एसटीचे स्वागतार्ह्य निर्णय


आपल्या महाराष्ट्रात राजकीय आखाडा रंगलेला असताना आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या आपल्या एसटीबाबत दोन सुखद घडामोडी घडल्या . एका गोष्टीची प्रत्यक्ष अंमलबाजवणी सुरु झाली तर दुसऱ्या गोष्टीबाबत निर्णय घेण्यात आला . या दोन्ही गोष्टींमुळे आपली महाराष्ट्राची एसटी भूतकाळातील कटू आठवणी विसरून नव्या काळाचे आव्हान स्वीकारण्यास सक्षम झल्याचे दिसून येत आहे एक गोष्ट समस्त महाराष्ट्रासाठी आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागासाठी मर्यदित अशी योजना आहे पहिल्यांदा समस्त महाराष्ट्रासाठी असणारी योजना बघूया 
तर  १ जूनपासून इलेट्रीक बसेसचे यशस्वी संचालन करत असलेल्या आपल्या एस्टीनेने अधिकच आधुनिक होण्यास सुरवात केली आहे सध्याच्या काळातील इ मनीचा वाढता वापर बघता आता एसटीचे तिकीट काढण्यासाठी फोन पे गूगल पेचा वापर आता करता येणार आहे त्यामुळे एसटी प्रवाश्यात रोख रक्कम बाळगण्याच्या त्रासातून प्रवाशाची सुटका होणार आहे . आपल्या एसटीचे ३५० हुन अधिक आगरे आहेत तसेच सुमारे १००० बसस्थानके आहेत छोटोमोठे थांब्याचा तर विचारच करायला नको . तसेच एसटीमध्ये हजारो कंडक्टर आहेत ज्यांचा मार्फत आपण रोख पैसे देऊन आपण तिकीट घेऊ शकतो या अवाढव्य यंत्रणेचा विचार करता इतक्या विविध मार्गाने येणाऱ्या पैस्याचे आर्थिक नियोजन करणे खरोखरीच मोठे काम आहे एसटीचे किमान तिकीट १२ रुपयांपासून  हजार रुपयांपर्यत आहे ( मुंबई नाशिक हुन विदर्भात जाणाऱ्या बसेसचे तिकीट ) याचा विचार करता हे किती जोखमीचे काम आहे याचा अंदाज येतो मात्र काळाची पाऊले उचलत आपली महाराष्ट्राची एसटी हे पाऊल उचलत आहे जे खरोखरीच कौतुकास्पद आहे मध्यप्रदेशच्या एसटीमध्ये एखाद्या किरणा दुकानात ज्या प्रामणे तेथील
दुकानदार हाताने लिहलेले बिल देतो त्याप्रमाणें त्यांचा कंडक्टर आज २०२२ साली सुद्धा हाताने पावतीसारखे तिकीट देत आहे जे रोखीनेच घ्यावे लागते हे लक्षात घेता याचे महत्व लक्षात येते आपल्या महाराष्ट्राच्या आधी गोव्याची एसटी अर्थात कदंब ट्रासनपोर्ट हा प्रयोग यशस्वी केला आहे मात्र कदंबाच्या एकूण उलाढालीचा आणि
महाराष्ट्राच्या एकूण उलाढालीचा विचार करता  कदंबची उलाढाल  महाराष्टाच्या एसटीच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने त्याचा विचार करून महाराष्ट्राला कमी समजणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे कॅशलेस झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या एसटीचे महत्व अबाधित आहे हि झाली समस्त महाराष्ट्राच्या बाबतीतीतील घडामोड आता बघूया फक्तएका भागापुरती प्रत्यक्ष अमलबजवानीस सुरवात झालेल्या गोष्टीबाबत 
?तर आपल्या महाराष्ट्राच्या एसटीच्या नाशिक विभागातर्फ़े प्रवाशी वाढण्यासाठी एका अभिनव उपक्रमास सुरवात झाली आहे जो ग्राहकांच्या गरजा ओळखून आपल्या सेवेत योग्य ते बदल करतो तोच खरा व्यापारी हे तत्व अमलात आणत , नाशिक जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या बसेसचा गावांचा बोर्ड गुजराती प्रवास्यांना गाडी कुठे चालली आहे? , हे चटकन समजावे,  ज्यामुळे ते आपल्या गाडीत बसतील हा उद्देश्य मनात धरून मराठीबरोबर गुजराती भाषेत देखील प्रसिद्ध करणे हाच तो उपक्रम . या उपक्रमासाठी नाशिक विभागातील सर्वच आगारातील गुजरातला जाणाऱ्या बसेसचे मार्ग विशेषत्वाने गुजराती भाषेत रंगवण्यात आले आहेत हे बोर्ड आता मराठी गुजराती आणि इंग्रर्जी भाषेत असतील या आधी हे बोर्ड फक्त देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लिहलेले असत . मराठी भाषा गुजराती लोकांना वाचायला येईलच असे नाही . त्यामुळे अनेकदा गुजराती प्रवाशी आपल्या बसेसमध्ये बसत नसे परिणामी गुजरात राज्यात आपल्या गाड्या रिकाम्या धावत आता ही अडचण काहीशी दूर होणार आहे आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या गुजरातच्या गाड्यांवर पूर्वीपासून ठळक अक्षरात मराठीमध्ये आणि सहज दिसून येईल अश्या मराठीपेक्षा लहान आकारत गुजराती भाषेत गावांची नावे लिहलेली असतात कर्नाटक राज्यातून आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसमबाबत देखील कन्नड आणि मराठी भाषेत बोर्ड असतात फक्त त्या ठिकाणी कन्नड ठळक तर मराठी
बाजूला लहान अक्षरात असते . आता किमान नाशिक विभागाने तरीया इतर राज्यातील बसेसचा आदर्श घेतदोन्ही राज्यातील  नागरिकांना सोईस्कर होईल असा निर्णय घेतला असल्याने गुजरात राज्यात आपणास होणारा तोटा काहीसा कमी होईल नाशिक विभागाचा कित्त्त जर अन्य विभागांनी घेत याचे अनुकरण केल्यास आपल्या एसटीचा तोटा कमी होण्यास नक्कीच काही अंशी मदत होईल अशा बदल स्वीकारल्याबद्दल नाशिक विभागाचे अधिकारी खरोखरीच कौतुकास पात्र आहेत अन्य विभागांनी देखील असे नवनवीन निर्णय अमलात आणावे यासाठी एसटीने पुढाकार घेयला पाहिजे 
महाराष्ट्राची एसटी राज्यातील ग्रामीण जनतेचा कणा आहे त्यामुळे ती टिकणे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ते टिकेल अश्याच नाविन्यपूर्ण उपक्रमांनी 

हि माझी एक हजार बारावी    ब्लॉगपोस्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?