जगाचे उद्याचे आशास्थान भारत

 

 सध्या
आपल्या भारतात लष्करात अल्पमुदतीची सेवा  देण्यासाठी,  केंद्र सरकारने आणलेल्या योजनेमुळे देशात वादंग उमटले असता, ना नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र धोरणाला नव्याने आकार देण्याच्या घडामोडीना  प्रचंड वेग आला आहे . या वर्षाच्या आरंभापासून सुरु असलेली आपल्या भारताला भेट देण्याची परदेशातील  विविध नेत्यांची मालिका वर्षाचा सहावा महिना सुरु झाला तरी चालूच आहे
       भारताने दक्षिण पूर्व आशियाई देशाची संघटना असलेल्या आसियान आणि भारत यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित होण्याचा घटनेला   30 वर्ष पूर्ण झाल्याच्या  स्मरणार्थ १६ आणि १७ जून रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते   ब्रुनेई , इंडोनेशिया मानयमार सिंगापूर कंबोडिया मलेशिया लाओस , थायलंड  व्हिएतनाम , फिलिपाइन्स या देशांची प्रादेशिक संघटना म्हणजे आसियान  या बैठकीसाठी या देशाचे परराष्ट्र मंत्री आणि महासचिव १६ आणि १७ जून रोजी नवी दिल्लीत उपस्थित होते यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यातील  अनेक मंत्र्यांबरोबर स्वतंत्र्य बैठका घेऊन या क्षेत्रातील भारताचा राजनीतिक वरचष्मा अधिक मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले . यावेळी उपस्थित  मंत्र्यांनी आसियान-भारत भागीदारीच्या स्थितीचा आढावा घेतला आणि आगामी दशकासाठी मार्ग निश्चित केला. चर्चांमध्ये कोविड-19 आणि आरोग्य, व्यापार आणि वाणिज्य, कनेक्टिव्हिटी - भौतिक आणि डिजिटल, शिक्षण आणि क्षमता निर्माण, तसेच इंडो-पॅसिफिकवरील आसियान
आउटलुकवर सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदनाची अंमलबजावणी या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश होता.  मंत्र्यांनी महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि साथीच्या रोगानंतरच्या आर्थिक पुनर्प्राप्तीवरही विचार विनिमय केला. सआसियानचे परराष्ट्र मंत्री आणि आशियान  सरचिटणीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील   भेट घेतली.
      गेल्या पंधरवाडयातच आपले सरंक्षण मंत्री राजनाथसिंह या प्रदेश्यातली काही देशांच्या दौऱयावर गेले असता यातील फिलिपाइन्स ,कंबोडिया व्हिएतनाम लाओस या देशांशी भारतातर्फे ब्राम्होस क्षेपणास्त्र देण्यासंबंधीचा करारा करण्यात आलेला आहे यातील कंबोडिया व्हिएतनाम या देशांशी चीनचा सीमावाविवाद आहे तर लाओस हा देश बऱ्याच अंशी चीनच्या कर्जाच्या विळख्यात सापडला आहे  चीन या क्षेत्रात आपला वरचष्मा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी चीन अनेक प्रकारे या देशांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे प्रसंगी    इतिहासातील पुराव्याचा आधार घेत लष्करी बळाचा वापर करत या प्रदेशातील देशांवर दादागिरी करतो 
       इसवीसन २००० पर्यंत जागचे राजकारण बऱ्याच प्रमाणत पश्चिम युरोप आणि अमेरिका केंद्रित होते जे आता भारत आणि पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या प्रदेश्यात स्थिरावले आहे याला जागतिक राजकारणाच्या संदर्भात या भागाला इंडो  पॅसिफिक असे म्हणतात आपण जर जगाच्या नकाश्यात यात कोणते देश येतात हे बघितल्यास या भागात येणाऱ्या बहुसंख्य देशांच्या समावेश या संघटनेत होतो अश्या प्रदेश्यातील देशांमध्ये भारताला जागतिक राजकारणात साह्य करणारे वातवरण निर्माण होणे अत्यंत चांगले आहे  ऑक्टोबर
2021 मध्ये 18 व्या आशियान -भारत शिखर परिषदेत आशियान आणि भारतीय नेत्यांनी घोषित केल्यानुसार 2022 हे वर्ष आशियान भारत  मैत्री वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे बघायला हवे
 .भारताचे या प्रदेशाशी सांस्कृतिक संबंध देखील आहेत  आग्नेय आशियातील अनेक देशात गणपती पुजला जातो व्हिएतनाम मध्ये शिवलिंग, विष्णू, दुर्गा, कार्तिकेय, गणपती त्याचप्रमाणे बुद्ध, बोधिसत्व यांच्या प्रतिमा आढळल्या आहेत. इस्लाम हा स्टेट रिलीजन  असणाऱ्या राष्ट्रातील सर्वाधीक मुसलमान असणाऱ्या  इंडीनेशियात गणपतिची मंदिरे दिसतात .इंडोनेशिया या देशातील नोटेवर गणपती दिसतो त्यांच्या विमानसेवेचे नाव देखील गरुडा आहे  थायलंडआणि कंबोडीया हे सध्या बौध्द धर्मीय बहूसंख्य असणारे दोन देश एकमेकांशी हिंदू मंदिरावरून भांडतात .हे सांस्कृतिक संबंध घट्ट राजनीतिक संबंधात परिवर्तित करण्याच्या मार्गातील हि महत्त्वाची घडामोड म्हणूनच बघावी लागेल एका माहितीनूसार भारताला स्थापनेच्या वेळी आशियान  संघटनेचे सदस्यत्व देण्यात येणार होते माञ तत्तकालीन सरकारने नामचा आधार घेत या यूनाटेड स्टेट ऑफ अमेरीकेच्या या कळपात येण्याचे नाकारलेपुढे नरसिंहराव यांच्या काळात या देशाशी संपर्क वाढवण्यासाठी लुक ईस्ट पॉलीसी राबवण्यात आली .त्याचीच पुढची पायरी म्हणून या घटनेकडे बघता येईल जे महासत्तापदाकडे झेपावणाऱ्या भारतासाठी अत्यंत आवश्यकच आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?