नव्या जगाचे शक्तीशाली इंजिन भारत


   सध्या आपल्या महाराष्ट्रात राजनैतिक संकटामुळे अभुतपुर्व अस्थिरता निर्माण झाली असताना, भारत देश आगामी काळात जगाच्या राजकारणाचे शक्तीशाली इंजिन म्हणून आपला दावा अधिकाधीक मजबुत करत आहे. सध्या आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रंवाडा या देशात गेले आहेत. तिथे ते काँमनवेल्थ हेड आँफ गव्हरमेट मिटींग (जी चोगम नावाने प्रसिद्ध आहे) मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधीत्व करतील.  चोगम आँफलाईन पद्धतीने होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या ब्रिक्स परीषदेच्या 14 व्या अधिवेशात आँनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवत आहेत.. या दोन्ही ठिकाणी भारताने परस्पर सहकार्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकास साधत कोव्हिड19च्या साथीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचा मुद्दा हिरीहिरीने मांडला आहे. ज्याचे स्वागत करण्यात आले आहे.
   एकेकाळी ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुर्वीच्या वसाहतवादाचे शिकार झालेल्या देशांसह युगांडा आणि रवांडा हे दोन ब्रिटीश साम्राज्याचे भाग नसणाऱ्या देशांची 1932साली स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे काँमनवेल्थ .या संघटनेतील दोन देशांच्या अपवाद वगळता सर्व भुभागावर कधीना कधी ब्रिटीशांचे शासन होते.ज्या देशांवर ब्रिटिश शासन नव्हते, तर जर्मनीचे शासन होते.मात्र वैयक्तिक प्रगतीसाठी आणि फ्रान्सला उणेपणा आणण्यासाठी जे देश काँमनवेल्थचे सदस्य आहेत ते म्हणजे रवांडा आणि युगांडा . त्यातील रवांडा देशातर्फे स्वतःची प्रगती आणि आम्ही वांशिक हत्याकांडाचा लाच्छनास्पद इतिहासातून  पुर्णपणे बाहेर पडलो आहोत, हे जगाला
दाखवण्यासाठी चोगमचे आयोजन करण्यात आले आहे. काँमनवेल्थचे सदस्य असलेल्या  देशाच्या सरकारच्या प्रमुखांचे अधिवेशन दर दोन वर्षांनी होते .त्यास चोगम या संक्षीप्त नावाने ओळखले जाते. या ठिकाणी आपण सरकारचे प्रमुख आणि देशाचे प्रमुख हे पुर्णतः वेगवेगळे आहेत ,हे समजायला हवे.भारतासाठी देशाचे प्रमुख राष्टपती आहेत. तर सरकारचे प्रमुख पंतप्रधान आहेत. भारतासारखी संसदीय लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये याच प्रकारची शासनव्यवसा असते मात्र अमेरीकेसारख्या अध्यक्षीय लोकशाही व्यवस्थेत तेथील अध्यक्षच देशाचे आणि सरकारचे प्रमुख असतात असो.
आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या उद्धाटनपर प्राथमिक संबोधनात, काँमनवेल्थ देशांना परस्पर सहकार्याने स्वतःच्या आर्थिक विकास साधण्याची संधी असल्याचे, तसेच परस्पर देशात सध्या आहे त्या पेक्षा अधिक दळणवळण झाले पाहिजे. एकमेकांना विविध प्रकारे तंत्रज्ञान साह्य केले पाहिजे. सध्याचा कोव्हिड,19च्या साथीनंतरच्या काळात याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.भारत कँमनवेल्थ देशांना सर्वतोपरी साह्य करायला तयार आहे आदी मुद्दे मांडले. 
   एकिकडे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भारत जगाला काय देवू शकतो हे काँमनवेल्थ हेड आँफ गव्हरमेंट मिटींग(चोगम)मध्ये सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परीषदेत भारताची बाजू जगासमोर मांडत होते.सन 2001साली मुळात ब्राझील, रशिया इंडीया चीन या देशांच्या  आद्यक्षरांवरुन स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे ब्रिक.ज्यामध्ये कालांतराने दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात येवुन संघटनेचे नामकरण ब्रिक्स करण्यात आले. या संघटनेचे मुळातील 14 वे आणि आँनलाईन पद्धतीचा विचार करता तिसरे अधिवेशन सध्या चीनच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. जगातील एकुण लोकसंख्येचा विचार करता 41% लोकसंख्या, एकुण जागतिक व्यापाराच्या 16% जिगतिख जिडीपीच्या 24% सहभाग असणाऱ्या जगातील 5 देशांची संघटना म्हणजे ब्रिक्स होय. या संघटनेचे आकडे छान वाटत असले तरी त्यात चीनचा वाटा मोठा आहे. ब्रिक्सच्या एकुण जिडीपित चीनच्या वाटा
70%आहे. चीनवगळता अन्य देशांचा एकमेकांशी फारसा व्यापार नाही.(ब्राझील बरोबर आपला कोणता व्यापार चालतो.?) एका अर्थाने चीनच्या प्रभावाखाली असणारी मात्र भारताचे देखील महत्तवाचे स्थान असणारी संघटना म्हणजे ब्रिक्स होय .संघटना स्थापनेच्या वेळी परस्पर सहकार्याने आर्थिक विकास या उदिष्ठासाठी स्थापन झालेली मात्र सध्याचा काळात उदिष्ठांपासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात भरकटलेली संघटना म्हणजे ब्रिक्स .सध्या या संघटनेतील देशांच्या अर्थव्यवस्थेचा आकार ,त्यांची औद्योगिक आणि अन्य क्षेत्रातील प्रगती बघता या संघटनेतील सहभागी देशातील भिन्नता सहजतेने लक्षात देखील येते ब्राझील या संघटनेतील सर्वात दुबळा देश समजला जातो असो  
तर अस्या ब्रिक्स या संघटनेच्या 14 व्या अधिवेशाप्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी संघटनेच्या देशांमध्ये विविध प्रकारचे सहकार्य वाढवण्याची गरज बोलून दाखवली.ब्रिक्सच्या अनेक उपक्रमांनी तीची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यात अधिक चांगली वाढ परस्पर सहकार्य वाढल्यास होईल.तसेच सध्या सुरु असणाऱ्या ऊपक्रमांसह नविन उपक्रम सुरु करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांनी अन्य सहभागी देशांच्या प्रमुखांनी आपल्या भाषणात राजकीय भाष्य केले असून देखील  राजकीय भाष्य करण्याचे टाळले .त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात जागतिक योग दिनानिमित्त. त्यांचा त्यांचा देशात झालेल्या कार्यक्रमासाठी त्यांचे अभिनंदन केले.ब्राझीलच्या अध्यक्षांनी देखील आपल्या भाषणात काही प्रमाणात मोदी यांचेच मुद्दे गुंफले.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का लावल्याचा प्रयत्न चीन खपवून घेणार नाही. अमेरीकेची दादागिरी आम्ही चालवून घेणार नाही हा मुद्दा मांडला त्यांनी उघडपणे तैवान (चायनीझ.तैपई) चा उल्लेख टाळला
असला तरी त्यांचा रोख तोच होता हे उघड आहे. रशियाने यूक्रेनवर हल्ला केल्यानंतरचा काळातील रशियाचे मुक्तपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरण्याचे हे पहिलेच व्यासपीठ होते.त्याचा रशियाचे राष्टाध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांनी वापर करत युरोपीय राष्ट्रांकडून रशियावर लादण्यात आलेल्या बंधनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.एकंदरीत भारताखेरीच अन्य सर्व देशांनी त्याचीच धूणी धूतली.मात्र जगाचा समुहाच्या कल्याणाचा विचार केला तो भारताने.ज्याची भारताला बऱ्याच काळापासून सवय आहे.
या दोन्ही अधिवेशनातून भारत उद्याच्या जगाचे शक्तीशाली इंजिन म्हणून उदयास येत असल्याचेच दिसून येत आहे

सदर ब्लॉग पोस्ट 1001(एक हजार एक) वी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?