सोन्याच्या दरात बदल होणार ?

   

 सोने हा भारतीयांचासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. लग्नसराईत दागिने करण्यासाठी किंवा गुंतवणूकीचा सुरक्षीत पर्याय म्हणून भारतीय समाज सोन्याकडे मोठ्या आशेने बघतो.  जगात वैयक्तिक आणि मध्यवर्ती बँकेकडील एकत्रित सोन्याचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे सोने भारताने खरेदी केले आहे. जगभरात देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्याकडील गंजाजळीच्या सुरक्षीतेसाठी काही प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात. वैयक्तिकरीत्या सोने जगभरात काहीसे कमी खरेदी करण्यात येते. मात्र जगात असणाऱ्या या नियमाला भारतीय अपवाद आहेत. जगात सर्वात जास्त वैयक्तिक सोने भारतीयांनी खरेदी केले आहे. तर भारतीयांसाठी अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या  सोन्याच्या दरात आगामी नजिकच्या भविष्यकाळात बदल होण्याची दाट शक्यता आहे, आणि याला कारणीभूत आहे, जी7 परीषदेच्या 48व्या अधिवेशात घेण्यात आलेला निर्णय .
आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात शक्तीशाली असणाऱ्या देशांचा समुह म्हणजे जी7. या जी7 संघटनेतील देशांचे 48वे अधिवेशन 26 ते 28 जूनदरम्यान जर्मनीत झाले.या अधिवेशनामध्ये रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा हेतूने, रशियावर सध्या आहेत, त्यापेक्षा कडक बंधने लादण्याचा, निर्णय घेण्यात आला. बंधने अधिक कडक केल्यामुळे
सोन्याचा भावात बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे.रशिया ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे सोने आहे (पहिल्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक इंधने) .सोन्याचा निर्यातीत जगात चौथ्या क्रमांकावरील देश म्हणजे रशिया. आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात ताकदवान सात देशांनी रशियावर घातलेल्या, बंधनाचा परीणाम समस्त जगावर होणार, हे सुर्यप्रकाश्याइतके स्वच्छ आहे. ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होतो.
सोन्याचा दरात होणारे हे बदल दोन प्रकारे होवू शकतात.पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक इंधनाचा पुरवठा रशिया, जागतिक बंधनाचा विचार न करता ,त्याचा भारतासारख्या मित्रांना ज्या प्रकारे जागतिक दरापेक्षा कमी करतो .त्याप्रमाणे रशिया याही वेळेस जागतिक दरापेक्षा कमी दराने सोने त्याचा मित्रांना देवू शकतो. असे झाल्यास आपणास सोने कमी दरात मिळाल्याने सोन्याचे भाव कमी होवू शकतात.दुसरा प्रकार म्हणजे विविध बंधनामुळे रशिया सोन्याची निर्यातच करु न शकणे.रशिया त्यांचा सोन्याची निर्यात जगात एका विशिष्ट मार्गाने करतो.हा मार्ग ज्या प्रदेशातून जातो त्या प्रदेशावर  युनाटेड किंग्डम (इंग्लड) हा देश बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतो.युनाटेड किंग्डम हा देश जी7चा सदस्य देश आहे. परीणामी तेथून होणाऱ्या रशियाच्या सोने निर्यातीवर बंधने येणार हे निश्चित .परीणामी रशियाला आपल्या सोन्याची निर्यात करण्यासाठी दुसरा मार्ग निवडावा लागणार.या उपद्रावामुळे रशियाची सोन्याची निर्यात कमी होवून मागणी आणि पुरवठा या सुत्रानुसार सोन्याचे भाव वाढू शकतात.
जी7 देशांचे अधिवेशन नुकतेच झाले आहे. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयाची पुर्णतः अमंलबजावणी सध्या सुरु झाली नाही. परीणामी जी7 देशांनी रशियावर वाढवलेल्या आर्थिक बंधनांमुळे सोन्याचा दरात काय परीणाम होईल? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र वर्तमान सोन्याचा दरात बदल होणार हे मात्र 100% खरे आहे. पहिल्या प्रकारातील बदल भारतीयांंसाठी थोडे अधिक सुखावणारे असतील.सध्याचा शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे
सामान्य गुंतवणूकदारांचा ओघ सोन्यात गुंतवणूक करण्याचा आहे. तो वाढेल. सोन्याची खरेदी वाढल्याने जिएसटी संकलन सुद्धा काही प्रमाणात वाढेल. बाजारपेठेत काहीसे चैतन्य निर्माण होइल. मात्र भारताचे परकीय चलन ज्या गोष्टींंसाठी अधिक प्रमाणात खर्च होते,अस्या गोष्टींचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोन्याची आयात वाढल्याने सध्या होत आहे त्यापेक्षा अधिक परकीय चलन खर्च होईल परीणामी काही जणांना भारताची श्रीलंका होण्याची स्वप्ने पडू लागतील.मात्र भारताचा परकिय चलनसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने भारताची स्थिती  श्रीलंकेसारखी होण्याची शक्यता नाही.दुसऱ्या प्रकारातील स्थिती उदभवल्यास सोन्याचे भाव वाढल्याने सोने खरेदी कमी होईल. परीणामी अधिक सोने खरेदी करण्याचा उलट स्थिती निर्माण होइल.यातील कोणती स्थिती निर्माण होईल? त्यावर भारतीय समाज कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतो? हे भविष्यात स्पष्ट होईलच. तूर्तास रशिया सोन्याची निर्यात कोणत्या प्रकारे किती प्रमाणात करतो,? यावरच आपल्याकडे कोणती स्थिती होणार ,हे स्पष्ट होत असल्याने आपण याकडे लक्ष देयला हवे.

ही माझी एक हजार पाचवी ब्लॉगपोस्ट आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?