जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठयावर

       
आपल्याकडे अनेक नाट्यमय वाटाव्या अश्या राजकीय घडामोडी घडत असताना जगात देखील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत होत्या ज्यामुळे जग तिसऱ्या  महायुद्धाच्या  उंबरठयावर तर नाहीना ?  अशी भीती उत्पन्न झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर १९९० पर्यंत सुरु असलेल्या शीतयुद्धाचा दुसरा अंक सुरु झाल्याचे गेल्या काही दिवसातील घडामोडी बघून लक्षात येते  शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेचा फक्त एकच शत्रू होता युनाटेड सेव्हिंयत सोशालिस्ट रशिया , या शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकात मात्र अमिरिकेचा रशिया बरोबर अजून एक शत्रूं असणार आहे तो म्हणजे चीन . २९ जून आणि ३० जून रोजी स्पेन या देशाची राजधानी असलेल्या मॅड्रिड शहारत  झालेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशन अर्थात नाटो या नावाने सुपरिचित असलेल्या लष्करी गटाची झालेल्या  बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नाटो आता रशिया बरोबर चीन विरोधात देखील आघाडी उभारणार आहे हिंद प्रशांत क्षेत्रात रशिया आणि चीन करत असलेल्या आर्थिक आणि लष्करी दडपशाहीमुळे नाटोला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले  नाटोने युरोपातील सैनिकांची संख्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा निर्णयही या बैठकीत जाहीर केला. अमेरिकेनेही युरोपातील सैनिक संख्या व नौदलाची उपस्थिती वाढविण्याची घोषणा केली आहे. आपल्या   पाचव्या आर्मी कोअरचे मुख्यालय पोलंडमध्ये हलविण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे  तेथे तीन हजार सैनिक असतील अशी अमेरिकेने जाहीर केले आहे. रुमानियात दोन हजार सैनिक आणि ब्रिटनमध्ये ‘एफ-३५या लढाऊ विमानांच्या दोन अतिरिक्त स्क्वॅड्रन्स तैनात करण्याचे ठरविले आहे
       .या बैठकीला सध्या नाटोचे सदस्य नसलेल्या तसेच चीनबरोबर तणावाचे संबंध असलेल्या आणि चीनच्या जवळ असणाऱ्या दक्षिण कोरिया जपान या देशांसह ऑस्ट्रेलिया , न्यूझीलंड या देशांना देखील बैठकीला आमंत्रित केले होते  युरोपातील फिनलंड व स्वीडन या देशांना नाटोचे सदस्यत्व देण्यास असलेली हरकत तुर्कीये (पूर्वीचे नाव तुर्की ) ने  मागे घेतली आहे, त्यामुळे रशियाचे निकट शेजारी असलेले हे देश लवकरच नाटोचे सदस्य  होण्याची
दाट शक्यता आहे . रशियाने हे देश नाटोत गेले तर त्यांच्याविरुद्ध कारवाइ करण्याचा इशारा दिला आहे. तुर्कस्तानच्या विरोधात कार्य करणाऱ्या फुटीरतावादी गाताना स्वीडन आणि फिनलंड हे देश राजकीय आश्रय देतात असे कारण देत तुर्कीये (पूर्वीचे नाव तुर्की )ने नाटो या संघटनेत या दोन देशांच्या समावेशाला विरोध केला होता .
   मात्र या दोन देशांनी फुटीरतावादी गटांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तुर्कीयेने आपला विरोधाचा सूर काहीसा सौम्य केला आहे  प्रामुख्याने पश्चिम युरोपातील देश असलेल्या नाटोच्या बैठकीसाठी जपान दक्षिण कोरिया न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना बोलवाल्याने नाटोमध्ये ते अधिक सक्रिय होऊ शकतात आपल्या शेजारील देश अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या लष्करी गटात संविषे होणे चीन कदापि सहन करणार नाही हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे काही दिवसापूर्वीच झालेल्या ब्रिक्स या संघटनेच्या १४ व्य  बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उदघाटनपर केलेल्या भाषणामध्ये चीनचा अमेरिकेच्या विरोधातील सूर पूर्णतः दिसलाच होता सदर लेख लिहण्यापर्यंत चीनकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही मात्र ती तिखटच असणार हे जगजाहीर आहे
        दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर सुरु झालेल्या शीतयुद्धाच्या वेळी युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाच्या प्रभावाखालील सितो या संघटनेला प्रत्युत्ततर म्हणून अमेरिकेच्या प्रभावाखाली लष्करी संघटना म्हणजे नाटो होय १९९० साली युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विघटन झाल्यावर सीओचे विर्सजन करण्यात आले अमेरिकेचा प्रमुख शत्रू नष्ट झाल्याने अमेरिकेने देखील नाटोचे विसर्जन करावे यासाठी जागतिक स्तरावर अमेरिकेवर दबाव  करण्यात आला मात्र त्यास भीक न घालता अमेरिकेने नाटोचे विसर्जन केलेले नाही . ज्यामुळे नाटोचे अस्तित्वतसेच
राहिले ज्याचे प्रत्यंतर आता दिसत आहे
        भारताचा प्रमुख शत्रू चीन आहे नाटोचे सध्याचे विस्तारित लक्ष्य देखील चीन आहे . नाटोने  जूनच्या अखेरीस आयोजित केलेल्या बैठकीत निमंत्रित म्हणून बोलावलेल्या जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दक्षिण कोरिया या देशांपैकी जपान आणि ऑस्ट्रेलिया , हे देश अमेरिकाप्रणित चीनविरोधी क्याड गटाचे सदस्य सदस्य आहेत या क्याड गटाचा सदस्य भारत देखील आहे त्या पार्श्वभूमीवर भारताने या घडामोडीकडे बघायला हवे . भविष्यात भारत देखील या संघटनेत मोठी भूमिका पार पडू शकतो . सध्याचे भारताचे परराष्ट्र धोरण नेहरू युगाच्या अलिप्तवादी धोरणापासून खूप वेगळे होत काहीसे आक्रमक झाले आहे मात्र भारत चीनचाआणि स्वतःच्या मित्र असलेल्या रशियाला दुखावून चीनविरोधी गटात किती सहभागी होतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल .
   

हि माझी एक हजार आठवी   ब्लॉगपोस्ट आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?