भारतात हे पण घडतंय


  सध्या आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींकडे असले नवनियुक्त एकनाथ शिंदे यांचे सरकार कोणत्या प्रकारे कामकाज करते . माजी मुख्यमंत्री नि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या नव्या सरकारशी कोणत्या प्रकारे संबंध ठेवतात .? या कडे असले तरी देशाच्या परराष्ट्र धोरणा संदर्भात अनेक घडामोडी सध्या घडत आहे एक जागरूक नागरिक या न्यायाने आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या घडामोडी 
     भारत आणि मेक्सिको यांच्यातील परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची सहावी फेरी 29 जून 2022 रोजी मेक्सिको सिटी येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका या देशाच्या दक्षिण दिशेला सीमा शेअर करणारा, स्पेन या देशाचे पूर्वी राज्य असणारा लॅटिन अमेरिका प्रदेशला अमेरिका या देशाबरोबर जोडणारा सेतू जो अनेकदा लॅटिन अमेरिका प्रदेशातून अमेरिका देशात येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्याच्या संख्येमुळे चर्चेत येणारा देश मेक्सिको होय . पृथ्वीगोलाचा विचार करता आल्या भारताच्या पूर्णतः नाही पण  बऱ्याच अंशी विरुद्ध दिशेला असणारा देश म्हणजे मेक्सिको 
या मेस्किको देशाबरोबर झालेली चर्चा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे . भारत आणि मेक्सिको या दरम्यान झालेल्या या बैठकीत भारताच्या बाजूने चर्चेचे नेतृत्व पराष्ट्र खात्याच्या पूर्व विभागाचे सचिव  सौरभ कुमार,  यांनी तर मेस्किको च्या पराष्ट्र मंत्रालयाचे आपल्या राज्यमंत्री समकक्ष   एच.ई. सुश्री कार्मेन मोरेनो टोस्कानो, यांनी केले
यावेळी राजकीय, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि फार्मास्युटिकल्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह अवकाश, संस्कृती आणि पर्यटन, शिक्षण, कॉन्सुलर आणि परस्पर हितसंबंधांच्या इतर क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. संयुक्त राष्ट्र, पॅसिफिक अलायन्स आणि भारताच्या आगामी G20 अध्यक्षपदासह बहुपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.
 या भेटीदरम्यान ISRO आणि मेक्सिकन स्पेस एजन्सी (AEM) यांच्यात पीक निरीक्षण, दुष्काळाचे मूल्यांकन आणि क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या बाह्य अवकाशातील सहकार्यावर विशिष्ट सहकार्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही बाजूंनी उच्चस्तरीय राजकीय देवाणघेवाण आणि संयुक्त संस्थात्मक यंत्रणेच्या नियमित बैठका जसे की कॉन्सुलर संवाद, व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य (BHLG) वरील द्विपक्षीय उच्च-स्तरीय गट (BHLG) आणि संयुक्‍त आयोगाच्या बैठका सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली. . दोन्ही बाजूंनी सल्ल्याची पुढील फेरी नवी दिल्ली येथे परस्पर सोयीस्कर तारखेला आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले 
या खेरीज चौथ्या भारत-जपान सायबर संवादाचे आयोजन भारतातर्फे  ३० जून २०२२ रोजी करण्यात आले होते  भारत जगात फक्त चार देशांबरोबर २ अधिक दोन या प्रकारची चर्चा करतो या चार देशांपैकी एक जपान आहेत जपानच्या सहकार्याने भारतात अनेक विकास प्रक्लप सुरु आहेत . जी ४ , क्याड सारख्या अनेक जगातील व्यासपीठात जपान हा भारताचा महत्त्वाचा साथीदार आहे या सहकार्याच्या एक टप्पा ,म्हणून हि बैठक आयोजित करण्यात आली होती . 
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पररराष्ट्र मंत्रालयाच्या सायबर सेल डिप्लोमसी विभागाच्या सहसचिव  डॉ. मुआनपुई सैयावी, यांनी तर  तर जपानी शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयच्या सायबर धोरणाचे प्रभारी राजदूत युताका अरिमा यांनी केले.भारतीय शिष्टमंडळात  गृह मंत्रालय , संरक्षण मंत्रालय  राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय , दूरसंचार विभाग  यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.  इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम  आणि नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटरयांनी देखील भारतातर्फे सहभाग नोंदवला तर  जपानी शिष्टमंडळात नॅशनल सेंटर ऑफ इन्सिडेंट रेडिनेस अँड स्ट्रॅटेजी फॉर सायबर सिक्युरिटी अंतर्गत व्यवहार आणि दळणवळण मंत्रालय (MIC), संरक्षण मंत्रालय, अर्थव्यवस्था, व्यापार
आणि उद्योग मंत्रालयआणि  मधील परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सायबर सहकार्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा केली आणि 5G तंत्रज्ञानासह सायबर सुरक्षा आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICTs) या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय आणि प्रादेशिक मंचावर सायबर सल्लामसलत दरम्यान दोन्ही बाजूंनी सायबर डोमेनमधील नवीनतम घडामोडी आणि परस्पर सहकार्यावर विचार विनिमय केले.
दोन्ही बाजूंनी परस्पर सोयीनुसार 2023 मध्ये पुढील भारत-जपान सायबर संवाद आयोजित करण्यास सहमती दर्शवली
एकंदरीत भारत आगामी काळात जागचे एक कणखर नेर्तृत्व म्हणून समोर येत आहे हेच खरे 

हि माझी एक हजार सातवी  ब्लॉगपोस्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?