेरीत जलद बुद्धिबळात लक्षणीय कामगिरी करत विश्वनाथन आनंद यांनी रजाबोव:याना पराभव स्वीकरायला भाग पडले सातव्या फेरी अखेर मॅग्नस या स्पार्धेत साडे तेरा गुणांसह पहिल्या क्रंमाकवर आहेत 
बुद्धिबळासह कोणत्याही खेळात कारकीर्द करण्याचे एक विशिष्ट वय असते बुद्धिबळ देखील त्यास अपवाद नाही बुद्धिबळ हा बैठा खेळ असला तरी बुद्धिबळ खेळण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक क्षमता , विश्लेषणाची क्षमता , आणि अन्य शारीरिक क्षमता जसे तासनंतास बसण्याची क्षमता आदींचा विचार करता अन्य खेळांप्रमाणेच खेळाडूंना हा खेळ सोडावा लागतो अन्य खेळाच्या तुलनेत बुद्धिबळ सोडण्याचे वय थोडे जास्त असले तरी एका
विशिष्ट  वयानंतर हा खेळ सोडावाच लागतो विश्वनाथन आनंद वयाच्या याच टप्यावर आहेत मात्र एखद्या कसलेल्य
पहिलवानांप्रमाणे बुद्धिबळ क्षेत्रात अजूनही घट्ट पाय रोवून बसले आहेत त्यांच्यातील  खेळाची ताकद अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे जी गोष्ट खरोखरीच कौतुकास्पद आहे 
       आपल्याकडे वैयक्तिक खेळामध्ये प्रामुख्याने शारीरिक क्षमता जोखणाऱ्या भालाफेक गोळाफेक किंवा बँडमिंटन सारख्या खेळांना अधिक उत्तेजन मिळते मात्र या खेळाच्या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांचा फारसा  सहभाग नसतो तसे बुद्धिबळाचे नाही बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंचे डावा मोठ्या पडद्यावर दाखवले जातात ज्यामुळे ते डावा बघता प्रेक्षकसुद्धा पुढची खेळी काय असेल याचा अंदाज बांधत खेळाडूंबरोबर अप्रत्यक्षरीत्या खेळायला लागतात असा प्रेक्षकांचा सहभाग अन्य खेळात नसतो त्यामुळे बुद्धिबळाला खेळांचा राजा असे म्हटल्यास वावगे ठरू नये या खेळाच्या राजाला विश्वनाथ आनंद यांच्या या यशामुळे सिहांसन मिळाल्यास तो क्षण प्रत्येक क्रीडाप्रेमींसाठी आनंदाचा असेल यात शंका नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?