राजकीय साठेमारीत हरवलेले बुद्धिबळातील यश

       


गेल्या महिनाभरातील  भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर फार मोठे यश मिळवले मात्र त्याची यथोचित दखल राजकीय बातम्या देण्यात मग्न असलेल्या माध्यमांनी घेतली नाही . मराठीतील एक उकृष्ट चित्रपट झेंडा या चित्रपटात  ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सुरवातीला कार्यालयाच्या प्रसंगात आर्थिक बातम्यांना राजकीय बातम्यांच्या तुलनेत कमी महत्व देण्यात येते याबाबत खंत व्यक्त करण्यात आली होती तोच काहीसा प्रकार या बुद्धिबळपटूनबाबत घडला मात्र "देर आये मगर दुरुस्त आये " , या म्हणीनुसार उशिरा का होईना त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन
  बुद्धिबळ स्पर्धा या तीन प्रकारात खेळवण्यात येतात .पारंपरिक प्रकार म्हणजे क्लासिकल ,या प्रकारच्या खेळ हा तीन तास किंवा अधिक चालू शकतो जरी हा खेळ खूप वेळ सुरु असला किती वेळात किती चाली झाल्याचं पाहिजे याचे बंधन आहे जर हे बंधन पाळले न गेल्यास पटावरील स्थिती कितीही विजयासारखी असो खेळाडू डाव हरतो  हा
प्रकार काहीसा संथ असल्याने खेळात रंगत आणण्यासाठी या पेक्षा जलद प्रकार खेवण्यात येतो या प्रकारात खेळ संपवण्यासाठी खेळाडूंवर २० ते २५ मिनिटाचे बंधन घालण्यात येते त्यास रॅपिड म्हनतात ळाडूंची वेळ
स्टॉपक्लॉक ने मोजण्यात येते जरी पटावरील स्थिती काहीही असली तरी वेळ संपल्यास खेळाडू डावा हरतो बुद्धिबळ खेळात रंगत आणण्यासाठी याही पेक्षा कमी वेळेत डाव संपण्याचे आव्हान खेळाडूवर असते त्यास ब्लिट्झ म्हणतात भारतात मोठ्या प्रमाणत लोकप्रिय असलेल्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास क्लासिकल म्हणजे टेस्ट मॅच . वनडे मॅच म्हणजे रॅपिड तर टी २० म्हणजे ब्लिटीझ ( या प्रकारच्या तुलनेमुळे खरे बुद्धिबळपटू काहीसे नाराज होतील मात्र सर्वसामान्याना समजण्यासाठी हे उद्धरण दिले आहे तरी त्यांनी क्षमा करावी ) या तिन्ही प्रकारात भारताने हे यश मिळवले आहे
          भारताने वेस्टर्न एशिया युथ चेस चॅम्पियनशिप 2022 मध्ये 13 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 29 पदके जिंकली आहेत. भारताने 105 पैकी 29 पदके जिंकली आहेत. काही वयोगटांमध्ये एकही भारतीय सहभागी नव्हता हे लक्षात घेऊन ही नक्कीच उत्कृष्ट कामगिरी आहे. साहिब सिंग आणि सफारुल्लाखान या
दोघांनीही क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तीन प्रकारात  प्रत्येकी एक एक सुवर्णपदक त्यांच्या त्यांच्या गटात जिंकले. तसेच संपूर्ण स्पर्धेत ते अपराजित राहिले. साफीनने शास्त्रीय आणि ब्लिट्झमध्ये 100% गुण मिळवले, तर साहिबने शास्त्रीयमध्ये 100% गुण मिळवले जे नक्कीच कौतुकास्पद आहे . भारतासाठी 13 पैकी सहा सुवर्णपदके
त्यांनी जिंकली आहे साहिब सिंग आणि साफिन सराफुल्लाखान यांनी 14 वर्षांखालील ओपनमध्ये क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारात  तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. साहिब सिंग यांनी  8 वर्षांखालील तर आणिसाफिन सराफुल्लाखान यांनी १४ वर्षाखालील गटात यश संपादन केले  फिडे मास्टर हर्षद एसने यांनी १८ वर्षाखालील रॅपिड आणि ब्लिट्झमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले, . 12 वर्षाखालील राष्ट्रीय खुल्या स्पर्धेतील विजेती गौतम कृष्णा एच आणि 18 वर्षांखालील मुलींची विजेती , महिला फिडे मास्टर  भाग्यश्री पाटील यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. सध्याच्या राष्ट्रीय कुमारी  गटातील विजेती   शुभी गुप्ताने तीन रौप्य पदके जिंकली.
        नाशिकचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी,   ग्रँडमास्टर पेंटला हरिकृष्ण ,  ग्रँडमास्टर शशिकिरण कृष्णां ,  ग्रँडमास्टर प्रगण्यानंद रमेश ,  ग्रँडमास्टररौनक साधवानी  ग्रँडमास्टर सारीं निखिल या पुरुष बुद्धिबळ खेळाडूंसह (  ग्रँडमास्टर हा  खेळाच्या उत्कुष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारा 'किताब असतो ), भक्ती कुलकर्णी , तानिया सचदेव , कोनेरू हंपी , वैशाली आर , हरिका द्रोणवली हे महिवाल बुद्धिबळपटू आपल्या कामगिरीने जगभरात  भारताचे नाव गाजवत असताना त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत हे छोटे बुद्धिबळपटू (वयाने छोटे , कमगिरीने नव्हे ) जी लक्षणीय कामगिरी करत आहे ती खरोखरीच कौतुकास्पद आहे माध्यमांनी वैयक्तिक खेळ म्हंटल्यावर फक्त मैदानात खेळल्या जाणाऱ्या बँडमिंटन , मुष्टीयुद्ध आदी प्रकाराकडे न बघता बुध्दिबलसारख्या खेळाकडे बघितल्यास खऱ्या अर्थाने भारतीय ( बॅडमिंटन हा
खेळ पुण्यात ब्रिटिशांनी शोधला आहे सबब तो पूर्ण भारतीय नाही )असलेल्या या खेळाला न्याय दिल्याने तो खऱ्या अर्हताःने भारताचा गौरव ठरेल हे नक्की.













हि माझी एक हजार अकरावी   ब्लॉगपोस्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?