नव्या पायंडाला प्रारंभ

       


 भारताने जगाला अनेक गोष्टींची देणगी दिली आहे अनेक गोष्टींची सुरवात पहिल्यांदा भारतात झाली अनेक शोध पहिल्यांदा भारतात लागले . त्यानंतर त्या गोष्टी जगाने स्वीकारल्या अंकगणित सोपे करणाऱ्या शून्याचा शोध असो किंवा शारीरिक क्षनमतेबरोबर बौद्धिक क्षमता जोखणारा बुद्धिबळासारखा खेळ असो  किंवा आता बॅडमिंटन सारखा शारीरिक क्षमता जोखणारा खेळ असो (बॅडमिंटनच्या शोध पुणे या शहरात लागला आहे )  या गोष्टींची यादी केल्यास यामध्ये अनेक गोष्टींचा सहजतेने समावेश करता येईल आगामी काळात या यादीत अजून एका गोष्टीची भर पडणार आहे . 

        २८ जुलै ते १० ऑगस्ट या काळात चेन्नई या शहरात  होणाऱ्या ४४ व्या  बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेद्वारे बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या एका नव्या पर्वाला सुरवात होणार आहे १९२४ पासून होणाऱ्या बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत  चेन्नई येथे होणाऱ्या  बुद्धिबळ ऑलम्पियाडपासून मशाल दौड सुरु करण्यात येणार आहे या आधी झालेल्या ४३ बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत मशाल दौड आयोजित करण्यात आलेली नव्हती चेन्नई  येथे होणाऱ्या बुद्धिबळ

स्पर्धेचा शुभंकर 

ऑलम्पियाड पासून मशाल दौडाच्या  नव्या पायंडाला प्रारंभ होत असल्याने हे बुद्धिबळ ऑलम्पियाड अन्य बुद्धिबळ ओलम्पियाडपेक्षा वेगळे आहे मुळात या बुद्धिबळ ऑलम्पियाडचे आयोजन अत्यंत विक्रमी कमी वेळात करण्यात येत आहे मुळात हे ऑलम्पियाड रशियात होणार होते मात्र रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर जागतिक समुदायाकडून रशियावर अनेक बंधने लादण्यात आली ज्यानुसार त्यांच्याकडील बुद्धिबळ ऑलम्पियाडची जवाबदारी काढून घेण्यात अली त्यानंतर जेमतेम  जवळपास पाच महिन्याचा कालावधीत नियोजित वेळापत्रकामध्ये फारतर दोन ते तीन दिवसाचा फरक करत बुद्धिबळ ऑलम्पियाड आयोजित करण्याचे शिवधनुष्य भारताने स्वीकारले जे खरोखरीच कौतुकास्पद आहे आमचे खेळाडूच बुद्धिबळात चमकदार कामगिरी करत नाहीत तर आम्ही सुद्धा आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो झे जगाला दाखवून देण्याची सुवर्णसंधी भारताला या निमित्याने मिळाली आहे आणि भारत या संधीचा सुयोग्य वापर करणार ही काळ्या दगडावरील रेषा आहे 

पन्नासहुन कमी दिवस राहिलेल्या या स्पर्धेच्या लोगो आणि शुभांकर याचे अनावरण   चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, AICF अध्यक्ष डॉ. संजय कपूर आणि AICF सचिव आणि ऑलिम्पियाड स्पर्धेचे संचालक भरत सिंह चौहान यांच्या हस्ते नुकतेच एका छोट्याखानी स्पर्धेद्वारे करण्यात आले . 'थांबी' हा भारतातील

स्पर्धेचा लोगो 

या सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभंकर आहे थांबी या तामिळी भाषेतील शब्दाचा अर्थ आहे लहान किंवा धाकटा भाऊ '

 १९२४ साली झालेल्या पॅरिस ऑलम्पियाडच्याशेवटच्या दिवशी अर्थात  रविवार २० जुलै १९२४ रोजी बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाल्यावर या संघटनेकडून अर्थात फिडे कडून सन १९२७ साली जगातील पहिले अधिकृत बुद्धिबळ ऑलम्पियाड भरवण्यात आले त्यानंतर कधी दोन वर्ष कधी एका वर्षाच्या अवधीने फिडेकडून बुद्धिबळ ऑलम्पियाड भरवण्यास सुरवात करण्यात आली मात्र सन १९५० च्या नवव्या बुद्धिबळ ऑलम्पियाडनंतर दर दोन वर्षांनी नियमितपणे बुद्धिबळचे ओलम्पियाडचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे कडून करण्यात येत आहे या स्पर्धेत विविध अश्या सुमारे १९०  देशाचे संघ सहभागी होतात .त्यातील बुद्धिबळपटू आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर मात करत देशासाठी गुणांची कमाई करतात स्पर्धेच्या शेवटी सर्वात जास्त गुण असलेल्या देशाला सुवर्ण त्या खालोखाल गुण असणाऱ्या देशाला रौप्य तर तिसऱ्या स्थानावरील देशाला कास्य पदकाने गौरवण्यात येते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी अभिनंदनास्पद बाब म्हणजे बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या भारताच्या संघाच्या कप्तानाची जवाबदारी नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी करत आहेत .एक नाशिकर आपल्या भारताचे नेर्तृत्व करत आहे ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिनंदनाची गोष्ट नाही का ?  

     सध्याचे जग स्पर्धा परीक्षेचे आहे सध्याच्या जगात कुठेही प्रवेश कार्याचे असल्यास स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागते कोणत्याहीची स्पर्धा परीक्षेत कमीत कमी वेळात अचूक निर्णय घेण्यास त्यांत महत्व आहे बुद्धिबळाच्या खेळामुळे आपल्यातील हि क्षमता खुपं उत्तम पद्धतीने विकसित होते  त्या अर्थी बुद्धिबळ खेळास स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली असे संबोधातल्यास वावगे ठरणार नाही अश्या खेळाच्या ओलम्पियाडचे आयोजन भारतात होत आहे हि भारतीयांसाठी खरोखरीच आयुष्य अनुभवसंपन्न करणारा अनुभव आहे या निमित्याने जगभरातील खेळाडूंचा खेळ भारतीयांना बघता येणार आहे आणि बुद्धिबळ अशा खेळ आहे की जो खेळ अन्य खेळाडू कशे खेळतात हे बघून सुद्धा शिकता येतो क्रिकेट सारख्या खेळात खेळ शिकण्यासाठी प्रत्यक्ष बॅट किंवा बॉल हातात घेऊन शिकावे लागते बुद्धिबळ सारख्या खेळाला ही अडचण येत नाही आपण ज्या खेळाडूचा खेळ बघत आहोत
त्याची पुढची चाल काय असेल याचा अअंदाज बांधता येतो जर आपण योजलेली खेळी न करता दुसरी खेळी खेळाडूने केल्यासआपण ठरवलेल्या चालीत नक्की काय दोष होते आणि खेळाडूने केलेल्या चालीतील सकारात्मक बाजू कोणत्या याचा स्वयंअभ्यास केल्यास कोणत्याही महागड्या प्रशिक्षिकाशिवाय बुद्धिबळ खेळ सहजतेने शिकता येतो अन्य खेळात ही सोय नसते आणि क्रिकेटसारख्या खेळात स्वयंअभ्यास करायचा झाला तरी बॉल टाकणारा जाणीव बॅटिंग करणारा अश्या दोन व्यक्तींची गरजलागतेच बुद्धिबळ हा खेळ विविध संगणीय प्रॉग्रॅमचा वापर करत एकट्याने सुद्धा शिकता येतो अशा उत्तम खेळाच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी तामिळनाडू सरकार आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन अअर्थात एआयसीएफ कार्यरत आहे गरज आहे आपण या खेळात रुची दाखवूंन हा खेळ आत्मसात करण्याची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?