अस्वस्थ भूकवच आणि आपण

 

        सध्या आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना   आपल्या समस्त भारतीयांना काळजी वाटावी अशी घडामोड अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात घडत आहे . सध्या या घडामोडीचे स्वरूप काहीसे छोटे आहे मात्र या घडमोडणीने सुरवातीचे छोटे  स्वरूप सोडून मोठे स्वरूप धारण केल्यास आपल्या भारतासह बांगलादेश म्यानमार या क्षेत्रात मोठ्या प्रमणात प्राणहानी करण्याची याची ताकद आहे हे संकट आहे भूकंपाचे ६ जुलै या एकाच दिवसात २४ तासात या भागाला तब्बल २२ हो २२ भूकंपाचे धक्के बसले रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ शतांश ते ५ या दरम्यान होती या रिक्टर स्केलचे भूकंप छोटे आणि मध्यम स्वरूपाच्या दरम्यानचे समजले जातात भूकंपाची तीव्रता कमी आहे म्हणून या भूकंपाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणारे नाही २४ तासात २२ म्हणजे जवळपास प्रत्येक तासाला एक भूकंप इतके हे स्वरूप भयानक आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणत हालचाली सुरु झाल्याचे ते निर्दशक आहे . या खेरीज आसाम राज्यात ७ जुलै रोजी अत्यंत छोटा म्हणजे २ पूर्णांक ५ शतांश रिक्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यत आला आहे         आपल्यासाठी राजकीयदृष्ट्या विचार करता आसाम हे ऊत्तर भारतापेक्षा पूर्णतः वेगळे असले तरी भूगर्भातील
अंर्तगत रचनेचा विचार करता दोन्ही एकाच क्षेत्रात मोडतात हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे .अंदमान निकोबार बेटाजवळ भूकंप झाल्यास त्सुनामी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्सुनामीमुले किती विध्वंस होऊ शकते याचा अनुभव आपण २००४ च्या २६ डिसेंबरला आणि ११ मार्च २०११ रोजी जपानने घेतला आहे २००४ च्या भूकंप भारताच्या मुख्य भूमीपेक्षा दूर इंडोनेशियाच्या जवळ झाल्याने भारताच्या जवळ पोहोचताना तिने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले अंदमान निकोबारच्या बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे जर त्सुनामी निर्मण झाली तर ती भारताच्या जवळच निर्माण झाल्यामुळे इतके मोठे स्वरूप धारण करणार नाही मात्र काही प्रमाणात नुकसान करणारच .  
  भूगर्भशास्त्राचा विचार करता अंदमान निकोबार बेटे हिमालयाचे विस्तारित स्वरूप समजले जातात सिक्क्कीमनंतर मणिपूर नागालँड मिझोराम या राज्याद्वारे हिलमालयीन रांग पुढे तुटक स्वरूपात बांगलाच्या उपसागरत दिसते  बंगालच्या उपसागरात हिमालयाच्या शिखरांची टोके पाण्याबाहेर आलेली दिसतात हि टोके म्हणजेच अंदमान निकोबार बेटे अंदमान निकोबार बेटे हि इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटची पूर्वेकडील सीमा आहे उत्तरेकडील सीमा म्हणजे अर्थात हिमालय पर्वत भूगर्भशास्त्रज्ञांनी हिमालय आणि उत्तर भारतीय मैदानी क्षेत्रात मोठा भुकंप  होण्याची दात शक्यता असल्याचे या आधीच वारंवार सांगितले आहेच त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जर ते संकट आलेच तर काय करायला हवे याबाबत आपली तयारी असायला हवी 
. काही दिवसापूर्वी काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या पामीर नॉट भागातून निघणाऱ्या एक पर्वतरांगेतील एका पर्वतात मोठा भूकंप झाल्याचे आपणस आठवत 
असेलच अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपात दीड हजार लोकांना प्रॉन्स मुकावे लागले होते  भूकंप कधीही होऊ शकतो नुकताच झालेला अफगाणिस्तानचा भूकंप असो किंवा महाराष्ट्राच्या नैसर्गिक संकटातील सर्वात  मोठ्या संकटांपैकी एक असलेल्या किल्लारीचा भूकंप हे रात्री आले होते तर गुजरातचा भूकंप सकाळचा वेळेस आला होता जर रात्री भूकंप आल्यास किल्लारी सारखे मोठे नुकसान पुन्हा होण्याचा धोका नाकारता येत नाहीचक्रीवादळ मोठ्या प्रमाणत पाऊस याची सुरवात होण्याअगोदर काही लक्षणे दिसून येतात तसे  भूकंपाचे नसते भूकंप अचानक होणारी नैसर्गिक आपत्ती आहे नाही म्हणायला काही प्राण्यांना भूकंपाची आधीच जाणीव होऊन त्याच्या वर्तनात बदल होतात मात्र या प्राणाच्या वर्तनातील बदलाच्या अभ्यास होऊन शासकीय स्तरावर याबाबत घोषणा करणे कोणत्याही शासन यंत्रणेला अशक्य गोष्ट आहे सबब यासाठी नेहमीच तयार असणे आवश्यक आहे त्यातच आपले हित  आहे 

हि माझी एक हजार  तेरावी  ब्लॉगपोस्ट आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?