किमान यांची आठवण ठेवत अन्न नासाडी टाळा

     


       आपण आफ्रिका खंडाचा नकाशा बघितला तर आफ्रिका खंडाच्या ईशान्येला गेंड्याच्या शिंगासारखा भाग दिसतो या भागाला सुद्धा  हॉर्न (गेंड्यांच्या शिंगाला हॉर्न म्हणतात ) ऑफ आफ्रिका म्हणतात.  सोमालिआ केनिया इथोपिया आदी देश या भागात येतात सध्या या भागात  मन हेलावून टाकेल अशी  अन्न टंचाई निर्माण झाली आहे  या भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाऊस न पडल्याने शेती जवळपास संपलीच आहे शेती नसल्याने तेथील अन्नधान्याची गरज हि युक्रेन या देशातून अन्नधान्यआयात करून भागवली जात होती या भागाच्या एकूण गरजेच्या सुमारे ९८% गरज ही युक्रेन देशातून भागवली जात होती  रशिया युक्रेन युद्धामुळे ही आयात पूर्णतः बंद झाली आहे परिस्थिती इतकी वाईट आज की या भागात दर ४८ सेकंदाने एक भूकबळी जात आहे . तासाला ७२ लोक अन्न नसल्याने प्राणास मुकत आहेत . हॉर्न ऑफ आफ्रिका भागातील देश आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब आहेत त्यामुळे या देशांकडून इतर सधन देशाकडून अन्नधान्य आयात करण्यावर सुरवातीलाच अनेक बंधने आहेत त्यातच निसर्गाने देखील त्यांच्याशी सवतासुभा उभा केल्याने त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे अमेरिका रशिया आदी महासत्ता त्यांची सत्तेची भूक भागवण्यासाठी गरज नसताना युद्ध खेळतात तेव्हा या देशांची  स्थिती अजूनच शोचनीय होते सध्या हे देश तोच अनुभव दुर्दैवाने घेत आहेत 

         २०११ साली सुद्धा या देशात प्रचंड मोठा अशा दुष्काळ पडला होता . त्यावेळी सोमालिया या देशात २ लाख लहान मुले मुली आणि किशेरवायीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या . . २ लाख ही संख्या आपल्याकडील सुमारे पाउण विधानसभा मतदार संघांइतकी आहे नाशिक महानगरपालिकेत होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी २५ ते ३५ हजार लोकांचा एक प्रभाग केला आहे म्हणजेच नाशिकमधील सुमारे ८ प्रभागांत राहणाऱ्या लोकसंख्येएव्हढी तरुण २०११साली सोमालियात मृत्यमुखी पडले होते स्वामी विवेकानंद यांनी भुकेलेल्या लोकांना पहिले खायला द्या मग त्यांना गीतेचा उपदेश करा  असा सल्ला आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना

दिला होता  उपाशी पोटी केलेला गीतेचा उपदेश व्यर्थ आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.हॉर्न ऑफ आफ्रिका या प्रदेशातील देशात मुळात अन्नाची टंचाई असल्याने जग ५ जी वापरते कि ६ जी फायबर टेक्नोलॉलजी वापरते की लेसर टेक्नोलांजी वापरते या बाबींकडे या देशातील लोकांचे लक्षच नाहीये त्यांचे लक्ष एकचगोष्टीकडे असते  काल मिळाले नाही किमान आजतरी आपण ढेकर देण्यापुरते जेवू शकू का याकडे त्यांच्या या विचारणामुळे प्रगतीची फळे त्यांना मिळत नाही त्यामुळे स्वामी विववेकानंद यांच्या या वाचनाची सातत्याने आठवण येते 

     अन्नाची भीषण टंचाई त्यात शब्दशः १८ विश्वे दारिद्य त्यामुळे या देशात राजकीय अस्थिरता आणि गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणात आढळतात  परिस्थितीने गांजलेली लोक कोणाच्याही राजकीय प्रभावाखाली येतात त्यातून राजकीय अस्थिरता निर्माण होते राजकीय अस्थिरतेमुळे प्रदेशाच्या फारशा विकास होत नाही परिणामी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढते गुन्हेगारी वाढल्यामुळे अन्नधान्य त्या प्रदेश्यात गेल्यावर टोळी प्रमुख ते लुटतात सर्वसामान्य जनता उपाशीच राहते मग पुन्हा ही उपाशी जनता एखाद्या राजकीय प्रभावाखाली येते आणि चक्र सुरूच राहते सोमालियन चाचे यांचे प्रताप आपण अनेकदा ऐकतो ते याच भागातले असतात  जगाच्या एकूण समुद्री मालवाहतूकीत मोठा वाटा असलेल्या भूमध्य समुद्र सुवेझ कॅनॉल याच प्रदेशात आहेत परिणामी आपल्या भारतीय नौदलाला त्या भागात सुरक्षेची कामे करावी लागतात ज्यामुळे भारतीय नौदलाची अन्य कामे करण्याची शक्ती काहीशी विभागली जाते .फारशी जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती नसताना मिळालेल्या भौगोलिक स्थानाचा

फायदा घेत सिंगापूर हा टिकलीएवढा देश जगात ताठ मानेने जगतो मात्र तसेच  भौगोलिक स्थान मिळाले असून देखील होर्न ऑफ आफ्रिका गरीब राहतो कारण हॉर्न ऑफ आफ्रिकेकडे अन्न नाहीये . 

     आपल्याकडे अत्यंत कडक लोकडाऊन असताना भारतने या देशांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य दिले होते आता देखील मानवतेच्या भावनेतून भारतने हे पाऊल उचलण्याची गरज आहे मला विश्वास आहे भारत त्यांना नक्कीच मदत करेल  आपण देखील अन्न खाताना  किमान यांची आठवण ठेवत अन्न नासाडी टाळू शकतो मग टाळणार ना अन्न नासाडी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?