तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय

 

    राज्यातील तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय बुधवार १५ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला . महाराष्ट्र लोकसेवा अयोगकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची संख्या वयोमर्यादा संपेपर्यंत  अमर्याद करावयाचा निर्ययाचे या शिवाय अन्य दुसऱ्या शब्दात वर्णन करता येणे अशक्यच . मुळात आधीच अवास्तव असलेली वयोमर्यादा (खुल्या गटासाठी ३८ वर्षे तर विविध प्रकारची आरक्षण असल्यास त्या पेक्षा अधिक )  कमी करण्याची गरज असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात या निर्णयामुळे भविष्यात आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्यास आश्चर्य वाटायला नको आतापर्यंत एकाच स्वप्नील लोणकर महारष्ट्राने बघितला आहे मात्र या निर्णयाने भविष्यात असे कितीतरी स्वप्नील निर्माण होण्याचा धोका या निर्ययाने उत्पन्न केला आहे 
.  मुळात अत्यंत कमी जागेसाठी निघणारी भरती, मात्र  परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी अमर्याद संख्या यांचा एकत्रित परिपाक म्हणजे अत्यंत मरणाची गळेकापू स्पर्धा असे राज्यसेवेच्या परीक्षेचे स्वरूप आहे त्याला चाळिशच्या जवळपास पोहोचणाऱ्या वयोमर्यादेपर्यंत प्रयत्न करण्याची मुभा असल्याने या वर्षी नाही निदान पुढच्या वर्षी तरी आपण पोस्ट काढून अधिकारी होऊ या आशेवर अनेक जण जगतात . पोस्ट काढायची या एकाच ध्येयाने इतर पर्यायांचा फारशा सक्षमपणे विचार करत नसलेली अनेक भावी अधिकारी मी स्वतः पुण्यात बघितली आहेत अशी व्यक्ती जर वयोमर्यदा संपून देखील सेवेत निवडली गेली नाही तर चाळीशीच्या आसपास पोटासाठी काय करणार ? याचा विचार हा निर्यय घेताना का केला गेला नाही ? माहिती नाही . किमान प्रयत्नांची संख्या मर्यादित असल्याने याला काही प्रमाणात आळा लागत असे जो आता लागणार नाही,  तसेच अमर्याद प्रयत्नसंख्या आणि मोठी वयोमर्यादा असल्याने अनेक हौशे नवसे गवसे बघूया प्रयत्न करून जर झालो यशस्वी तर बल्लेबल्ले  जर झालो नाही तरी एमपीएसी करत असल्याचा  शिक्का तरी बसेल ना या भूमिकेतून या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतात . या हौशे
नवसे गवसे यांच्यामुळे परीक्षेच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येईल तो वेगळाच या ताणामुळे काही चुका झाल्या गैरप्रकार झाले निकाल वेळेत लागला नाही तर याची झळ प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या आणि सेवेत निवड होण्याची खरी पात्रात असणाऱ्या परीक्षार्थीना बसली  आणि त्यांनी या त्रासाला कंटाळून या परीक्षापक्रियेतून माघार  घेतली आणिअयोग्य व्यक्ती निवडल्या गेल्यास तर त्यास जवाबद्दार कोण ? 
   मी स्वतः या स्पर्धा परीक्षाचक्रातून गेलो आहे मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या  नागरी सेवा परीक्षेचे (आपल्या महाराष्ट्रात यूपीएससीची परीक्षा म्हणून ओळखली जाणारी परीक्षा) दोन प्रयत्न केले आहेत या   परीक्षेच्या  तयारीदरम्यान जरी परीक्षेसाठी फक्त पदवी आवश्यक असली तरी भूगोल आणि पत्रकारितेचे शिक्षण सुरूच ठेवले आज या शिक्षणामुळेच माझा चरितार्थ चालतो . मला त्यावेळी ज्याप्रमाणे शिक्षण सुरु ठेवण्याचं जो सल्ला मिळाला तशाच सल्ला या विद्यार्थंना मिळणे  आवश्यक आहेसरकारने यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे  कारण जर पदवी शिक्षण पूर्ण करून एखादा भावी अधिकारी पूर्णवेळ या क्षेत्रात आला मात्र  जर यात  अपयशी ठरल्यास तो भावी अधिकारी मानवी बॉम्ब   होईल जे महाराष्ट्राला कदापि परवडणारे नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?