एमपीएससीतील परीक्षार्थीना अंधारात ठेवून केलेलं बदल

     

सध्या महराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्याकडे महाराष्ट्रातील जनता डोळे लावून बसली असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  परीक्षार्थीना अंधारात ठेवून मोठा बदल केला आहे एमपीएससी या नावाने प्रचलित असणाऱ्या या आपल्या राज्यघटनेत  स्वतंत्रपणे उल्लेख  असलेल्या  या आयोगामार्फत राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी अनेक परीक्षांचे आयोजन करण्यात येते या आयोगामार्फत पोलीस खात्यातर्गत  लागणारे कर्मचारी तसेच  प्रशासनात लागणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर अभियांत्रीकी सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांची शासनव्यवस्थेत नेमून करण्यासाठी परीक्षा घेण्यात येत असल्या तरी राज्यशासनाच्या प्रशासनात उप जिल्हाधिकारी पर्यतच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या  तसेच पोलीस खात्यातर्गत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींची अधिक पसंती असते 
   या सर्वात जास्त पसंती असलेल्या परीक्षांचे तीन टप्पे असतातपूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलखात हेच ते  तीन टप्पे यातील मुख्य परीक्षा या टप्यात खूपच मोठ्या प्रमाणात बदल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आले आहेत आतापर्यंत बहुपर्यायी असणारी ही परीक्षाप्रणाली आता लेखी दीर्घोत्तरी करत असल्याचे आयोगामार्गत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे . ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी हे बदल लागू असतील असेही  अयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे  या परीक्षेची तयारी उमेदवार दोन ते तीन वर्षांपासून करत असतात या परीक्षेची परीक्षा पद्धत पहिले पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा अशी असली तरी परीक्षेची
काठिण्य पातळी आणि परीक्षेला असणारा अभ्यासक्रम याचा विचार करता  उमेदवारांकडून पहिल्यांदा मुख्य परीक्षेची तयारी केली जाते त्यानंतर पूर्व परीक्षेची तयारी केली जाते आता  पर्यंत उमेदवारांनी बहुपर्यायी पद्धतीने मुख्य परीक्षेची तयारी केली आहे  त्यामुळे  जेमतेम तीन ते चार महिने आधी जाहीर करून हे बदल अमलात आणणे हाये या उमेदवारणाची क्रूर चेष्टा करण्यासारखेच आहे जिथे फारसे औद्यगिकीकरण झालेले नाही असा प्रदेश महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे तेथील तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बघत असतो त्यासाठी प्रसांगी पोटाला चिमटे काढत पडेल ती कामे कष्ट करत पुण्यासारख्या शहरात राहत असतो याया युवकांचे पालक मोठ्या आशेने स्वतः उपाशी राहून त्यांना गावातून पॆसे पाठवत असतात आपला मुलगा मुलगी अधिकरी होईल आणि या नरकातून सुटेल अशी भाबडी अशा त्यांना असते आता अत्यंत आयत्या  वेळी आयोगाने हे बदल केल्याने या परीक्षार्थींच्या आनंदावर काहीसे विरजण पडणार आहे 
मुळात सुरवातीला ही परीक्षा लेखी स्वरूपातच होतो मात्र आयोगाकडे परीक्षार्थींचे पेपर तपासायला पुरेसे पेपर चेकर नाहीत.  ज्यामुळे मुख्य परीक्षेचा निकाल येण्यास प्रचंड वेळ लागतो ज्यामुळे परीक्षार्थींच्या मनात प्रचंड भीती उत्पन होते असे कारण  देण्यात येत असे   आयोगाकडून मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाच्या ऐवजी बहू पर्यायी करण्यात आली जेव्हा हि परीक्षा बहुपर्यायी करण्यात आली त्यावेळेस या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या
तुलनेत सध्या हि संख्या प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल कितीही कडक लावला तरी मुख्य परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या पूर्वी मुख्य परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या उमेद्वारांपेक्षा जास्तच असणार हे ओघाने आलेच . जर पूर्वी पुरेसे पेपर चेकर नसल्याने लेखी परीक्षा बहुपर्यायी करण्यात आली तर आता हि यंत्रणा पुरेश्या ताकदीने चालेल का ? की पूर्वीसारखेच एखादे संकट पुन्हा येईल याबाबत शंका घेण्यास पुरेसा वाव आहे 
सध्या आपल्या महाराष्ट्रातील डीडी सह्याद्री सारखी मोजक्या वृत्तवाहिन्या सोडल्या  तर अन्य सर्व वृत्तवाहिन्या  राजकीय घडोमोडींचे वार्तांकन करण्यात मग्न आहेत त्यामुळे या विषयावरून महाराष्ट्रात आगडोंब उसळला नहिये नाहीतर उत्तर भारतात ज्याप्रमाणे अग्निवीर या योजनेवरून तरुणाचा रोष व्यक्त झाला त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रतात झाली असती मात्र जेव्हा महाराष्ट्रतील हे राजकीय संकट शांत होईल आणि माध्यमे या विषयी माहिती देतील तेव्हा महाराष्ट्र त्यास किती शांतपणे प्रतिसाद देतो हे बघावे लागेल तेव्हा महाराष्ट्रात अग्निवीर सारखा असंतोष उफाळून न येण्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो कारण महाराष्ट्र सघांत राहण्यातच महाराष्ट्रातील जनतेचे हित आहे 


ही माझी एक हजार तीन वी ब्लॉगपोस्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?