आपल्या एसटीची ही वाटचाल कोणत्या दिशेने ?

     

आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधीक काळ चाललेला आणि आपल्या भारताचा विचार करता कोणत्याही सार्वजनिक उपक्रमातील सर्वात चर्चित असा दुसरा संप (पहिला क्रमांक रेल्वेच्या ऐतिहासिक संपाला) म्हणून एसटीचा संप ओळखला जातो. आपल्या एसटी  कर्मचाऱ्यांंचा संपानंतर एसटीचा  गाडा पुर्वपदावर येत असताना , एसटी कर्मचाऱ्यांंनी त्यांचा साडेपाच महिन्याचा संपादरम्यान व्यक्त केलेली भिती प्रत्यक्षात तर येणार नाही ना ? असी घटना घडलेली आहे.
     या संपादरम्यान एसटीचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे वारंवार बोलले गेले. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या एका निविदेमुळे ही शक्यछा प्रत्यक्षात येण्याची निर्माण झाली आहे. सांगली विभागामार्फत प्रकाशित निविदेत सांगली विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध आगारांसठी कंत्राटदरांकडून साध्या गाड्यांसाठी हो साध्या गाड्यांसाठी प्रस्ताव मागितले आहेत. शिवनेरी आणि शिवशाही प्रकारच्या गाड्या खासगी कंत्राटदाराकडून चालवल्या गेल्यानंतर आता सर्व सामान्यांची लालपरी सुद्धा आता खासगी कंत्राटदारांचा हातात दिली जात आहे. महाराष्ट्र एसटीमधील हा पहिलाच प्रयोग आहे. या खासगी गाड्यांसाठी डायव्हर
कंत्राटदाराचा तर कंडक्टर एसटीचा असणार आहे.यामुळे सांगली विभागातील सुमारे १५० डायव्हरांच्या नोकरीवर गंडातर येण्याबरोबरच  विभागाच्या विविध आगरांमध्ये असणाऱ्या कार्यशाळेबरोबर विभागीय कार्यशाळेचे काम देखील कमी होण्यचा धोका उत्पन होईल असे सांगितले जात आहे. येत्या एका महिन्यात याबाबत प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्यात येवून तांत्रिक बाबींसाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागेल.त्यानंतर या बसेस रस्त्यावर धावायला सुरवात करतील असा अंदाज आहे.
      या बसेस नेहमीच्या लालपरीपेक्षा एक मीटरने जास्त लांब असतील आपल्या लालपरी ११मीटर लांब असतात तर या खासगी लालपरी १२ मीटरच्या असतील.त्यांची वेगळी रंगसंगती असेल.या लालपरीमध्ये पुशबँक सिट तसेच मोठा लेग स्पेस असेल. यामध्ये नेहमीच्या लालपरीपेक्षा अधिक जागा वावरण्यासाठी असेल.ज्यामुळे प्रशास आरामदायी होईल असे सांगण्यात येत आहे.
       या बसेसमुळे एसटीचा बसेस दुरूस्तीवरचा खर्च कमी होवून एसटीचा तोटा कमी होईल असे कारण प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या आधी  खासगी कंत्राटदाराकडून चालवण्यात येणाऱ्या शिवशाहीबाबत प्रवाश्यांचा असंख्य तक्रारी आहेत.या बसेसचे डायव्हर गाडी विचित्र पद्दतीने चालवतात परीणामी त्यांचे अपघात
मोठ्या प्रमाणात होतात. एसटीच्या डायव्हरांच्या तूलनेत त्यांना बससारखे अवजड वाहन चालवण्याचा पुरेसा अनुभव नसतो.या बसेसची दुरुस्ती आणि निगा देखील राखली जात नाही. अस्या प्रवाश्यांचा तक्रारी आहेत ( एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसवर डायव्हर बाजूच्या टेल लँम्पचा बाजूला आणि  बाजूला डायव्हरच्या डाव्या बाजूच्या हेडलाइटच्या बाजूला डेपोचे नाव चौकोनात आणि विभागाचे गोलात लिहले असते.ज्यावर हे  नसते तसेच ज्या गाडीचे पासिंग पुणे रत्नागिरी ,औरंगाबाद आणि नागपूर सोडून इतर असते ती खासगी शिवशाही असते.) या खासगी शिवशाहीमुळे सुरक्षीत प्रवाश्याबाबतची एसटीची प्रतिमा काहीसी काळवंडली. तोच अनुभव  या साध्या बसेसबाबत प्रवाश्यांना आल्यास आपल्या एसटीच्या प्रतीमेस मोठे नुकसान होइल .अनेक एसटीप्रेम हे त्यांचा सोशल मिडीया अकाउंटवर खासगी शिवशाहीबाबत बोटे मोडत असतात जर साध्या गाड्याबाबतही ते हेच करायला लागले तर होणारे नुकसान एसटीला परवडणारे नाही. ते न होता एसटीचा हा प्रयोग यशस्वी ठरो आणि ग्रामीण महाराष्ट्राची ही जिवन वाहिनी नुकतीच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या
एसटीने असीच घोडदौड सुरु ठेवावी, कारण यातच महाराष्ट्राचे हित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?